Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Harshwardhan Sapkal : ‘इतके दिवस झोपले होते का?’ सुनील तटकरेंवर हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

Harshwardhan Sapkal : निवडणूक आयोगाच्या कारभारावर पुन्हा एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पुण्यात बोलताना त्यांनी डिलिमिटेशन विधेयकाला विरोध दर्शवला. अजित पवार विमान अपघात प्रकरणावरून सुनील तटकरे यांनाही 'इतके दिवस झोपले होते का?' असा सवाल केला.

  • By विवेक
Updated On: Nov 22, 2026 | 09:42 PM
Harshwardhan sapkal on sunil tatkare

Harshwardhan sapkal on sunil tatkare

Follow Us
Follow Us:
  • निवडणूक आयोगावर हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
  • हर्षवर्धन सपकाळांचा आयोगाच्या भूमिकेवर सवाल
  • अजित पवार अपघातावरून सुनील तटकरेंना थेट सवाल
 

पुणे : निवडणूक आयोगाच्या कारभारावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं आहे. निवडणूक प्रक्रिया आरोपीच्या कठड्यात उभी आहे आणि निवडणूक आयोगाची वकिली भलतेच लोक करत आहेत, अशा शब्दांत त्यांनी टीका केली. पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सपकाळ यांनी डिलिमिटेशन, अजित पवार विमान अपघात प्रकरण आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणावरही भाष्य केलं. (Harshwardhan Sapkal)

राजू शेट्टी यांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेतल्याच्या मुद्द्यावर बोलताना सपकाळ यांनी टोला लगावला. तुम्ही एकटे गेलात आणि निवडणूक आयुक्तांनी भेट दिली, हे तुमचं नशीब; मात्र आम्ही ३०० खासदार घेऊन गेलो तरी निवडणूक आयुक्त भेटत नाहीत, अशी परिस्थिती असल्याचं ते म्हणाले. निवडणूक आयोगाकडून उत्तरं मिळत नसल्याने नागरिकांमधील अस्वस्थता वाढत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

‘इतके दिवस झोपले होते का?’ तटकरेंना सवाल

अजित पवार विमान अपघात प्रकरणावरून रोहित पवार हे अनेक दिवसांपासून प्रश्न उपस्थित करत आहेत. याच पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी मोठे विधान करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची भूमिका मांडली होती. यावर प्रतिक्रिया देताना सपकाळ यांनी प्रतिक्रिया देत तटकरेंवर निशाणा साधला आहे. ‘इतके दिवस झोपले होते का,’ असा सवाल करत त्यांनी तटकरेंना खडेबोल सुनावले आहेत.

Sanjay Shirsat : खासदारांचा भाव १५० कोटी? संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, संजय शिरसाटांचा थेट पलटवार!

डिलिमिटेशन विधेयकाला विरोधच

डिलिमिटेशन विधेयकावर बोलताना भाजपला मतदारसंघ पुनर्रचनेच्या माध्यमातून देशात जातीय दंगली घडवायच्या आहेत, असा आरोप सपकाळ यांनी केला. इंडिया आघाडीतील पक्ष या विधेयकाला विरोध करत असून, याबाबत आघाडीच्या पातळीवर चर्चा होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

रोहित पवारांच्या काँग्रेस प्रवेशावर मौन

रोहित पवार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का, या प्रश्नावर सपकाळ यांनी सावध भूमिका घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस हा आमचा मित्रपक्ष आहे. त्यांच्या पक्षातील अंतर्गत विषयांवर भाष्य करणं योग्य नाही, असं सांगत त्यांनी या चर्चेवर अधिक बोलणं टाळलं.

एकूणच, सपकाळ यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील निवडणूक राजकारण आणि विरोधकांच्या भूमिकेवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

Ashish Shelar : ‘सोनिया गांधींचं पुस्तक फाडणं मान्य नाही!’ शिंदेंच्या शिवसेनेने पुस्तक फाडलं, भाजपच्या शेलारांनी स्पष्टच सांगितलं

💡

Frequently Asked Questions

  • Que: हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडणूक आयोगावर काय टीका केली?

    Ans: निवडणूक प्रक्रिया आरोपीच्या कठड्यात उभी असून निवडणूक आयोगाकडून प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत, अशी टीका सपकाळ यांनी केली. ३०० खासदारांसह भेटायला गेल्यानंतरही निवडणूक आयुक्त भेटत नसल्याचा दावाही त्यांनी केला.

  • Que: सुनील तटकरे यांना हर्षवर्धन सपकाळ यांनी काय सवाल केला?

    Ans: अजित पवार विमान अपघात प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भेट घेण्याच्या सुनील तटकरे यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना सपकाळ यांनी 'इतके दिवस झोपले होते का?' असा सवाल केला.

  • Que: डिलिमिटेशन विधेयकाबाबत काँग्रेसची भूमिका काय आहे?

    Ans: हर्षवर्धन सपकाळ यांनी डिलिमिटेशन विधेयकाला विरोध दर्शवला आहे. इंडिया आघाडीतील पक्षही या विधेयकाला विरोध करत असून, याबाबत आघाडीच्या पातळीवर चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Web Title: Harshwardhan sapkal election commission delimitation sunil tatkare ajit pawar vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 09:42 PM

Topics:  

  • ajit pawar plane crash
  • Harshwardhan Sapkal
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

Political News : अखेर दोन्ही राष्ट्रवादीचे झाले एकमत! सुप्रिया सुळेंच्या ‘या’ मुद्द्याला सुनील तटकरेंनी दिला पाठिंबा
1

Political News : अखेर दोन्ही राष्ट्रवादीचे झाले एकमत! सुप्रिया सुळेंच्या ‘या’ मुद्द्याला सुनील तटकरेंनी दिला पाठिंबा

Ajit Pawar Plane Crash : रोहित पवारांचे डोके ठीक आहे ना? घातपाताचे पुरावे नसताना केवळ संशयाचे धुकेच
2

Ajit Pawar Plane Crash : रोहित पवारांचे डोके ठीक आहे ना? घातपाताचे पुरावे नसताना केवळ संशयाचे धुकेच

Harshwardhan Sapkal : अजितदादांच्या मृत्यू प्रकरणात काहीतरी लपवलं जातंय? सपकाळांचा फडणवीसांवर गंभीर आरोप
3

Harshwardhan Sapkal : अजितदादांच्या मृत्यू प्रकरणात काहीतरी लपवलं जातंय? सपकाळांचा फडणवीसांवर गंभीर आरोप

Beed News : बीडमध्ये काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन! काँग्रेसची विचारधारा घराघरांत पोहोचवा, हर्षवर्धन सपकाळांचे नेत्यांना आवाहन
4

Beed News : बीडमध्ये काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन! काँग्रेसची विचारधारा घराघरांत पोहोचवा, हर्षवर्धन सपकाळांचे नेत्यांना आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.