Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजित पवारांना साधायचेय काय? आता परत घड्याळाचे काटे उलटे फिरवण्याचा प्रयोग सुरु

सव्वादोन वर्षांपूर्वी अजित पवार यांनी स्वतंत्र चूल मांडली आणि आता परत घड्याळाचे काटे उलटे फिरवण्याचा प्रयोग सुरू केला आहे. यातून त्यांना साधायचे काय आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 21, 2025 | 11:46 AM
अजित पवारांना साधायचेय काय? आता परत घड्याळाचे काटे उलटे फिरवण्याचा प्रयोग सुरु

अजित पवारांना साधायचेय काय? आता परत घड्याळाचे काटे उलटे फिरवण्याचा प्रयोग सुरु

Follow Us
Close
Follow Us:
  • अजित पवारांना साधायचेय काय?
  • परत घड्याळाचे काटे उलटे फिरवण्याचा प्रयोग सुरु
  • पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता
पुणे/दीपक मुनोत : महायुतीचा महाराष्ट्रात एकत्र कारभार चालू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे समर्थक ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षाच्या बाजूने झुकू लागलेले आहेत. सव्वादोन वर्षांपूर्वी अजित पवार यांनी स्वतंत्र चूल मांडली आणि आता परत घड्याळाचे काटे उलटे फिरवण्याचा प्रयोग सुरू केला आहे. यातून त्यांना साधायचे काय आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पुण्यातील एका ज्येष्ठ राजकीय नेत्याने असे मत व्यक्त केले की, भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्रावर चांगली पकड बसली आहे. राज्यातील २९ महापालिकांमध्ये भाजपकडे इच्छुकांची गर्दी जास्त आहे. अशा राजकीय परिस्थितीत अजित पवार यांनी नगरपालिका निवडणुका, महापालिका निवडणुका यामध्ये भाजप विरोधात जाणे हे त्यांना मारक ठरू शकते.

काही राजकीय अभ्यासकांच्या मते ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लावलेल्या सापळ्यात अजित पवार पूर्ण अडकले आहेत. स्थानिक पातळीवर कोणाशीही युती आघाडी करण्याची मुभा शरद पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिली. ती मुभा मिळताच अजित पवार यांचेच समर्थक शरद पवारांच्या पक्षाशी युती करताना दिसले. अजित पवारांनीही त्यांना रोखले नाही. किंबहुना पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याला अनुकूलता दर्शविली. पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील, अशा हालचाली सुरू झाल्या. यात शरद पवारांचे नुकसान काहीच नाही. मात्र, भाजपचे तळातील कार्यकर्ते सुद्धा अजित पवारांच्या बाबतीत संशयाने बघू लागले आहेत. महापालिका निवडणुकीनंतर भाजप आणि अजित पवार यांच्यातील दरी वाढेल, अशी शक्यता दिसू लागली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांना महायुतीत घेऊन राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाचा दर्जा दिला. त्यांच्या नऊ आमदारांना मंत्रीपदे दिली. ही बाब भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना रुचली नव्हती. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी हे बेरजेचे राजकारण असावे, असे समजून भाजपच्या कार्यकर्त्यांनी मौन पाळले. यशवंतराव चव्हाण आमचे आदर्श असून, शाहू, फुले, आंबेडकर यांची वैचारिक परंपरा आम्ही मानतो, अशी राजकीय भूमिका अजित पवार यांनी स्पष्ट केली. त्यावर भाजपमध्ये प्रतिक्रिया उमटल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगावं लागलं की, अजित पवार यांच्या बरोबर आमची वैचारिक युती नसून, ती एक राजकीय तडजोड आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भेटीचे निमंत्रणही अजित पवार यांनी टाळले. याचा परिणाम म्हणजे अजित पवार आणि भाजप यांचे राजकीय मनोमिलन झालेलेच नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी मान्य केलं आणि भाजप एकसंधपणे लढला. भाजपच्या मतदारांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांना मतदान केले, पण, तो विशिष्ट परिस्थितीतील अपवाद म्हणावा लागेल.

मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक येथील महापालिकेतील सत्तेला आगामी काळात महत्त्व आहे. मुंबईत भाजपनेच अजित पवार यांना दूर केलं आहे. पुण्यातही मैत्रीपूर्ण लढत असा गोड शब्द वापरून फडणवीस यांनी अजित पवार यांची राजकीय बोळवण केलेली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत तेथील भाजपचे आमदार जोरदारपणे लढत देऊन भाजपचेच बहुमत आणू पहात आहेत. तिथे अजित पवार यांना भाजपशी जोरदार लढा द्यावा लागणार आहे. ठाणे आणि नाशिक येथे अजित पवार यांच्या पक्षाचा फारसा बेस नाही. हे सगळं पाहिल्यावर अजित पवार काय साधू पहात आहेत? याचे नेमके उत्तर सापडत नाही.

Web Title: Ajit pawar and sharad pawars parties are likely to contest the municipal elections together

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 11:46 AM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • MP Sharad pawar
  • pune news

संबंधित बातम्या

राजकीय घडामोडींना वेग; पुण्यातील ‘या’ बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश
1

राजकीय घडामोडींना वेग; पुण्यातील ‘या’ बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

EmpowerHER25 मध्ये पुण्यात 300+ महिला उद्योजिकांचा सहभाग; तंत्रज्ञान-सक्षम आणि विस्तारक्षम व्यवसाय वृद्धीवर चर्चा
2

EmpowerHER25 मध्ये पुण्यात 300+ महिला उद्योजिकांचा सहभाग; तंत्रज्ञान-सक्षम आणि विस्तारक्षम व्यवसाय वृद्धीवर चर्चा

Aaditya Thackeray : जिथे भाजपची सत्ता आली तिथे प्रगतीचा उलटा प्रवास; आदित्य ठाकरे यांची टीका
3

Aaditya Thackeray : जिथे भाजपची सत्ता आली तिथे प्रगतीचा उलटा प्रवास; आदित्य ठाकरे यांची टीका

महाराष्ट्राच्या राजकारणात आता हेल्दी रिलेशन म्हणणं सुद्धा जड जातं; विनोद तावडे यांचं मत
4

महाराष्ट्राच्या राजकारणात आता हेल्दी रिलेशन म्हणणं सुद्धा जड जातं; विनोद तावडे यांचं मत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.