Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Plane Crash Conspiracy: अजितदादांना सुनील तटकरेंनी संपवलं? शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा गंभीर आरोप

निधनाच्या तिसऱ्याच दिवशी सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या निधनाला ७२ तासही उलटत नाहीत, तोपर्यंत सुनेत्रा पवारांनी अशाप्रकारे शपथ घेतल्याने यावर विरोधकांकडून टीका होत आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 06, 2026 | 02:03 PM
Ajit Pawar Plane crash Conspiracy

Ajit Pawar Plane crash Conspiracy

Follow Us
Close
Follow Us:
  • अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात सुप्त संघर्ष सुरू
  • अजितदादांना सुनील तटकरेंनी संपवलं- रामदास कदम
  • अजितदादांच्या जाण्यानंतर शरद पवारांना शह देण्यासाठी सुनील तटकरे यांनी अत्यंत गलिच्छ राजकारण केलं
Ratnagiri Politics: अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात सुप्त संघर्ष सुरू झाला आहे. निधनाच्या तिसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीच्या नेत्या सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या निधनाला ७२ तासही उलटत नाहीत, तोपर्यंत सुनेत्रा पवारांनी अशाप्रकारे शपथ घेतल्याने यावर विरोधकांकडून टीका होत आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी शरद पवारांना शह देण्यासाठी हा शपथविधी घडवून आणला, असा आरोपही विरोधकांकडून करण्यात येत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत.

अजितदादांना सुनील तटकरेंनी संपवलं असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. राजकारणात जो माझ्या मुलाला संपवण्याचा प्रयत्न करू शकतो, तो काहीही करू शकतो, अशा आशयाचं वक्तव्य कदम यांनी केलं आहे. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष महायुतीचा भाग आहेत. तरीही कदम यांनी अशाप्रकारे तटकरे यांच्यावर टीका केल्याने महायुतीत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

नाशिक महापालिकेच्या महापौरपदी हिमगौरी आडके तर उपमहापौरपदी विलास शिंदे बिनविरोध

शपथविधीवरून गलिच्छ राजकारणाचा आरोप

रामदास कदम यांनी अजितदादा पवारांच्या निधनानंतर घडलेल्या घडामोडींवर भाष्य करताना तटकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “अजितदादांच्या जाण्यानंतर शरद पवारांना शह देण्यासाठी सुनील तटकरे यांनी अत्यंत गलिच्छ राजकारण केलं. दादांच्या चितेची राख देखील शांत झाली नव्हती, तोच तटकरेंनी वहिनींना (सुनेत्रा पवार) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावली. हिंदू संस्कृतीनुसार किमान दहा दिवस दुःखाचे पाळावे लागतात, त्यानंतर शपथविधी झाला असता तर काय बिघडलं असते?”

शरद पवार पक्षाचा ताबा घेतील, या भीतीने तटकरेंनी ही ‘चालाख खेळी’ केल्याचा दावा कदमांनी केला. ज्या माउलीचे कुंकू आणि मंगळसूत्र गेले, त्यांना सुतकही पाळू न देता मुंबईला आणून शपथविधी करायला लावणाऱ्या तटकरेंना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही, अशी टीका त्यांनी केली.

फक्त चौकशीसाठी पोलिस कोणालाही अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

“माझ्या मुलालाही संपवण्याचा प्रयत्न केला”

सुनील तटकरे यांनीच अजितदादांना संपवलं, या विरोधकांच्या आरोपाला दुजोरा देताना कदम म्हणाले की, तटकरे काहीही करू शकतात. “ज्यांनी त्यांना मोठं केले, त्यांनाच संपवण्याचं काम ते करतात. माझ्या मुलाला (योगेश कदम) राजकारणात संपवण्याचा प्रयत्न ज्यांनी केला, त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

कोकणात युती न होण्याचे मुख्य कारण

रामदास कदम यांनी तटकरेंवर विश्वासघात केल्याचा आरोप करताना जुन्या कुरघोड्यांची आठवण करून दिली. “लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरेंना खासदार करण्यासाठी आम्ही अहोरात्र कष्ट केले. मात्र, विधानसभेच्या वेळी त्यांनीच आम्हाला दगा दिला. योगेश दादांना पाडण्यासाठी त्यांनी पूर्ण शक्ती पणाला लावली. याच विश्वासघातामुळे कोकणात शिवसेनेने राष्ट्रवादीशी युती न करण्याचा निर्णय घेतला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. या खळबळजनक आरोपांमुळे महायुतीमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला असून, आगामी काळात याचे मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे

 

Web Title: Ajit pawar plane crash conspiracy sunil tatkare eliminated ajitdada a senior leader of the shinde group makes a serious allegation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • ajit pawar plane crash
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात ‘अजित पवारां’चं कनेक्शन? अमोल मिटकरीचा खळबळजनक दावा; अघोरी पूजेचाही उल्लेख
1

Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात ‘अजित पवारां’चं कनेक्शन? अमोल मिटकरीचा खळबळजनक दावा; अघोरी पूजेचाही उल्लेख

Ashok Khaat : सुनिल तटकरे वादाच्या भोवऱ्यात; भोंदू अशोक खरातच्या मुलाच्या लग्नात तटकरांची हजेरी
2

Ashok Khaat : सुनिल तटकरे वादाच्या भोवऱ्यात; भोंदू अशोक खरातच्या मुलाच्या लग्नात तटकरांची हजेरी

Maharashtra Politics : Black Box सुरक्षित असतानाही जळाल्याचं का सांगितलं? रोहित पवारांचा संताप अनावर
3

Maharashtra Politics : Black Box सुरक्षित असतानाही जळाल्याचं का सांगितलं? रोहित पवारांचा संताप अनावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.