Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Political News : अखेर दोन्ही राष्ट्रवादीचे झाले एकमत! सुप्रिया सुळेंच्या ‘या’ मुद्द्याला सुनील तटकरेंनी दिला पाठिंबा

डिलिमिटेशन बिलावर खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडलेल्या भूमिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्वागत केले आहे. समान पद्धतीने सर्व राज्यांमध्ये जागा वाढविणाऱ्या डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाच्या विधेयकाला समर्थन असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 22, 2026 | 01:57 PM
Supriya Sule Sunil Tatkare same decision on Delimitation Bill,

Supriya Sule Sunil Tatkare same decision on Delimitation Bill,

Follow Us
Follow Us:
  • डिलिमिटेशन बिलावर दोन्ही राष्ट्रवादीचे एकमत
  • खासदार सुप्रिया सुळेंचा डिलिमिटेशनला पाठिंबा
  • सुनील तटकरेंनी सुप्रिया सुळेंच्या भूमिकेचे केले स्वागत
NCP On Delimitation Bill : डिलिमिटेशन बिलावरून राज्यात आणि केंद्रात राजकारण रंगले आहे. हे बिल पास करण्यासाठी विरोधातील खासदारांना १५० कोटी रुपये दिले जात असल्याचा खळबळजनक दावा खासदार संजय राऊत केला. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देणार असल्याची सकारात्मक भूमिका घेतली जात आहे. मात्र यामुद्द्यावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याचे उघड झाले आहे. तर सुप्रिया सुळेंनी डिलिमिटेशन बिलावर व्यक्त केलेल्या भूमिकेचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, डिलिमिटेशनचं बिल आमच्याजवळ आलेलं नाही. बिल आल्यावर आमचा पक्ष भूमिका स्पष्ट करेन.’ याचबरोबर संजय राऊतांच्या आरोपांवर त्या म्हणाल्या, ‘सशक्त लोकशाहीमध्ये आरोप करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे.’ याचबरोबर सध्या राज्यावर दुष्काळी संकट ओढावले असून बळीराजाला सरकारकडून मदतीची गरज आहे. याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आम्ही स्वत: दर आठवड्याला आमच्या लोकसभा मतदारसंघात आढावा घेत आहे. प्रश्न गंभीर आहे. आम्ही सातत्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. शेवटच्या माणसाला मदत कशी केली जाईल, यासाठी प्रयत्नशील आहोत.”

भाजप खासदार रामराव वडकुटे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; दिल्लीतील ‘एम्स’मध्ये अखेरचा श्वास

दरम्यान, अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. त्यामुळे डिलिमिटेशन या मुद्द्यावर दोन्ही राष्ट्रवादीचे एकमत झाल्याचे दिसून आले आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा, आदरणीय सुप्रियाताईंनी एक स्पष्टपणाची भूमिका मांडली, की ज्या वेळेला डिलिमिटेशनचं बिल येईल, महिला आरक्षणाचं बिल येईल आणि समान पद्धतीवरती सर्व राज्यांच्यामध्ये तितक्याच दीडपट जागा वाढतील, अशा बिलाला आमचं समर्थन असेल. हा जो तात्त्विक मुद्दा आहे, देशाच्या संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्थेमधला जो महत्त्वाचा गाभा आहे, तोच त्याला अनुसरूनच खासदार सुप्रियाताईंचं ते वक्तव्य आहे. निश्चितपणाने स्वागतार्ह आहे.”

Nashik News : अध्यक्षपदावरून संत निवृत्तीनाथ संस्थानात वाद; धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाकडे वारकऱ्यांचे लक्ष

पुढे तटकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, अलीकडच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने, निराधार आरोप करणं किंवा पवार साहेबांच्या पक्षातील काही खासदार इकडे-तिकडे जाणं, कल्पोकल्पित कथा रचत अशा पद्धतीची राजकीय वक्तव्यं करणं, असे प्रकार वाढलेले आहेत. खरं तर आम्ही सर्वांनीच राजकीय पक्षांनी या संदर्भामध्ये विचार केला पाहिजे. सिद्धांतावरती मतभेद असू शकतात, वैचारिक मतभेद असू शकतात, पण अशा पद्धतीची टीका-टिप्पणी करून आपण लोकशाहीचंच अवमूल्यन करतो आहोत. हे अनेक दुर्दैवाने का ते विसरतात, हे मला कळू शकत नाही.”

💡

Frequently Asked Questions

  • Que: सुप्रिया सुळे यांनी डिलिमिटेशन बिलाबाबत काय भूमिका मांडली?

    Ans: डिलिमिटेशनचे बिल अद्याप त्यांच्याकडे आलेले नाही. बिल आल्यानंतर पक्षाची भूमिका स्पष्ट केली जाईल, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

  • Que: सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेला पाठिंबा का दिला?

    Ans: सर्व राज्यांमध्ये समान पद्धतीने जागा वाढविणाऱ्या डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाच्या विधेयकाला समर्थन देण्याची भूमिका तात्त्विकदृष्ट्या योग्य असल्याचे सांगत तटकरे यांनी सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेचे स्वागत केले.

  • Que: डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आहेत का?

    Ans: डिलिमिटेशनच्या विधेयकाबाबत सुप्रिया सुळे आणि सुनील तटकरे यांच्या भूमिकांमध्ये सकारात्मक साम्य दिसून आले आहे. मात्र, यावरून दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाचा निष्कर्ष काढता येत नाही.

Web Title: Supriya sule delimitation bill sunil tatkare support ncp politics nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 01:53 PM

Topics:  

  • MP Supriya Sule
  • political news
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

NCP Politics : दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकाच मंचावर; अमोल कोल्हे अन् छगन भुजबळ यांच्यात खलबतं, चर्चांना उधाण
1

NCP Politics : दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकाच मंचावर; अमोल कोल्हे अन् छगन भुजबळ यांच्यात खलबतं, चर्चांना उधाण

Prakash Ambedkar : राज्य सरकारकडे पुढच्या तीन महिन्यांएवढाही धान्यसाठा नाही? प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा, म्हणाले…
2

Prakash Ambedkar : राज्य सरकारकडे पुढच्या तीन महिन्यांएवढाही धान्यसाठा नाही? प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा, म्हणाले…

Nitesh Rane Press Confernce : टिपू सुलतान जयंतीवरून नितेश राणे आक्रमक; म्हणाले, हे खपवून घेतले जाणार नाही…’
3

Nitesh Rane Press Confernce : टिपू सुलतान जयंतीवरून नितेश राणे आक्रमक; म्हणाले, हे खपवून घेतले जाणार नाही…’

दोन दिवसांत भाजपला दुसरा धक्का; बड्या महिला नेत्याने दिला राजीनामा, काँग्रेसमध्ये जाणार
4

दोन दिवसांत भाजपला दुसरा धक्का; बड्या महिला नेत्याने दिला राजीनामा, काँग्रेसमध्ये जाणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.