Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Pawar PC: पायलटचा वापर करून अजित पवारांच्या विमानाचा अपघात…? रोहित पवारांचे खळबळजनक दावा   

त्या दिवशी बारामतीत दृश्यमानता कमी असताना  पायलटने विमानाचे लँडिंग करायलाच नको होते. पण त्यानंतरही त्याने विमानाचे जबरदस्ती लँडिंग केले, त्यामुळे घातपाताचा संशय अधिक बळावतो.

  • By अनुराधा धावडे
Updated On: Feb 18, 2026 | 12:41 PM
Rohit Pawar PC: पायलटचा वापर करून अजित पवारांच्या विमानाचा अपघात…? रोहित पवारांचे खळबळजनक दावा   
Follow Us
Close
Follow Us:
  • पत्रकार परिषदेतून रोहित पवारांचे पुन्हा गंभीर आरोप
  • अजित पवार यांचे विमान मुद्दामहून जमीनीवर आदळले
  •  VSR  विमान कंपनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
 

Rohit Pawar Press Conference:  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात आम्ही काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर तपास यंत्रणांना या घटनेचा तपास सुरू केला. याचे समाधान आहे. पण ज्या गतीने हा तपास सुरू आहे. त्यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.  अजित पवार यांच्या विमानातील इंधनाच्या टाक्या पूर्ण भरण्याची काय गरज होती. असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे. रोहित पवार यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या अपघात आणि VSR विमान कंपनीच्या कारभारासंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत.

अजित पवार विमानाची इंधन टाकी आणि पंखांमधील टाक्या पूर्णपणे का भरल्या असा प्रश्न उपस्थित केला. त्यांनी ब्लॅक बॉक्स जळाल्याच्या सिद्धांतालाही आव्हान देत पवार म्हणाले की, तज्ञांच्या मते, ब्लॅक बॉक्स ११०० अंश सेल्सिअस तापमानात एक तास जळाला तरच त्याचे नुकसान होऊ शकते, तसेच, तो महिनाभर पाण्यात बुडाला तरीही राहू शकतो. मग जर विमानाच्या कमी वितळणाऱ्या केबल्स जळल्या नाहीत तर ब्लॅक बॉक्सचे नुकसान कसे होऊ शकते? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

Ajit Pawar Plane Crash Conspiracy: अजित पवारांच्या विमान अपघाताचे गूढ उकलणार की वाढणार; तपास ब्युरोची मोठी अपडेट

रोहित पवार म्हणाले की,   २८ जानेवारीला बारामतीत कमी दृश्यमानता असतानाही वैमानिक सुमित कपूर याने विमान माघारी न वळवता   खाली उतरवले. वैमानिकाने विमानाचा स्फोट घडवण्यासाठीच  विमान मुद्दामहून  खाली आदळले.  असा खळबळजनक आरोप रोहित पवार यांनी केला आहे.  बारामतीहून  हे विमान हैदराबादला जाणार होते, तिथेही विमानात पुन्हा इंधन भरता आले असते. पण हे विमान सुरतहून मुंबईला येत असतानाच या विमानाच्या इंधनाच्या टाक्या पूर्ण भरण्यात आल्या होत्या.  बारामतीत विमान अपघाताच्या वेळी या विमानात ३००० ते ३५०० लीटर इंधन होते.  धक्कादायक म्हणजे या विमानाच्या टॉयलेटजवळही इंधनाचे जास्तीचे कॅन ठेवण्यात आले होते.  त्यामुळे पायलटचा वापर करून हा विमान अपघात घडवण्यात आल्याचा आम्हाला शंका आहे. विमानात इंधनाचा साठा जास्त असेल तर हा मोठा स्फोट होऊ शकतो, हा आमचा संशय खरा ठरत असल्याचे दिसत आहे.  बारामतीत त्या दिवशी दृश्यमानता कमी असतानाही पायलट सुमित कपूरने  विमान माघारी फिरवले नाही आणि एक हवेत गिरकी घेऊ मुद्दामहून खाली पाडले आणि स्फोट घडवून आणला.  (Ajit Pawar Plane Crash )

त्या दिवशी बारामतीत दृश्यमानता कमी असताना  पायलटने त्याचे  विमानाचे लँडिंग करायलाच नको होते. पण त्यानंतरही त्याने विमानाचे जबरदस्ती लँडिंग केले, त्यामुळे घातपाताचा संशय अधिक बळावतो. असंही रोहित  पवार यांनी म्हटले आहे.

Ajit Pawar Accident : जीवघेण्या विमान कंपनीवर कारवाई का नको? रोहित पवारांनी उपस्थित केला सवाल

यावेळी रोहित पवार यांनी VSR कंपनीच्या कारभारावरही  आरोप केले आहेत. व्हीएसआर विमान कंपनीचा एक हँडलर मुंबईतही बसतो.  तो फ्लाईट  प्लॅनमध्ये बदल  किंवा फेरफार करू शकतो. सध्या अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास सुरू  आहे. पण व्हीएसआर कंपनीकडून कागदपत्रे मिळवण्याबाबत विलंब होत आहे. व्हिएसआर कंपनीकडून सध्या कागदपत्रांमध्ये फेरफार केले जात  आहेत,  दिल्लीवरून फ्लाईट प्लॅन आल्यानंतर मुबंईत बसणाऱ्या गोपी नावाच्या हँडलरने त्यात बदल केले असावेत,  त्यासाठी त्या दरम्यान करण्यात आलेल्या इ-मेलचीही चौकशी झाली पाहिजे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

Web Title: Ajit pawars plane crashed using a pilot rohit pawars sensational claim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 12:36 PM

Topics:  

  • ajit pawar plane crash
  • Baramati News Update
  • rohit pawar

संबंधित बातम्या

“१०-१५ तास लाईनमध्ये थांबूनही शेतकऱ्यांना…” इंधन तुटवड्यावरून रोहीत पवार यांचा सरकारवर निशाणा
1

“१०-१५ तास लाईनमध्ये थांबूनही शेतकऱ्यांना…” इंधन तुटवड्यावरून रोहीत पवार यांचा सरकारवर निशाणा

Rohit Pawar News: रोहित पवारांच्या आक्रमक भूमिकेमुळे जलसंपदा प्रशासन नमले; कुकडी आणि जनाई-शिरसाईचे पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन
2

Rohit Pawar News: रोहित पवारांच्या आक्रमक भूमिकेमुळे जलसंपदा प्रशासन नमले; कुकडी आणि जनाई-शिरसाईचे पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन

NCP Politics: राष्ट्रवादीत नेमकं चाललंय तरी काय; तटकरे-पटेलांच्या भेटीनंतर आता रोहित पवार नाराज?
3

NCP Politics: राष्ट्रवादीत नेमकं चाललंय तरी काय; तटकरे-पटेलांच्या भेटीनंतर आता रोहित पवार नाराज?

अजितदादांच्या अपघात प्रकरणात भोंदू खरातचे कनेक्शन समोर? रोहित पवार यांचा मोठा खुलासा
4

अजितदादांच्या अपघात प्रकरणात भोंदू खरातचे कनेक्शन समोर? रोहित पवार यांचा मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.