Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: रोहित पवारांच्या अडचणी वाढणार? बारामती ॲग्रो लिमिटेड कारखान्याला नोटिस, दिल ‘हा’ इशारा

स्थानिक रहिवासी सागर संजय वाबळे व चांगण वाबळे यांनी केलेल्या तक्रारीनंतर तसेच भाजप युवा मोर्चाने केलेल्या पाठपुराव्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी ३ जुलै २०२६ रोजी कारखान्याची प्रत्यक्ष पाहणी केली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 07, 2026 | 06:59 PM
Maharashtra Politics: रोहित पवारांच्या अडचणी वाढणार? बारामती ॲग्रो लिमिटेड कारखान्याला नोटिस, दिल ‘हा’ इशारा
Follow Us
Follow Us:

बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनीला ‘कारणे दाखवा’ नोटिस
कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा
७ दिवसांच्या आत लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश

बारामती: इंदापूर तालुक्यातील शेळफळगडे येथील बारामती ॲग्रो लिमिटेड या आमदार रोहित पवार यांच्या साखर कारखान्याला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. नोटीसमध्ये कारखान्याला ७ दिवसांच्या आत लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, समाधानकारक उत्तर न मिळाल्यास पाणी (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम, १९७४ व वायू (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम, १९८१ अंतर्गत कोणतीही पूर्वसूचना न देता कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

स्थानिक रहिवासी सागर संजय वाबळे व चांगण वाबळे यांनी केलेल्या तक्रारीनंतर तसेच भाजप युवा मोर्चाने केलेल्या पाठपुराव्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी ३ जुलै २०२६ रोजी कारखान्याची प्रत्यक्ष पाहणी केली होती.

Maharashtra Politics: रोहित पवारांच्या अडचणी वाढणार? बारामती ॲग्रो लिमिटेड कारखान्याला नोटिस, दिल ‘हा’ इशारा

या पाहणीत कारखान्याकडून पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. मंडळाच्या अहवालानुसार सुमारे दोन एकरांच्या कच्च्या तलावात प्रक्रिया न केलेले काळपट औद्योगिक सांडपाणी साठविण्यात आले होते. या तलावातून सांडपाणी झिरपत सिंचन कालव्यात जात असल्याचे तसेच पाईपद्वारे सांडपाणी कालव्यात सोडले जात असल्याचे आढळले.

याशिवाय लायनिंग खराब अवस्थेत असल्याने भूजल व परिसरातील विहिरींना धोका निर्माण झाला असून, हायड्रोक्लोरिक ॲसिडची वैज्ञानिक पद्धतीने साठवणूक न केल्यामुळे प्रदूषणाचा धोका वाढल्याचे मंडळाने नमूद केले आहे.प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पुणे विभागाचे प्रादेशिक अधिकारी बाळासाहेब महिपतराव कुकडे यांनी ६ जुलै २०२६ रोजी ही नोटीस जारी केली असून, निर्धारित मुदतीत समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्यास कारखान्याविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

‘शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा केलाच पाहिजे’; भाजप सरकारवर हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात, कर्जमाफीसाठी एल्गार तीव्र

याबाबत प्रतिक्रिया देताना भाजप युवा मोर्चा पुणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईचे स्वागत केले. “पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या कोणालाही कायद्यापासून सूट मिळता कामा नये. नियमांचे उल्लंघन सुरूच राहिल्यास आणि दोषींवर कठोर कारवाई झाली नाही, तर जनतेला सोबत घेऊन व्यापक जनआंदोलन उभारले जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.यावेळी जगदीश कोळेकर आणि संदीप केसकर उपस्थित होते.

Web Title: Mpcb sent show cause to baramati agro limited mla rohit pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 06:58 PM

Topics:  

  • MPCB
  • rohit pawar
  • Sugar Mill

संबंधित बातम्या

Rohit Pawar on Drug Inspector Exam Cancelled: एमपीएससीचा पेपर फुटल्याचे पुरावे दिले होते! परीक्षा रद्द झाल्यावर रोहित पवार आक्रमक
1

Rohit Pawar on Drug Inspector Exam Cancelled: एमपीएससीचा पेपर फुटल्याचे पुरावे दिले होते! परीक्षा रद्द झाल्यावर रोहित पवार आक्रमक

Rohit Pawar on Congress: रोहित पवार काँग्रेसच्या वाटेवर? राहुल गांधींसोबतच्या वाढत्या जवळीकतेमुळे राजकीय चर्चांना उधाण
2

Rohit Pawar on Congress: रोहित पवार काँग्रेसच्या वाटेवर? राहुल गांधींसोबतच्या वाढत्या जवळीकतेमुळे राजकीय चर्चांना उधाण

‘सरकारला जागे करण्यासाठी एकत्र लढू,’ रोहित पवार याचे प्रतिपादन; स्मार्ट मीटरविरोधात हिंगणघाटात मोर्चा
3

‘सरकारला जागे करण्यासाठी एकत्र लढू,’ रोहित पवार याचे प्रतिपादन; स्मार्ट मीटरविरोधात हिंगणघाटात मोर्चा

Rohit Pawar on Nagpur Event:’ भाजपकडून राहुल गांधींच्या कार्यक्रमाची कॉपी!; रोहित पवारांची देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका
4

Rohit Pawar on Nagpur Event:’ भाजपकडून राहुल गांधींच्या कार्यक्रमाची कॉपी!; रोहित पवारांची देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.