Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aditya Thackeray News: शांततापूर्ण आंदोलकांवर AK-47 अन् पेलट गन्स!; विद्यार्थ्यांच्या मारहाणीवरून आदित्य ठाकरेंचा केंद्राला इशारा

नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ सिवानमध्ये शनिवारी झालेल्या बिहार बंददरम्यान हवेत एके-४७ ने गोळीबार करणाऱ्या एका कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, पोलीस मुख्यालयाने या घटनेची दखल घेतली आणि कॉन्स्टेबलला तात्काळ निलंबित केले.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 28, 2026 | 03:32 PM
Shivsena UBT, Jantar Mantar, CJP Protest, Aaditya Thackeray on AK 47

Shivsena UBT, Jantar Mantar, CJP Protest, Aaditya Thackeray on AK 47

Follow Us
Follow Us:
  •  कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या दबावाने धर्मेंद प्रधान यांना पदाचा राजीनामा
  • निशस्त्र विद्यार्थ्यांवर आणि तरुणांवर करण्यात आलेल्या पोलिसी कारवाईवरून आदित्य ठाकरे आक्रमक
Aditya Thackeray News: दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या दबावाने धर्मेंद प्रधान यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. पण या सीजेपीच्या आंदोलनादरम्यान शेकडो विद्यार्थ्यांना पोलिसांनी जबर मारहाण, लाठीचार्जदेखील केला. विद्यार्थी आंदोलनात इलेक्ट्रिक करंट असणारे बॅरिकेड्स, खिळे असलेल्या लाठ्या काठ्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. दिल्ली पोलिसांचा हा हिंसाचार समोर आल्यानंतर संपूर्ण देशात एक संतापाची लाट उसळली आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पोलिसांच्या या कृत्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

स्पर्धा परीक्षांच्या उत्तरपत्रिका फुटल्याच्या (पेपर लीक) विरोधात शांततापूर्ण मार्गाने जाब विचारणाऱ्या निशस्त्र विद्यार्थ्यांवर आणि तरुणांवर करण्यात आलेल्या पोलिसी कारवाईवरून आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर अत्यंत जहाल शब्दांत टीका केली आहे.

Rohit Pawar PC: १२ लाखांत फुटला MPSC चा पेपर, ५ लाख ॲडव्हान्स; रोहित पवारांचा नवा बॉम्ब

“इलेक्ट्रिक शॉक देणाऱ्या काठ्या (बॅटन्स), पेलट गन्स, इलेक्ट्रिक शॉक देणारे बॅरिकेट्स, गंजलेल्या खिळ्यांच्या काठ्या आणि थेट एके-४७ (AK-47)… या सगळ्याचा वापर शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या निशस्त्र तरुणांवर—ज्यात बहुतांश विद्यार्थी आहेत—त्यांच्यावर केला जात आहे. हे विद्यार्थी फक्त परीक्षेच्या पेपर फुटीप्रकरणी सरकारला उत्तरदायी धरून जाब विचारत होते.”

“हे तेच शासन आहे जे आज भारतावर राज्य करत आहे, पण त्यांना एका एका जिल्ह्याचा कारभारही व्यवस्थित चालवता येत नाहीये. गेल्या दशकभरात जगाने भारतात लोकशाहीचा संकोच होताना पाहिला आहे. आता देशातील या तरुणांनी दाखवून दिले आहे की, ते या राजवटीच्या क्रूरतेविरुद्ध आणि अपयशाविरुद्ध गप्प बसणार नाहीत.”

बिहारच्या पाटनामधील विद्यार्थ्यांवर एका पोलिस कर्मचाऱ्याने आंदोलनादरम्यान एके ४७ रायफल चालवल्याचे समोर आल्याने देशभरात पोलिसांविरोधात संतापाची भावना व्यक्त केली जात आहे.

NCP Merger News: पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर दिल्लीत मोठ्या घडामोडी; पवारांच्या भेटीगाठींमुळे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचे संकेत

नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ सिवानमध्ये शनिवारी झालेल्या बिहार बंददरम्यान हवेत एके-४७ ने गोळीबार करणाऱ्या एका कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, पोलीस मुख्यालयाने या घटनेची दखल घेतली आणि कॉन्स्टेबलला तात्काळ निलंबित केले. या कॉन्स्टेबलची ओळख अभिषेक पटेल अशी असून, तो एसआयटी (SIT) टीमचा सदस्य आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सिवानमधील गांधी मैदानावर मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि आंदोलक जमा होऊ लागले. त्यानंतर या आंदोलनाचे हिंसक वळण लागले. आंदोलकांनी शहराच्या अनेक भागांमध्ये गोंधळ घातला, पोलिसांचे बॅरिकेड्स तोडले आणि गांधी मैदान व जेपी चौकाजवळ पोलिसांवर दगडफेक केली. या घटनेत सिवानचे पोलीस अधीक्षक (एसपी) पुरण कुमार झा यांच्या पायाला दुखापत झाली. दगडफेकीत कर्तव्यावर असलेले अनेक पोलीस आणि पत्रकारही जखमी झाले.

Web Title: Ak 47 used against peaceful students aaditya thackeray slams centre over police action in cjp agitation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 03:32 PM

Topics:  

  • aaditya thackeray
  • CJP Protest
  • Jantar Mantar
  • Shivsena UBT

संबंधित बातम्या

Sushma Andhare : ‘शेतकरी उपाशी मरतोय, नेते काजू-बदामावर ताव मारतायत,’ सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल
1

Sushma Andhare : ‘शेतकरी उपाशी मरतोय, नेते काजू-बदामावर ताव मारतायत,’ सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल

Disha Salian Case : ‘ज्यांनी गुन्हा केलाय त्यांना कायद्याच्या चौकटीत आणलं पाहिजे’, निलेश राणेंचं मोठं वक्तव्य
2

Disha Salian Case : ‘ज्यांनी गुन्हा केलाय त्यांना कायद्याच्या चौकटीत आणलं पाहिजे’, निलेश राणेंचं मोठं वक्तव्य

Disha Salian Case : सतीश सालियान वकिलांसह मातोश्रीवर, वरुण सरदेसाईंचा पलटवार; ‘पुरावे असतील तर द्या’
3

Disha Salian Case : सतीश सालियान वकिलांसह मातोश्रीवर, वरुण सरदेसाईंचा पलटवार; ‘पुरावे असतील तर द्या’

Disha Salian Case : ‘मातोश्री’बाहेर हायव्होल्टेज ड्रामा; आदित्य ठाकरेंना 500 कोटींची नोटीस, सतीश सालियन वकिलांसह दाखल
4

Disha Salian Case : ‘मातोश्री’बाहेर हायव्होल्टेज ड्रामा; आदित्य ठाकरेंना 500 कोटींची नोटीस, सतीश सालियन वकिलांसह दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.