Lingayat Panchamsali Community OBC Reservation meeting
लिंगायत पंचमसाली समाजाचे जगद्गुरू पूज्य बसव मृत्युंजय गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे, या मागणीसाठी कर्नाटकात मोठे आंदोलन उभारण्यात आले होते. समाजाच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विजापूर ते बंगळुरू पदयात्राही काढण्यात आली होती. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पंचमसाली समाजालाही ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी आता समाजबांधवांकडून संघटित प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातील पंचमसाली समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर पुढील काळात कोणती भूमिका घ्यावी, शासनाकडे मागण्यांचा पाठपुरावा कशा पद्धतीने करावा, तसेच समाजाच्या हक्कांसाठी कोणते उपक्रम राबवावेत, याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे.
दरम्यान, जगद्गुरू बसव मृत्युंजय गुरुजी यांनी नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पंचमसाली समाजाच्या विविध मागण्यांबाबत चर्चा केल्याचे आयोजकांनी सांगितले. समाजातील मुलाबाळांच्या शिक्षणासाठी, रोजगाराच्या संधींसाठी आणि भविष्यासाठी आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा असल्याचे आयोजकांनी नमूद केले.
समाजाच्या विविध मागण्यांसाठी सर्व समाजबांधवांनी एकजुटीने पुढे येणे आवश्यक असून, अक्कलकोट येथील बैठकीस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.






