Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अकोल्यात वाढतोय डेंग्यू, चिकनगुनियाचा धोका; डेंग्यूचे 155 तर चिकनगुनियाचे 130 रुग्ण

आरोग्य विभागाकडून मलेरियासाठी आतापर्यंत २ लाख ९८ हजारी २५६ तपासण्या करण्यात आल्या असून, ३० मलेरियाचे रुग्ण आढळल्याची माहिती आहे. आरोग्य विभागाकडून नियमित तपासणी व प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 07, 2026 | 03:03 PM
अकोल्यात वाढतोय डेंग्यू, चिकनगुनियाचा धोका; डेंग्यूचे 155 तर चिकनगुनियाचे 130 रुग्ण

अकोल्यात वाढतोय डेंग्यू, चिकनगुनियाचा धोका; डेंग्यूचे 155 तर चिकनगुनियाचे 130 रुग्ण

Follow Us
Follow Us:
  • डेंग्यू, चिकनगुनिया व मलेरियाचा धोका वाढला
  • 1047 चिकनगुनिया तपासण्या
  • पावसाळ्यानंतर डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता
अकोला : पावसाळ्यानंतरचे दूषित वातावरण, ठिकठिकाणी साचलेले पाणी आणि डासांची वाढती उत्पत्ती यामुळे अकोला जिल्ह्यात डेंग्यू, चिकनगुनिया व मलेरियाचा धोका वाढला आहे. जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यात डेंग्यूसाठी १ हजार ६५१ तपासण्या करण्यात आल्या. त्यापैकी १५५ आढळले. रुग्ण चिकनगुनियाच्या १ हजार ६५१ तपासण्यांत १३० रुग्ण आढळले. मलेरियाच्या २ लाख ९८ हजार २५६ तपासण्यांत ३० रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

ग्रामीण भागात डेंग्यूच्या ६०४ तपासण्यांत ७४, तर चिकनगुनियाच्या ६०४ तपासण्यांत ४५ रुग्ण आढळले. महापालिका क्षेत्रात १ हजार ४७ तपासण्यांत ८१ डेंग्यू आणि ५८ चिकनगुनियाचे रुग्ण आढळले. सध्या तिन्ही आजारांची स्थिती नियंत्रणात असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. पावसाळ्यानंतर डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता लक्षात घेता आरोग्य विभागाने आरोग्य संस्थांना औषधे व उपचार साहित्य उपलब्ध ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. संशयित रुग्णांची रक्त तपासणी करून उपचार केले जात आहेत.

दारूच्या नशेत बापाचा मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न; संतापलेल्या मुलीने थेट बॅट घातली डोक्यात अन्…

सध्या ग्रामीण भागात डेंग्यूसाठी जलपात सर्वेक्षण करून रक्त नमुने घेण्यात येत आहे. तसेच एखाद्या रूग्णाला पाच दिवसांहून अधिक ताप असल्यास त्याचे रक्तजल नमुने घेण्यात येत आहेत. यासोबतच ज्या ठिकाणी डास जास्त आढळल्यास धूळ फवारणी केल्या जात आहे. तसेच त्या ठिकाणी टेलिपॉस टाकल्या जात आहे. अधिक डासांची संख्या असलेल्या ठिकाणी धूळ फवारणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. काही ठिकाणी डबके किंवा पाणी साचल्यास गप्पी मासे सोडले जात आहे, ही माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

1047 चिकनगुनिया तपासण्या

तसेच डेंग्यू, मलेरिया व चिकनगुनियाबाबत नवरात्रोत्सवातील विविध मंडळांसमोर स्टॉल लावून जनजागृती केली जाणार आहे. ग्रामपंचायतींनी साचलेले पाणी हटविणे, नाल्यांची स्वच्छता, डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करणे आणि आवश्यकतेनुसार फवारणी करणे अपेक्षित आहे. शहरात डेंग्यूचे ८१ आणि चिकनगुनियाचे ५८ रुग्ण आढळल्याने बाधित परिसरात विशेष खबरदारी घेऊन फवारणी केली जात असल्याचे प्रशासनाने सांगितले. २०२५ मध्ये जिल्ह्यात डेंग्यूचे ३०६ आणि मलेरियाचे १७ रुग्ण आढळले होते. कीटकजन्य आजारांचे ६ उद्रेकही नोंदवण्यात आले होते. शहरात 1047 चिकनगुनिया तपासण्या केल्या जात आहेत.

मलेरियाच्या २ लाख ९८ हजारांवर तपासण्या

आरोग्य विभागाकडून मलेरियासाठी आतापर्यंत २ लाख ९८ हजारी २५६ तपासण्या करण्यात आल्या असून, ३० मलेरियाचे रुग्ण आढळल्याची माहिती आहे. आरोग्य विभागाकडून नियमित तपासणी व प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी घराभोवती पाणी साचू देऊ नये. ताप किवा अंगदुखीची लक्षणे दिसताच रक्त तपासणी करून घ्यावी. ग्रामपंचायतींनाही स्वच्छता व डास नियंत्रणाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: 155 dengue and 130 chikungunya cases in akola nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • akola news
  • Dengue Virus

संबंधित बातम्या

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; तब्बल 1900 किलो खाद्यपदार्थ केले जप्त
1

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; तब्बल 1900 किलो खाद्यपदार्थ केले जप्त

जप्तीतील फक्त 70 वाहने मूळ मालकांना परत; दंड भरल्यानंतरही वाहनमालकांना प्रतीक्षाच
2

जप्तीतील फक्त 70 वाहने मूळ मालकांना परत; दंड भरल्यानंतरही वाहनमालकांना प्रतीक्षाच

अकोल्यात कुटुंब नियोजनात महिलाच आघाडीवर; 2431 महिलांनी केली कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया
3

अकोल्यात कुटुंब नियोजनात महिलाच आघाडीवर; 2431 महिलांनी केली कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.