Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; तब्बल 1900 किलो खाद्यपदार्थ केले जप्त

अन्न पदार्थ्यांचे नियमित अन्न नमुने घेऊन उर्वरित साठा १९०० किलो, किंमत ५ लाख ७२ हजार रुपये जप्त करून अकोला महानरपालिकेच्या अंतर्गत बायोगॅस प्रकल्प, भोड येथे नष्ट करण्यात येणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 06, 2026 | 02:52 PM
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; तब्बल 1900 किलो खाद्यपदार्थ केले जप्त

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; तब्बल 1900 किलो खाद्यपदार्थ केले जप्त

Follow Us
Follow Us:
  • सुमारे 1900 किलो खाद्यपदार्थावर कारवाई
  • ५ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात
  • सहाय्यक आयुक्त देवेंद्र वीर यांना मिळाली होती माहिती
अकोला : असुरक्षित पद्धतीने अकोल्यात आणला जात असलेला मावा, खवा, हलवा यासह सुमारे 1900 किलो खाद्यपदार्थ अन्न व औषध प्रशासनाने सोमवारी मोठी कारवाई करत जप्त केले. या कारवाईत सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त देवेंद्र वीर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

रायली जिन परिसरातील आरको ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून खाद्यपदार्थ असुरक्षित पद्धतीने अकोल्यात आणले जात असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त देवेंद्र वीर यांना मिळाली होती. माहितीच्या आधारे सोमवारी आरको ट्रान्सपोर्ट, रायली जिन, अकोला येथे दुपारी ११.३० वाजता तपासणी केली असता तेथे अहमदाबाद गुजरात येथून विविध ब्रँडचे स्वीट हलवा (अंबिका), ट्रॅडिशनल स्वीट (जीडब्लूएएल), हलवा (श्री जीडब्ल्यूएएल), रिच स्वीट (अंबिका), ब्रजनिधी स्वीट, मुरलीधर स्वीट आदींचा साठा अहमदाबाद गुजरात येथून एमपी-०९/एचक्यू-५००४ आणि एमएच-२८/एबी-७८८२ या क्रमांकाच्या दोन ट्रकमधून वाहतूक करण्यात आला होता, अशी माहिती मिळाली आहे.

अन्न पदार्थांचे नमुने पाठवले प्रयोगशाळेत

अन्न पदार्थ्यांचे नियमित अन्न नमुने घेऊन उर्वरित साठा १९०० किलो, किंमत ५ लाख ७२ हजार रुपये जप्त करून अकोला महानरपालिकेच्या अंतर्गत बायोगॅस प्रकल्प, भोड येथे नष्ट करण्यात येणार आहे. माल मागवणारे व्यापारी कमल शर्मा, वैभव पाटील, अशोक अहुजा यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. ही कारवाई आयुक्त तुकाराम मुंढे, अमरावतीचे सहआयुक्त सचिन केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त अकोला देवानंद वीर आणि अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बोरचाटे यांनी केली आहे.

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा दणका

दुसरीकडे, प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री करणे, अन्नपदार्थांच्या निर्मिती व विक्रीच्या ठिकाणी स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार २४ सप्टेंबर रोजी बीड शहरात दोन ठिकाणी कारवाई करून प्रतिबंधित गुटखा व पानमसाला जप्त केला आहे. संबंधित विक्रेत्यांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, जालना रोडवरील चहा-नाश्ता सेंटरमध्ये गंभीर त्रुटी आढळल्याने त्याचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.

Nagpur News : चार उमेदवारांचे अर्ज दाखल; शक्तिप्रदर्शनाचा जोर, भाजपची रॅली मात्र रद्द

Web Title: 1900 kg of food items seized in akola nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • akola news
  • FDA Action

संबंधित बातम्या

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा दणका; गुटखा जप्त, नियमभंग करणाऱ्या चहा सेंटरचाही परवाना निलंबित
1

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा दणका; गुटखा जप्त, नियमभंग करणाऱ्या चहा सेंटरचाही परवाना निलंबित

जप्तीतील फक्त 70 वाहने मूळ मालकांना परत; दंड भरल्यानंतरही वाहनमालकांना प्रतीक्षाच
2

जप्तीतील फक्त 70 वाहने मूळ मालकांना परत; दंड भरल्यानंतरही वाहनमालकांना प्रतीक्षाच

तुटलेला फ्रिज, शाकाहारी- मांसाहारी अन्न एकत्र अन्…; गुडइयर कॅन्टीनला FDA चा दणका
3

तुटलेला फ्रिज, शाकाहारी- मांसाहारी अन्न एकत्र अन्…; गुडइयर कॅन्टीनला FDA चा दणका

पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; 17 अन्न परवाने निलंबित
4

पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; 17 अन्न परवाने निलंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.