
अकोल्यातील सर्व सातही तालुके दुष्काळग्रस्त घोषित; बाधित शेतकऱ्यांना आता सवलतींचा आधार
अकोला : खरीप हंगाम २०२६ दुष्काळी घटकांचा विचार करून महाराष्ट्र शासनाने राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये ट्रीगर-१ (पहिली कळ) लागू केली आहे. यासंदर्भात मदत व पुनर्वसन विभागाने शुक्रवारी शासन निर्णय जारी केला आहे. विशेष म्हणजे अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे.
शासनाच्या निर्णयानुसार, जून महिन्यापासून आतापर्यंत झालेल्या पर्जन्यमानातील तूट तसेच अन्य घटकांमुळे २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याचे कृषी आयुक्तांच्या गुरुवारच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संबंधित तालुक्यांमध्ये पंचनाम्याची कारवाई जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची सद्यस्थिती दर्शविणारे छायाचित्रे आणि जीपीएस को-ऑर्डिनेट संकलित करून
पिकांच्या परिस्थितीचा अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनाला तातडीने सादर करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
जिल्ह्यात यावर्षी ९३% हून अधिक पेरणी
जिल्ह्यात ऑगस्ट २०२६ च्या अखेरपर्यंत खरीप पिकांची एकूण लागवड सुमारे ४ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर (९३१% हून अधिक पेरणी) पूर्ण झाली आहे. एकूण पेरणीयोग्य क्षेत्रामध्ये अकोला जिल्ह्यात खरीप हंगामाचे एकूण पेरणीयोग्य क्षेत्र ४,३२,०१० हेक्टरचा समावेश आहे. अमरावती विभागीय कृषी अहवालानुसार (२२ ऑगस्ट २०२६ पर्यंत), अकोट, तेल्हारा, बाळापूर आणि इतर तालुक्यांसह संपूर्ण अकोला जिल्ह्यात ९३ टक्के खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. त्यानुसार एकूण पेरणी झालेल्या क्षेत्राचा आकडा सुमारे ४,०१,७०० हेक्टर आहे.
अकोला जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुके
अकोला जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये अकोट, अकोला, पातूर, तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूर, बार्शीटाकळी यांचा समावेश करण्यात आला आहे. हा आदेश महाराष्ट्र शासनाचे सहसचिव संजय इंगळे यांच्या डिजीटल स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सातही तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे.
लवकरच पंचनाम्याची कारवाई
लवकरच पंचनाम्याची कारवाई सुरू करण्यात येणार आहे. सर्वेक्षण केलेल्या कक्षेत्रातील पिकांची सद्यस्थिती दर्शविणारे छायाचित्रे आणि जीपीएस को-ऑर्डिनेट संकलित करून पिकांच्या परिस्थितीचा अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनाला तातडीने सादर करण्यात येणार आहे.