Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बोगस बियाण्यांमुळे शेतकरी संकटात; 15 हजार हेक्टर क्षेत्र बाधित, शेतकऱ्यांचे मदतीकडे लक्ष

मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीमुळे उत्पादनात मोठी घट झाली. रब्बी हंगामातही अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामाकडून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा होत्या.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 31, 2026 | 03:06 PM
बोगस बियाण्यांमुळे शेतकरी संकटात; 15 हजार हेक्टर क्षेत्र बाधित, शेतकऱ्यांचे मदतीकडे लक्ष

बोगस बियाण्यांमुळे शेतकरी संकटात; 15 हजार हेक्टर क्षेत्र बाधित, शेतकऱ्यांचे मदतीकडे लक्ष

Follow Us
Follow Us:

अकोला : जिल्ह्यात बोगस बियाण्यांचे प्रकरण गंभीर बनले असून, कृषी विभागाने प्रत्यक्ष केलेल्या पाहणीत अनेक ठिकाणी सोयाबीन बियाणे अप्रमाणित आणि निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आले आहे. शेतकरी आणि विविध संघटनांकडून आलेल्या तक्रारींच्या आधारे कृषी विभागाने पंचनामे सुरू केले असून, त्याचा अहवाल आयुक्त कार्यालयाकडे पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष शासनाकडून जाहीर होणाऱ्या मदतीकडे लागले आहे.

मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीमुळे उत्पादनात मोठी घट झाली. रब्बी हंगामातही अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामाकडून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, सुरुवातीपासूनच हवामानातील बदल, बियाण्यांच्या समस्येमुळे शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले. शेतकऱ्यांनी विश्वासाने सोयाबीनची पेरणी केली; मात्र अनेक ठिकाणी बियाणे जमिनीत सडले किंवा उगवलेच नाही. त्यामुळे अकोला जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली. विविध राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्यानंतर कृषी विभागाने तातडीने दखल घेत शेतपातळीवर पाहणी सुरू केली.

शेतकरी कर्जमुक्तीसाठी सरकारकडून तब्बल 7 हजार कोटींचा निधी; रक्कम लवकरच कर्जखात्यात होणार जमा

दरम्यान, या पाहणीत अनेक ठिकाणी बियाण्यांचा दर्जा निकृष्ट असल्याचे समोर आले. सुरुवातीला सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या तक्रारींची संख्या सुमारे दोनशे होती. मात्र, जनजागृती वाढल्यानंतर मोठ्या संख्येने शेतकरी पुढे आले. आतापर्यंत कृषी विभागाकडे १० हजार ३५ अधिकृत तक्रारी दाखल झाल्या आहेत. या प्रकारामुळे जिल्ह्यातील १५ हजार ६३५ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे समोर आले आहे.

कृषी विभागाने त्वरित पंचनामे करावे

क्षेत्रीय पाहणीदरम्यान अनेक शेतकऱ्यांनी आर्थिक संकटाचा सामना करत नाइलाजाने दुबार पेरणी केल्याचे दिसून आले. काही ठिकाणी दुबार पेरणीनंतरही बियाणे उगवले नसल्याने शेतकरी अधिकच अडचणीत सापडला आहे. आता कृषी विभागाने पंचनाम्यांची प्रक्रिया लवकर पूर्ण करून शासनाकडे अहवाल पाठवावा आणि बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

Yavatmal News : पीकविमा अर्जप्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव ! परिसरातील शेतकरी संभ्रमात; नुकसानभरपाईबाबत अनिश्चितता

Web Title: Farmers in distress due to spurious seeds in akola

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 03:06 PM

Topics:  

  • akola news
  • Farmers Issue

संबंधित बातम्या

अकोल्यात वर्षभरात झाले 140 आंतरजातीय विवाह; 11 दाम्पत्यांचे रखडले अनुदान
1

अकोल्यात वर्षभरात झाले 140 आंतरजातीय विवाह; 11 दाम्पत्यांचे रखडले अनुदान

Maharashtra Drought Assessment: महाराष्ट्रात कसा जाहीर होणार दुष्काळ? राज्य सरकारकडून निकष जारी
2

Maharashtra Drought Assessment: महाराष्ट्रात कसा जाहीर होणार दुष्काळ? राज्य सरकारकडून निकष जारी

काटेपूर्णा अजूनही तहानलेले; साठा 22.64 टक्के, जलसाठ्यात वाढीची प्रतीक्षाच
3

काटेपूर्णा अजूनही तहानलेले; साठा 22.64 टक्के, जलसाठ्यात वाढीची प्रतीक्षाच

Sharad Pawar Letter To CM Fadnavis: शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार अन्… ; शरद पवारांच्या मुख्यमंत्र्यांकडे ९ प्रमुख मागण्या
4

Sharad Pawar Letter To CM Fadnavis: शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार अन्… ; शरद पवारांच्या मुख्यमंत्र्यांकडे ९ प्रमुख मागण्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.