Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यात पावसाने फिरवली पाठ; उमा प्रकल्पामध्ये केवळ 4 टक्के जलसाठा

सध्या उमा प्रकल्पाची जलपातळी ३३५.८० मीटर असून, धरणात ०.५३६ दशलक्ष घनमीटर इतका एकूण पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा केवळ ४.५९ टक्के राहिला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 06, 2026 | 03:51 PM
अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यात पावसाने फिरवली पाठ; उमा प्रकल्पामध्ये केवळ 4 टक्के जलसाठा;

अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यात पावसाने फिरवली पाठ; उमा प्रकल्पामध्ये केवळ 4 टक्के जलसाठा;

Follow Us
Follow Us:

अकोला : मूर्तिजापूर तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने उमा मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा चिंताजनक स्थितीत पोहोचला आहे. जलसंपदा विभागाच्या उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, धरणात केवळ ४.५९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. परिसरात दिवसभर पावसाची एकही मिलिमीटर नोंद न झाल्याने धरणातील पाणीपातळीत कोणतीही वाढ झालेली नाही. त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता असून शेतकरी चिंतेत आहेत.

सध्या उमा प्रकल्पाची जलपातळी ३३५.८० मीटर असून, धरणात ०.५३६ दशलक्ष घनमीटर इतका एकूण पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा केवळ ४.५९ टक्के राहिला आहे. चालू पावसाळ्यात आतापर्यंत प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात केवळ १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाअभावी धरणात नवीन पाण्याची आवक झालेली नाही. धरणाचा सांडवा पूर्णपणे बंद असून, सध्या कोणताही पाणीविसर्ग सुरू नाही. धरणाचे सर्व दरवाजे बंद ठेवण्यात आले असून विसर्गाचा वेग शून्य घनमीटर प्रति सेकंद आहे.

7 हजार निवासी डॉक्टर संपावर, शेकडो रुग्णांची गैरसोय; बीएचएमएस डॉक्टरांच्या नोंदणीच्या निर्णयाविरोधात निवासी डॉक्टरांचा बेमुदत संप

उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन जलसंपदा विभागाकडून करण्यात येत आहे. यंदा जून महिन्यापासूनच पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील खरीप पिकांवरही परिणाम झाला आहे. तालुक्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ ३६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून, सिंचनासाठी आवश्यक पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. उमा प्रकल्पावर परिसरातील अनेक गावांसह लंघापूर ५७ खेडी ग्रामीण पाणीपुरवठा योजना आणि सिंचन व्यवस्था अवलंबून आहे. त्यामुळे आगामी काळात दमदार पाऊस न झाल्यास जलसाठा झपाट्याने कमी होऊन पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे लागू शकते.

सिंचनासह ५७ गावांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न

११.६८ दशलक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमता असलेल्या उमा प्रकल्पावर लंघापूर ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत ५७ खेडी अवलंबून आहेत. याशिवाय तालुक्यातील पिंपळशेंडा आणि शिवण हे दोन लघुप्रकल्पही कमी पाणीसाठ्यामुळे अडचणीत आहेत. त्यामुळे उमा प्रकल्पातील घटता जलसाठा हा पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. जलसंपदा विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उमा प्रकल्पातील जलसाठ्यात होऊ शकते वाढ

येत्या काही दिवसात चांगला पाऊस झाल्यास उमा प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ होऊन पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न; दमदार पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. तसेच रब्बी हंगामातील सिंचनावरही त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विहिरी व बोअरवेलच्या पाणीपातळीत आणखी घट झाल्यास ग्रामीण भागातील पाणीटंचाईचे संकट गंभीर होऊ शकते.

Web Title: Lack of rain in murtijapur taluka akola

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 03:51 PM

Topics:  

  • akola news
  • Rain Update

संबंधित बातम्या

काटेपूर्णा अजूनही तहानलेले; साठा 22.64 टक्के, जलसाठ्यात वाढीची प्रतीक्षाच
1

काटेपूर्णा अजूनही तहानलेले; साठा 22.64 टक्के, जलसाठ्यात वाढीची प्रतीक्षाच

Farmers Issue : शेतकऱ्यांचे 5 महिन्यांचे अनुदान रखडलेलेच; APL कार्डधारक त्रस्त
2

Farmers Issue : शेतकऱ्यांचे 5 महिन्यांचे अनुदान रखडलेलेच; APL कार्डधारक त्रस्त

मोठी बातमी ! कागदी शिधापत्रिका होणार आता इतिहासजमा; 1 लाख शिधापत्रिका ‘ऑनलाईन’
3

मोठी बातमी ! कागदी शिधापत्रिका होणार आता इतिहासजमा; 1 लाख शिधापत्रिका ‘ऑनलाईन’

पोपटखेड पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; धरणाचे दोन दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना…
4

पोपटखेड पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; धरणाचे दोन दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.