Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाचे पुनरागमन खरीप पिकांसाठी संजीवनी; 26.5 टक्के पावसाची अद्यापही तूट कायम

जून महिन्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात २९५.३ मिमी पावसाची अपेक्षा होती; मात्र प्रत्यक्षात २१७.१ मिमी पावसाचीच नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ७३.५ टक्के पाऊस झाला असून, २६.५ टक्के पावसाची तूट कायम आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 24, 2026 | 03:45 PM
पावसाचे पुनरागमन खरीप पिकांसाठी संजीवनी; 26.5 टक्के पावसाची अद्यापही तूट कायम

पावसाचे पुनरागमन खरीप पिकांसाठी संजीवनी; 26.5 टक्के पावसाची अद्यापही तूट कायम

Follow Us
Follow Us:

अकोला : सुमारे १६ ते १७ दिवसांच्या विश्रांतीनंतर अकोला जिल्ह्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली असून, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. खरीप पिकांना या पावसाचा फायदा होत असला, तरी जिल्ह्यात अद्यापही सरासरीच्या तुलनेत पावसाची लक्षणीय तूट कायम आहे.

जिल्ह्यात बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंतच्या २४ तासात सरासरी २९.१ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये पातूर तालुक्यात सर्वाधिक ४१.७ मिमी, तर बार्शी, टाकळी तालुक्यात ४०.४ मिमी पाऊस झाला. मंगळवारी झालेल्या पावसामुळे पिकांना काहीसा आधार मिळाला असला, तरी हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, यंदाचा पाऊस अजूनही सरासरीपेक्षा आणि गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी आहे. जून महिन्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात २९५.३ मिमी पावसाची अपेक्षा होती; मात्र प्रत्यक्षात २१७.१ मिमी पावसाचीच नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ७३.५ टक्के पाऊस झाला असून, २६.५ टक्के पावसाची तूट कायम आहे.

FDA On BMC Canteen : मुंबई महापालिका कँटीनवर FDAचा दणका; ताकात माशी सापडल्याने कँटीन सील करण्याचे निर्देश

दरम्यान, जून ते सप्टेंबर या कालावधीतील ६९३.७ मिमी मोसमी पावसाच्या सरासरीपैकी आतापर्यंत केवळ ३१.३ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप पिकांच्या वाढीसह धरणे, पिण्याच्या पाण्याची परिस्थिती सुधारण्यासाठी जिल्ह्याला अजूनही दमदार पावसाची आवश्यकता असल्याचे चित्र आहे.

शेतकरी राजा चिंतेत

चालू खरीप हंगामात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी हवामानाच्या लहरीपणाशी सामना करत पेरण्यांचा वेग कायम ठेवला आहे. कृषी विभागाने दिलेल्या ताज्या अहवालानुसार, जिल्ह्यात आतापर्यंत ७९.३८ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्याचे खरिपाचे एकूण सरासरी क्षेत्र ७१६२०९ हेक्टर असून, त्यापैकी ५६८५०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीची कामे मार्गी लागली आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने दिलेली ओढ आणि उघाडीमुळे पिकांची वाढ काही प्रमाणात खुंटली असून, शेतकरी राजा चिंतेत सापडला आहे. पावसाचा हा खंड असाच लांबल्यास पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Jogeshwari News: जोगेश्वरीत FDA ची धडक कारवाई; १०.९४ लाखांचा विनालेबल साबण जप्त

Web Title: The return of the rains is a lifeline for kharif crops

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • akola news
  • Rain News

संबंधित बातम्या

सांगली जिल्ह्यात दुष्काळाची चाहूल; 54 महसूल मंडलांत 21 दिवसांहून अधिक पावसाचा खंड
1

सांगली जिल्ह्यात दुष्काळाची चाहूल; 54 महसूल मंडलांत 21 दिवसांहून अधिक पावसाचा खंड

Rain Update : पुन्हा पाऊस होणार…! मराठवाड्यासह कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज
2

Rain Update : पुन्हा पाऊस होणार…! मराठवाड्यासह कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज

काटेपूर्णा अजूनही तहानलेले; साठा 22.64 टक्के, जलसाठ्यात वाढीची प्रतीक्षाच
3

काटेपूर्णा अजूनही तहानलेले; साठा 22.64 टक्के, जलसाठ्यात वाढीची प्रतीक्षाच

Farmers Issue : शेतकऱ्यांचे 5 महिन्यांचे अनुदान रखडलेलेच; APL कार्डधारक त्रस्त
4

Farmers Issue : शेतकऱ्यांचे 5 महिन्यांचे अनुदान रखडलेलेच; APL कार्डधारक त्रस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.