Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akshaya Tritiya निमित्त जैन मंदिरात धार्मिक कार्यक्रमांची भक्तिमय सांगता; आहार अर्पणातून आत्मशुद्धीचा संदेश

अक्षय तृतीया निमित्त डब्ल्यू.आय.टी. जैन टेंपल येथे विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. प.पू. मुनिश्री १०८ वीरसागरजी महाराज यांच्या प्रवचनातून त्याग, संयम आणि आत्मशुद्धीचा संदेश देण्यात आला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 19, 2026 | 06:43 PM
Akshaya Tritiya निमित्त जैन मंदिरात धार्मिक कार्यक्रमांची भक्तिमय सांगता

Akshaya Tritiya निमित्त जैन मंदिरात धार्मिक कार्यक्रमांची भक्तिमय सांगता

Follow Us
Follow Us:

सोलापूर : जैन धर्मातील अत्यंत पवित्र व अध्यात्मिक उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीया पर्वानिमित्त डब्ल्यू.आय.टी. जैन टेंपल येथे विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिभावपूर्ण वातावरणात उत्साहात झाले. पहाटे श्री जिनेंद्र भगवानांच्या अभिषेकाने सोहळ्याची मंगल सुरुवात झाली. शांती मंत्र, मांगलिक उद्बोधन आणि भजनांच्या मधुर स्वरांनी संपूर्ण परिसर आध्यात्मिक उर्जेने भारावून गेला. या सर्व उपक्रमांमधून श्रद्धा, संयम आणि त्याग यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला असून, अक्षय तृतीया हा आहार अर्पणातून आत्मशुद्धीचा संदेश देणारा पवित्र पर्व असल्याचे प्रकर्षाने अधोरेखित झाले.

Solapur News : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने भव्य मिरवणूक; आंबेडकरांच्या जीवनावरील प्रसंगांच्या देखाव्यांनी वेधले लक्ष

या प्रसंगी प.पू. निर्यापक श्रमण मुनिश्री १०८ वीरसागरजी महाराज यांच्या प्रभावी प्रवचनाने कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली. “अक्षय म्हणजे कधीही न संपणारे पुण्य, जे त्याग, सद्गुण आणि परोपकाराच्या भावनेतून आत्म्यात साठते,” असे सांगत त्यांनी जैन तत्त्वज्ञान स्पष्ट केले. जैन धर्मात सेवा ही केवळ सामाजिक कृती नसून ती आत्मशुद्धीची गूढ प्रक्रिया आहे, असे त्यांनी नमूद केले. विशेषतः आहार अर्पण हे सर्वश्रेष्ठ मानले जाते, कारण ते संयम व त्याग स्वीकारलेल्या मुनिश्रींना समर्पित केले जाते, असे त्यांनी अधोरेखित केले.

“मनुष्य जसा पाप करताना आनंद अनुभवतो, तसाच आनंद सेवा करतानाही अनुभवला पाहिजे,” असे सांगत त्यांनी रौद्र ध्यान, हिंसानंद, परिग्रहानंद आणि चौर्यानंद या अशुभ भावनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. करुणा, समत्व आणि अपरिग्रह या जैन मूल्यांचा स्वीकार केल्यास आत्मकल्याणाचा मार्ग सुकर होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी मुनिश्री धवल सागर महाराज यांनी ‘श्री आदिनाथ पुराण’ वाचनाचे महत्त्व सांगितले, तर मुनिश्री विशाल सागर महाराज यांनी ‘अक्षय’ संकल्पनेचा आध्यात्मिक अर्थ स्पष्ट करत निःस्वार्थ भावनेचे महत्त्व अधोरेखित केले.

मुनिश्रींच्या आहाराचा पावन सोहळा, तसेच पादप्रक्षालन व शास्त्र अर्पण कार्यक्रमही भावपूर्ण वातावरणात पार पडले. बेंगळुरू, पुणे, सांगली, बेळगाव, औरंगाबाद आदी ठिकाणांहून आलेल्या भाविकांनी श्रद्धाभावाने आहार अर्पण करून आत्मिक समाधानाचा अनुभव घेतला. स्व. भाऊसाहेब गांधी जन्मशताब्दी वर्षानिमित्त वालचंद शिक्षण समूहातर्फे आयोजित या उपक्रमामुळे संपूर्ण परिसरात भक्तिभाव, शिस्त आणि अध्यात्मिक जागृतीचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.

Mira Bhayander : शिवसेनेला धक्का देण्यासाठी भाजपचा ‘जनता दरबार ; मेहता-सरनाईक संघर्ष शिगेला

Web Title: Akshaya tritiya jain temple religious program veer sagarji discourse

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 06:43 PM

Topics:  

  • Akshaya Tritiya
  • maharashtra

संबंधित बातम्या

MSRTC News: अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम; २० दिवसांत ₹१.६५ कोटींचा दंड, ८,८३९ वाहनांवर कारवाई
1

MSRTC News: अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम; २० दिवसांत ₹१.६५ कोटींचा दंड, ८,८३९ वाहनांवर कारवाई

विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणणारे सदाभाऊ खोतच ‘गुंडाभाऊ’, विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागा; काँग्रेसची मागणी
2

विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणणारे सदाभाऊ खोतच ‘गुंडाभाऊ’, विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागा; काँग्रेसची मागणी

Anganwadi scheme : अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव
3

Anganwadi scheme : अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 30 जुलैपूर्वी खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार, कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा
4

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 30 जुलैपूर्वी खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार, कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.