Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MSRTC News: अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम; २० दिवसांत ₹१.६५ कोटींचा दंड, ८,८३९ वाहनांवर कारवाई

बसस्थानक परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीवर प्रशासनाने मोठी कारवाई करत गेल्या २० दिवसांत ८,८३९ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. या मोहिमेदरम्यान तब्बल ₹१.६५ कोटींचा दंड वसूल करण्यात आला असून नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर पुढील काळातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 21, 2026 | 04:38 PM
अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम; २० दिवसांत ₹१.६५ कोटींचा दंड, ८,८३९ वाहनांवर कारवाई

अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम; २० दिवसांत ₹१.६५ कोटींचा दंड, ८,८३९ वाहनांवर कारवाई

Follow Us
Follow Us:
  • बसस्थानक परिसरातील अवैध वाहतूकीला चाप
  • २० दिवसांत ८,८३९ वाहनांवर कारवाई
  • तब्बल ₹१.६५ कोटींचा दंड वसूल!”
मुंबई : राज्यातील एसटी बसस्थानक परिसर अवैध वाहतूक मुक्त करण्यासाठी परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, पोलीस विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष अंमलबजावणी मोहीम राबविण्यात आली. १ जुलै ते २० जुलै २०२६ या अवघ्या २० दिवसांच्या कालावधीत या मोहिमेने मोठे यश संपादन केले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे.

या विशेष मोहिमेदरम्यान राज्यभरात एकूण ८ हजार ८३९ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. विविध यंत्रणांच्या संयुक्त कारवाईतून ₹ १ कोटी ६५ लाख २१ हजार ३१५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, नियमांचे उल्लंघन करणारी १९५ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या भाड्यात १३.५६ टक्के वाढ; प्रवासी सेवेसाठी अपरिहार्य निर्णय, १० % हंगामी भाडेवाढ मागे

एसटी बसस्थानके ही दररोज लाखो प्रवाशांच्या सुरक्षित आणि सुलभ प्रवासाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहेत. मात्र, बसस्थानक परिसरात होणाऱ्या अवैध वाहतूकीमुळे वाहतूककोंडी, अनिर्बंध वाहतूकीमुळे प्रवाशांच्या सुरक्षितते बरोबरच मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब गंभीर होती. याच पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संयुक्त कारवाईचे स्पष्ट निर्देश दिले होते.

या मोहिमेमुळे बसस्थानक परिसरातील वाहतूक व्यवस्थेत शिस्त निर्माण होण्यास मदत झाली असून प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित आणि सुकर वातावरण उपलब्ध होत आहे. अवैध पार्किंगला कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी अशा संयुक्त मोहिमा यापुढेही अधिक प्रभावीपणे आणि सातत्याने राबविण्यात येणार आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

एसटी महामंडळाने सर्व वाहनधारकांना आवाहन केले आहे की, बसस्थानक परिसरातील वाहतुकीची शिस्त आणि प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन आपली वाहने केवळ अधिकृत पार्किंगच्या ठिकाणीच उभी करावीत आणि या जनहिताच्या मोहिमेला सहकार्य करावे.
“प्रवाशांची सुरक्षितता आणि बसस्थानक परिसरातील शिस्त हीच आमची प्राथमिकता” या भूमिकेतून अवैध वाहतूकीविरोधातील ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

ST Bus Fare Hike : एसटी प्रवाशांना झटका! 10% हंगामी भाडेवाढीला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ, तिकीट किती रुपयांनी महागणार?

Web Title: Illegal transport crackdown near bus stand 8839 vehicles fined rs 1 65 crore in 20 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • maharashtra
  • msrtc
  • st bus

संबंधित बातम्या

Maharashtra Sarkar : महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ ची केंद्र सरकारकडून दखल, इतक्या लाखांचे मिळणार अनुदान …
1

Maharashtra Sarkar : महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ ची केंद्र सरकारकडून दखल, इतक्या लाखांचे मिळणार अनुदान …

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको
2

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता
3

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…
4

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.