Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anganwadi scheme : अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

महिला व बालविकास विभागाने अंगणवाडीतील घरपोच पोषण आहार योजनेत महत्त्वाचे बदल केले असून, नोव्हेंबर व डिसेंबर २०२६ पासून सुधारित पाककृतींचा पुरवठा केला जाणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 21, 2026 | 03:18 PM
अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

Follow Us
Follow Us:

बारामती : महिला व बालविकास विभागाने अंगणवाडीतील घरपोच पोषण आहार योजनेत महत्त्वाचे बदल केले असून, नोव्हेंबर व डिसेंबर २०२६ पासून सुधारित पाककृतींचा पुरवठा केला जाणार आहे. बालके, गरोदर महिला आणि स्तनदा मातांना अधिक पौष्टिक, रुचकर व दर्जेदार आहार मिळावा, यासाठी शाकाहारी (व्हेज) पुलाव, बहुधान्य पौष्टिक पफ यांचा समावेश करण्यात आला असून खिचडीसोबत स्वतंत्र मसाल्याचे पाकीटही देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद खंडागळे यांनी दिली आहे.

 

महिला व बालविकास विभागाच्या सुधारित सूचनेनुसार पौष्टिक मूगडाळ, खिचडी प्रीमिक्स हा पदार्थ कायम ठेवण्यात आला असून, त्यासोबत स्वतंत्र मसाल्याचे पाकीट दिले जाणार आहे. पौष्टिक तूरडाळ खिचडी प्रीमिक्स ऐवजी आता व्हेज पुलाव उपलब्ध करण्यात येणार आहे. पौष्टिक बहुधान्य-प्रथिन मिश्रण पाककृती पूर्ववत राहणार असून, भरडधान्ययुक्त बहुधान्य-प्रथिन मिश्रण ऐवजी बहुधान्य पौष्टिक पफचा समावेश करण्यात आला आहे. या सुधारित आहाराचा लाभ अंगणवाडीतील बालके, गरोदर महिला व स्तनदा माता यांना मिळणार आहे.

महिला व बालविकास विभागाने घरपोच पोषण आहार योजनेतील पाककृतींमध्ये बदल करण्यामागे लाभार्थ्यांना अधिक पौष्टिक, रुचकर आणि स्वीकारार्ह आहार उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. बालके, गरोदर महिला आणि स्तनदा माता आहार आवडीने खावेत, यासाठी व्हेज पुलाव आणि बहुधान्य पौष्टिक पफ यांचा समावेश करण्यात आला आहे. – अंकिता पाटील, सभापती, महिला व बालविकास समिती.

जिल्ह्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ग्रामीण भागात ४ हजार ३९५ अंगणवाड्या कार्यरत आहेत. या केंद्रांमार्फत जवळपास १ लाख ६ हजार बालके, तसेच गरोदर महिला आणि स्तनदा माता यांना घरपोच पोषण आहाराचा लाभ दिला जातो. माहे नोव्हेंबर व डिसेंबर-२०२६ महिन्यापासून सुधारित घरपोच पोषण आहाराचा पुरवठा केला जाणार आहे. लाभार्थ्यांना अधिक पौष्टिक व चविष्ट आहार मिळावा, या उद्देशाने व्हेज पुलाव, मल्टीग्रेन न्युट्री पफ आणि स्वतंत्र मसाला पाकिटाचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये या सुधारित ‘खाद्यसूची’नुसार पुरवठा सुनिश्चित करण्यात येईल, अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाने दिली.

हे सुद्धा वाचा : पुणे महापालिकेची सुरक्षा ऐरणीवर; आंदोलक आतपर्यंत पोहोचल्याने नगरसेवकांकडून सवाल उपस्थित

Web Title: A major change has been made to the nutritional diet provided at anganwadis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • Anganwadi
  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

श्वास रोखायला लावणारा थरार! मायटी स्टार्सचा १ रन्सचा विजय तर…; DSP Cricket League मध्ये काय घडले?
1

श्वास रोखायला लावणारा थरार! मायटी स्टार्सचा १ रन्सचा विजय तर…; DSP Cricket League मध्ये काय घडले?

Devendra Fadnavis: ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरपासून राज्यात गाळप हंगामाला सुरुवात
2

Devendra Fadnavis: ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरपासून राज्यात गाळप हंगामाला सुरुवात

Dharashiv News: धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात विनापरवानगी वृक्षतोड? जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
3

Dharashiv News: धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात विनापरवानगी वृक्षतोड? जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Pratap Sarnaik: ॲप टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! कंपन्यांना 3 महिन्यांत द्यावी लागणार चालकांची संपूर्ण माहिती
4

Pratap Sarnaik: ॲप टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! कंपन्यांना 3 महिन्यांत द्यावी लागणार चालकांची संपूर्ण माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.