Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 30 जुलैपूर्वी खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार, कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

राज्य सरकारकडून शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीला वेग आला असून 30 जुलैपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्राथमिक यादी लवकरच जाहीर होणार असल्याचे सांगितले असून आयकर विभागाचा आवश्यक डेटा सरकारला प्राप्त झाल्यामुळे तांत्रिक अडचणी दूर झाल्याचेही स्पष्ट केले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 21, 2026 | 11:37 AM
अकोल्यातील शेतकऱ्यांना दोन कोटींची मदत; मदतीच्या रकमेतून कर्जवसुली नको, शासनाचे बँकांना स्पष्ट आदेश

अकोल्यातील शेतकऱ्यांना दोन कोटींची मदत; मदतीच्या रकमेतून कर्जवसुली नको, शासनाचे बँकांना स्पष्ट आदेश

Follow Us
Follow Us:
  • शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी!
  • 30 जुलैपूर्वी खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार
  • कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा
Maharashtra Farm Loan Waiver News Marathi : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू असताना आता 30 जुलैपूर्वी पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कर्जमाफीची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांचे लक्ष सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सहकारी मंत्र्यांना कर्जमाफीची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, आवश्यक प्रशासकीय आणि तांत्रिक प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच अंमलबजावणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

Farmers News: 15 दिवसांपासून पावसाचा पत्ता नाही; शेवगावच्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ

दरम्यान, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही कर्जमाफीबाबत एका वृत्तवाहीनीला महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, सरकारकडून कर्जमाफीची प्राथमिक लाभार्थी यादी जाहीर करण्याची तयारी पूर्ण झाली असून ती लवकरच प्रसिद्ध केली जाईल. आयकर विभागाकडून आवश्यक डेटा प्राप्त झाल्यामुळे यापूर्वी असलेल्या तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत. त्यामुळे आता कर्जमाफीची प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याशिवाय पुढे जाईल, असा दावा त्यांनी केला.

कृषीमंत्र्यांच्या माहितीनुसार, सरकारचे उद्दिष्ट 30 जुलैपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचे आहे. यामुळे पात्र शेतकऱ्यांना थेट आर्थिक दिलासा मिळणार असून आगामी खरीप हंगामासाठीही त्यांना मदत होणार आहे.

याचवेळी, राज्य सरकारने बोगस बियाण्यांच्या विरोधातही मोठी कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत बोगस बियाण्यांबाबत 11,584 तक्रारी प्राप्त झाल्या असून 81 कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे कृषीमंत्र्यांनी स्पष्ट केले.

तथापि, कर्जमाफीच्या अंमलबजावणीबाबत सरकारकडून अधिकृत शासन निर्णय (GR) आणि अंतिम पात्र लाभार्थी यादी प्रसिद्ध होणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ अधिकृत सरकारी घोषणा आणि संबंधित विभागाकडून प्रसिद्ध होणाऱ्या माहितीलाच अधिकृत मानावे.

सोयाबीन पिकाची आकडेवारी

सरासरी पेरणी क्षेत्र: 47.12 लाख हेक्टर
19 जुलै पर्यंत पेरणी झालेले क्षेत्र: 41.64 लाख हेक्टर
2. बियाणे
आवश्यक बियाणे: 13.125 लाख क्विंटल
एकूण बियाणे उपलब्धता: 18.57 लाख क्विंटल
3. तक्रारी आणि कारवाई
उगवण क्षमते बाबत तक्रारी: 11,584
मुख्यतः अकोला, अमरावती, बुलढाणा व यवतमाळ जिल्ह्यात
तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने तपासलेली प्रकरणे: 8,192
सोयाबीन पिकाची तपासणीसाठी घेतले नमुने: 7,422
बियाणे तपासणी प्रयोगशाळेद्वारे अमान्य घोषित नमुने: 763
कंपन्यांविरोधात दाखल FIR: 81

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे भाजप सरकारचे दुर्लक्ष, सत्तेतून खाली खेचल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही; काँग्रेसचा इशारा

Web Title: Maharashtra farm loan waiver implementation before 30 july beneficiary list update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 11:36 AM

Topics:  

  • Dattatray Bharne
  • devendra fadnavis
  • Farms
  • maharashtra

संबंधित बातम्या

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
1

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

महिला शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबारा नावावर नसला तरी मिळणार ‘शेतकरी’ प्रमाणपत्र; कृषिमंत्री भरणेंची घोषणा
2

महिला शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबारा नावावर नसला तरी मिळणार ‘शेतकरी’ प्रमाणपत्र; कृषिमंत्री भरणेंची घोषणा

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर
3

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर

ऐन गणेशोत्सवातही फुलांचे भाव कोमेजले; अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत
4

ऐन गणेशोत्सवातही फुलांचे भाव कोमेजले; अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.