Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

युवक काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर; नव्याने केलेल्या सर्व नियुक्त्या रद्द

युवक काँग्रेसलाही गटबाजीचे ग्रहण लागले आहे. प्रदेश शाखेच्या नव्याने करण्यात आलेल्या सर्व नियुक्त्या अखिल भारतीय युवक काँग्रेसने अवघ्या ८ तासांमध्ये रद्द केल्या आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 22, 2025 | 04:52 PM
देशातील जिल्हा काँग्रेस समितीच्या अधिकारात वाढ करणार

देशातील जिल्हा काँग्रेस समितीच्या अधिकारात वाढ करणार

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : युवक काँग्रेसलाही गटबाजीचे ग्रहण लागले आहे. प्रदेश शाखेच्या नव्याने करण्यात आलेल्या सर्व नियुक्त्या अखिल भारतीय युवक काँग्रेसने अवघ्या ८ तासांमध्ये रद्द केल्या आहेत. त्याबरोबरच ज्यांनी कोणी या नियुक्त्या केल्या त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत व अखिल भारतीय युवक काँग्रेसचे पदाधिकारी यांच्यातील मतभेद यातून उघड झाले आहे. प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आता कोणामागे रहायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राऊत यांची प्रदेशाध्यक्षपदाची मुदत लवरच संपुष्टात येत आहे. त्यांची संमती नसताना केंद्रीय युवक काँग्रेसने राज्यासाठी कार्याध्यक्ष या पदाची निर्मिती करून त्यावर नियुक्तीही केली. राऊत यांना ही नियुक्ती मान्य नव्हती. तेव्हापासूनच मतभेदांची सुरूवात झाली. त्याचा परिणाम युवक काँग्रेसने जाहीर केलेल्या विधानसभेला घेराव या कार्यक्रमावर झाला. लाल महाल (पुणे) ते विधानसभा अशी ५ दिवसांची पदयात्रा करून हा घेराव घालण्यात येणार होता. मात्र पुण्यातच ही यात्रा अडवण्यात आली. त्यानंतर पुढे या यात्रेचा सगळा उत्साहच संपला. विधानसभेचा घेरावही कसाबसा पार पडला. यात्रेतून मधूनच अनेक कार्यकर्ते गायब झाले. काँग्रेसच्या बड्या नेत्यांनीही या यात्रेकडे फारसे लक्ष दिले नाही.

राऊत यांनी घेतली नव्हती मान्यता

कुणाल राऊत यांनी अचानक गुरूवारी रात्री नागपूरातून प्रदेश युवक काँग्रेसच्या नव्या नियुक्त्या जाहीर केल्या. यात २० प्रदेश उपाध्यक्ष, ८ कार्याध्यक्ष व अन्य अनेक नियुक्त्या होत्या. केंद्रीय समितीच्या नियमांप्रमाणे प्रदेशाध्यक्षांसह कोणालाही कसलीही नियुक्ती करायची असेल तर त्यासाठी केंद्रीय समितीची मान्यता लागते. राऊत यांनी अशी कोणताही मान्यता घेतली नव्हती. त्यामुळे केंद्रीय समितीने तातडीने दिल्लीहून पत्रक प्रसिद्ध करून फक्त ८ तासांमध्ये या सर्व नियुक्त्या रद्द करून टाकल्या. केंद्रीय समितीमध्ये राष्ट्रीय सचिव असलेल्या एहसान खान, कुमार रोहित, अजय चिंकारा यांच्या या पत्रकावर स्वाक्षऱ्या आहेत. याच पत्रकात त्यांनी कोणत्याही मान्यतेशिवाय कोणाचीही नियुक्ती करणे ही गंभीर व शिस्तभंग करणारी गोष्ट आहे असे म्हटले आहे. तसेच ज्यांनी कोणी या नियुक्त्या केल्या, त्याचा शोध घेऊन संबधितांवर कारवाई केली जाईल असा इशाराही दिला आहे.

Web Title: All new appointments in youth congress have been cancelled nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2025 | 04:52 PM

Topics:  

  • Harshvardhan Sapkal
  • maharashtra
  • Maharashtra Congress
  • Rahul Gandhi
  • youth congress

संबंधित बातम्या

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
1

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…
2

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…

Rahul Gandhi Bihar News: महाराष्ट्रात १ कोटी, कर्नाटकात १ लाख मतांची चोरी….; बिहारमधून राहुल गांधींचा पुन्हा आयोगावर हल्ला
3

Rahul Gandhi Bihar News: महाराष्ट्रात १ कोटी, कर्नाटकात १ लाख मतांची चोरी….; बिहारमधून राहुल गांधींचा पुन्हा आयोगावर हल्ला

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्तांची घेतली भेट; केली ‘ही’ मोठी मागणी
4

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्तांची घेतली भेट; केली ‘ही’ मोठी मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.