Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रचाराच्या ताेफा थंडावल्या, उमेदवारांनी पिंजून काढला मतदारसंघ; विजयाचा सर्वांचा दावा

पुणे शहरातील आठही उमेदवारांनी प्रचाराची सांगता केली. तसेच पत्रकार परीषदेत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी आपल्या जागा जास्त निवडुन येतील असा दावा केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 19, 2024 | 01:15 PM
प्रचाराच्या ताेफा थंडावल्या, उमेदवारांनी पिंजून काढला मतदारसंघ; विजयाचा सर्वांचा दावा

प्रचाराच्या ताेफा थंडावल्या, उमेदवारांनी पिंजून काढला मतदारसंघ; विजयाचा सर्वांचा दावा

Follow Us
Close
Follow Us:

पुणे/महेंद्र बडदे : वाहन रॅलीच्या माध्यमातून संपुर्ण मतदारसंघ पिंजून काढत शहरातील आठही उमेदवारांनी प्रचाराची सांगता केली. तसेच पत्रकार परीषदेत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी आपल्या जागा जास्त निवडुन येतील असा दावा केला आहे. पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात प्रचाराच्या अखेरच्या दिवशी जाेरदार प्रचार केला गेला. महाविकास आघाडी, महायुती यांच्यातच प्रमुख मतदारसंघात लढत हाेणार आहे. तर काही ठिकाणी मनसेमुळे लढत तिरंगी हाेण्याची चिन्हे आहेत. अपक्ष आणि बंडखाेर उमेदवारांनी देखील जाेरदार प्रचार करून पक्षाच्या उमेदवारांना घाम फाेडला आहे. गेल्या पंधरा दिवसापासून सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पुण्यात पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची सभा पार पडली. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या सभा पार पडल्या.

तसेच उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात, उत्तराखंड आदी राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी या प्रचारात सहभाग घेतला. पुण्यातील विविध मतदारसंघात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभा घेत रंगत भरली. शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार डाॅ. अमाेल काेल्हे , संजय राऊत , बाळासाहेब थाेरात, आदी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सभा घेऊन प्रचारात धुराळा उडविला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा मात्र, पुण्यात झाली नाही. गेल्या दाेन आठवड्यापासून सुरु असलेल्या प्रचाराची साेमवारी सांगता झाली. साेमवारी काॅंग्रेसकडून तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, अंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आमदार वीनेश फाेगाट यांनी सहभाग घेतला. केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी सहभाग घेतला.

रॅलींमुळे वाहतुक काेंडीत भर

शहराच्या बहुतेक भागात उमेदवारांकडून वाहन रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले गेलेे. हलगी, ढाेली बाजा वाजवित, पक्षाचे आणि चिन्हाचे झेंडे नाचवित, तसेच उमेदवाराच्या नावाचा जयघाेष करणारे कार्यकर्ते असे चित्र या रॅलीत पाहण्यास मिळाले. रॅलीला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे आधीच वाहतुक काेंडी असणाऱ्या रस्त्यांवरील काेंडीत भर पडली.

हे सुद्धा वाचा : मतदानाच्या दिवशी पुणे शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तब्बल ‘इतके’ कर्मचारी असणार तैनात

प्रचारात काय मुद्दे गाजले?

गेल्या पंधरा दिवसापासून सुरु असलेल्या निवडणुक प्रचारात सत्ताधारी महायुतीकडून लाडकी बहीण याेजना, बेराेेजगारांना देण्यात येणारी मदत आदी याेजनांवर भर दिला गेला. विशेषत: काॅंग्रेसवर माेठ्या प्रमाणावर टिका केली गेली. जात, आरक्षण, संविधानात बदल आदी विषयांवर महायुतीच्या नेत्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला गेला. तर महाविकास आघाडीकडून महायुतीच्या सरकारवर जाेरदार टिका करून त्यांच्या आराेपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला गेला. तसेच राज्याची आर्थिक स्थिती, गद्दारी आदी विषय मांडले गेले. स्थानिक पातळीवर प्रचार करताना, सत्ताधारी पक्षांच्या उमेदवारांकडून केलेल्या कामांची आकडेवारी सादर केली गेली. तर विराेधी उमेदवारांकडून सत्ताधाऱ्यांनी काहीच विकास केला नसल्याचा आराेप केला गेला.

Web Title: All the candidates of pune city have campaigned vigorously for the assembly elections nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2024 | 01:14 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Election
  • maharashtra
  • Nationalist Congress Party
  • pune news

संबंधित बातम्या

इच्छाशक्तीच्या अभावामुळेच शहराची अवस्था बिकट; पुण्यातून अजित पवारांची नाराजी व्यक्त
1

इच्छाशक्तीच्या अभावामुळेच शहराची अवस्था बिकट; पुण्यातून अजित पवारांची नाराजी व्यक्त

Shivsena : “होमवर्क न केलेल्या मुलांचे अर्धवट वर्कशॉप”, आदित्य आणि अमित ठाकरेंवर शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळे यांची घणाघाती टीका
2

Shivsena : “होमवर्क न केलेल्या मुलांचे अर्धवट वर्कशॉप”, आदित्य आणि अमित ठाकरेंवर शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळे यांची घणाघाती टीका

Chikhaldara Skywalk : मे पर्यंत पूर्ण होणार स्कायवॉक! आता पर्यटकांसाठी नवे थरार; देशातील पहिला काचेचा स्कायवॉक
3

Chikhaldara Skywalk : मे पर्यंत पूर्ण होणार स्कायवॉक! आता पर्यटकांसाठी नवे थरार; देशातील पहिला काचेचा स्कायवॉक

Ladki Bahin Yojana : धक्कादायक! ‘लाडक्या बहिणीं’चे संकेतस्थळ बंद, ग्रामीण भागात अडचणी
4

Ladki Bahin Yojana : धक्कादायक! ‘लाडक्या बहिणीं’चे संकेतस्थळ बंद, ग्रामीण भागात अडचणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.