Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आपण पहिल्यांदाच पंकजा मुंडेंना धोका दिला..’; बीडमध्ये कथित व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे खळबळ

लोकसभा निवडणुकीत आपण भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना धोका दिला, अशा प्रकारचा संभाषण असलेली  एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 28, 2024 | 12:47 PM
सौजन्य- Team Navrashtra

सौजन्य- Team Navrashtra

Follow Us
Close
Follow Us:

बीड :  लोकसभा निवडणुकीच्या निकालाला जवळपास २० दिवस उलटून गेल्यानंतर एक धक्कादायक ऑडियो क्लीप समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीत आपण भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना धोका दिला, अशा प्रकारचा संभाषण असलेली  एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी झालेल्या या कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाल्याने  राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

व्हायरल झालेली ऑडिओ क्लिपही  बीडचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आणि शरद पवार यांच्या गटाचे शिवराज बांगर यांची कथित ऑडिओ क्लिप असल्याचे सांगितले जात आहे. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये कुंडलिक खांडे यांनी शरद पवार यांच्या गटाचे  उमेदवार बजरंग सोनवणेंना मदत केल्याची कबुली दिली आहे.  इतकेच नव्हे तर, या ऑडिओ क्लिपमध्ये कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या ताफ्यावर हल्ला केल्याचाही संवाद आहे.  त्यानंतर कुंडलिक खांडेंविरोधात परळीत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये आपण शरद पवार यांच्या गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना कशाप्रकारे मदत केली असा संवाद आहे. यात ते निवडणुकीपूर्वीच बजरंग सोनवणे यांना कशी मदत करायची हे ते सांगत आहेत. तर, मतमोजणीनंतर व्हायरल झालेली दुसरी ऑडिओ क्लिप आहे. कुंडलिक खांडेंच्या मूळ गावातून म्हणजे म्हाळस जवळा या ठिकाणी आपण पंकजा मुंडेंना मुद्दामून लीड दिली. तर ओबीसी मतांचा फायदा होऊ शकतो या उद्देशाने  आपण बीड विधानसभा मतदारसंघातील सर्व बुथवर बजरंग सोनवणे यांच्यासाठी कशा पद्धतीने जुळवाजुळव केली, हे ते सांगताना ऐकू येत आहे.

दरम्यान,  ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पंकजा मुंडेंचे समर्थक आक्रमक झाल्यानंतर त्यांनी खांडे यांच्या ऑफिसची तोडफोडही केल्याची माहिती समोर आली आहे. जालना रोडवरील खांडेंच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला होता.  भाजपाच्या बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बीडमध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना पराभवाचा सामना करावा लागला. शेवटच्या फेरीपर्यंत या सोनावणे आणि पंकजा मुंडे यांच्यात निर्णायक लढत झाली. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या गटाचे बजरंग सोनावणे विजयी झाले. सुरुवातीला पंकजा मुंडेचा हा पराभव मराठा विरुद्ध ओबीसी फॅक्टरमुळे झाल्याची चर्चा होती.  त्यातच  महायुतीतील मतभेदांचाही फटका बसल्याचे सांगितले जाते.

 

Web Title: Alleged viral audio of threatening pankaja munde a case has been registered against kundlik khande

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2024 | 12:47 PM

Topics:  

  • BJP
  • loksabha election 2024
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Maharashtra Winter Session: राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास आजपासून सुरूवात; सरकारकडून कोणत्या घोषणा होणार?
1

Maharashtra Winter Session: राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास आजपासून सुरूवात; सरकारकडून कोणत्या घोषणा होणार?

Duplicate Voters Allegation: एकाच नावासमोर वेगवेगळे फोटो, एकाच पत्त्यावर १००-१५० मतदार; कळमकरांचे गंभीर आरोप
2

Duplicate Voters Allegation: एकाच नावासमोर वेगवेगळे फोटो, एकाच पत्त्यावर १००-१५० मतदार; कळमकरांचे गंभीर आरोप

Nanded Crime News: नांदेडमध्ये आदिवासी कुटुंबावर दबावाचा आरोप; आमदारांच्या कुटुंबीयांची चौकशीची मागणी
3

Nanded Crime News: नांदेडमध्ये आदिवासी कुटुंबावर दबावाचा आरोप; आमदारांच्या कुटुंबीयांची चौकशीची मागणी

Maharashtra Politics: महायुतीचा मोठा निर्णय: घटक पक्षातील नेत्यांना ‘क्रॉस ओव्हर’वर बंदी
4

Maharashtra Politics: महायुतीचा मोठा निर्णय: घटक पक्षातील नेत्यांना ‘क्रॉस ओव्हर’वर बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.