
Jaggery Price Hike: साखरेबरोबर गुळाचेही भाव वाढले (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
सणासुदीच्या काळात चहा, फराळ, मिठाई तसेच विविध खाद्यपदार्थांसाठी साखर व गुळाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्यामुळे दरवाढीचा थेट परिणाम गृहिणींच्या बजेटवर होणार आहे. लहान व्यावसायिक आणि मिठाई विक्रेत्यांनाही वाढलेल्या दरांचा आर्थिक फटका बसत आहे. पिशोरमध्ये गावरान गुळाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन पिशोर परिसरात गावरान गुळाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. यंदाही परिसरातील अनेक गुऱ्हाळे सुरू होती. Jaggery Price Hike:
या गुन्हाळांतून उत्पादित गूळ व्यापा-यांकडून पाचोरा येथील कोल्ड स्टोरेजमध्ये साठवून ठेवला जातो. बाजारात मागणी वाढल्यानंतर हा गूळ विक्रीसाठी आणला जातो. गुळाचे व्यापारी सचिन नवले यांनी सांगितले की, साखरेचे दर वाढल्याने ग्राहकांचा कल गुळाकडे वाढला आहे. त्यामुळे गुळाच्या मागणीतही वाढ झाली असून, दरात सुमारे २० रुपयांची वाढ झाली आहे.
Buldhana News: एसटी बस-टिप्परच्या धडकेत १ ठार ६ जण जखमी; चिखली-खामगाव महामार्गावर घडला अपघात
सध्या गावरान गुळाची विक्री १०० रुपये प्रतिकिलो दराने होत आहे. साखर आणि गुळाच्या वाढलेल्या दरामुळे आगामी सणासुदीच्या काळात नागरिकांच्या खर्चात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरवाढीवर नियंत्रण कधी येणार आणि आगामी काळात साखर-गुळाचे भाव आणखी वाढणार की कमी होणार, याकडे नागरिकाचे लक्ष लागले आहे.
Nashik Phata Khed Corridor: नाशिक फाटा ते खेड कॉरिडॉरचा मार्ग मोकळा; भूसंपादनासाठी १७५ कोटी मंजूर