सुरेश चव्हाण
Thyroid: थायरॉईड नियंत्रणात ठेवायचंय? आहारात करा ‘हे’ बदल, शरीर राहिल निरोगी
अनेकांना यातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे रोजगार उपलब्ध होत असे. आता फक्त ही संख्या पाच ते सहा इतकी मर्यादीत झाली आहे. कारण गुळ निर्मिती व्यवसायात खर्च खूप वाढला आहे. ऊस तोडणी, वाहतूक खर्च, प्रत्यक्ष गुळ निर्मिती, मजुरी वाढली. त्यामूळे गुऱ्हाळे एक एक करीत बंद पड़त गेली. परिसरातील गुळ बनविण्याची प्रक्रिया पूर्णपणे नैसर्गिक असल्याने सहाजिकच या गुळाला वेगळी चव असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना या तीन जिल्हयात पिशोर आणि परिसरातील गूळ प्रसिद्ध आहे. येथील गुळाला वर्षभर मागणी असते. शेतात लागवडी नंतर एका वर्षात ऊस काढणीला येतो, आता गुळाला ज्यादा भाव असल्याने अनेक जण उसापासून गुळ बनवून विकणे फायदेशीर समजतात. पण त्यातही आता गुऱ्हाळासाठी मजुरांची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यातच वाढता खर्च यामुळे गूळ निर्मिती खर्चिक झाली आहे. गूळ तयार करतांना भेंडी अथवा शेवरी वृक्षाचा वापर केला जातो. या दोन्ही वृक्ष आयुर्वेदीक आहेत.
आयुर्वेदाकडे लोकांचा कल वाढल्याने प्रत्येकजण आता साखरेऐवजी गुळाचा वापर वाढवित आहेत. याचाच परिणाम म्हणून साखरेऐवजी गुळाच्या चहाला पसंती वाढू लागली आहे. ग्राहकांची ही पसंती पाहुन ठिकठिकाणी’ गुळाचा चहा असलेल्या हॉटेल दिसू लागल्या आहेत. पूर्वी ४१९ प्रजातीचा ऊस गुळ करण्यासाठी वापरला जात होता. ऊसाची ही प्रजात नष्ट होत चालल्याने ८६०३२ या प्रजातीच्या गुळाला बाजारात मागणी आहे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.






