Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

थायलंडमधील गणेशभक्ताकडून ‘दगडूशेठ’ला रुग्णवाहिका ; फुकेत येथील पापासॉर्ण मिपा यांच्यातर्फे ट्रस्टच्या सेवेत  दोन गाड्या दाखल

श्रीमंत दगडूशेठ गणपतीची ख्याती भारताबाहेरही आहे. थायलंड फुकेत येथून अनेक भाविक दरवर्षी पुण्यात दर्शनाला येतात. त्यातील एक भक्त, फुकेत येथील रहिवासी पापासॉर्ण मिपा यांनी दगडूशेठच्या सामाजिक कार्याला हातभार लावत जय गणेश रुग्णसेवा अभियानाकरिता दोन रुग्णवाहिका दिल्या आहेत.

  • By Aparna
Updated On: Dec 04, 2023 | 07:30 PM
Dagdusheth-Halwai-ganapati

Dagdusheth-Halwai-ganapati

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची ख्याती भारताबाहेरही आहे. थायलंड फुकेत येथून अनेक भाविक दरवर्षी पुण्यात दर्शनाला येतात. त्यातील एक भक्त, फुकेत येथील रहिवासी पापासॉर्ण मिपा यांनी दगडूशेठच्या सामाजिक कार्याला हातभार लावत जय गणेश रुग्णसेवा अभियानाकरिता दोन रुग्णवाहिका दिल्या आहेत.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाकडे पापासॉर्ण मिपा यांनी या रुग्णवाहिका सुपूर्द केल्या. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे यांसह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पापासॉर्ण मिपा म्हणाल्या, भारतीयांना आणि दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या कार्याला मदत देण्याच्या उद्देशाने या रुग्णवाहिका मी देत आहे. ट्रस्ट गोरगरीब वंचितांना मदत देण्यासोबत विविध रुग्णालयांच्या माध्यमातून आरोग्यसेवा देत आहे. आमचे देखील भाग्य आहे की आम्ही ट्रस्टच्या या सामाजिक कार्याचा यामाध्यमातून छोटासा भाग होऊ शकलो.

कोण आहेत पापासॉर्ण मिपा
फुकेत मधील यशस्वी उद्योजिका म्हणून त्यांची ओळख आहे. फुकेत ९ रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी त्यांची आहे. त्या फुकेत येथे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासारखे मंदिर उभारत आहेत. बांधकाम क्षेत्रात त्यांना मिळालेले यश हे दगडूशेठ गणेशामुळेच मिळाले असल्याची भावना त्यांनी पुण्यात व्यक्त केली. थायलंडहून अनेकांना पुण्यात दर्शनासाठी येण्याची इच्छा आहे, मात्र अंतर खूप असल्याने शक्य होत नाही. याकरिता मी फुकेत येथे मंदिर उभारत आहे, असे त्यांनी सांगितले.

ट्रस्टची अविरतपणे आरोग्यसेवा सुरु
दगडूशेठ सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या जय गणेश रुग्णसेवा अभियान अंतर्गत भारती हॉस्पीटल रिसर्च सेंटर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच जय गणेश प्रांगण येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ३७८ नागरिकांनी वैद्यकिय सुविधेचा लाभ घेण्यासाठी सहभाग नोंदविला. ११३ नागरिकांच्या विविध शस्त्रक्रिया मोफत करून देण्यात येणार आहेत. याशिबिरामध्ये आयुष्य भारत योजनेचे गोल्डन कार्ड ९२ लोकांना मोफत स्वरुपात काढून देण्यात आले. रुग्णसेवा अभियान अंतर्गत लायन्स क्लब आॅफ कात्रज पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गोकुळ नगर कात्रज कोंढवा रोड भागातील ६८ नेत्र रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया एच.व्ही.देसाई नेत्र रुग्णालय यांच्या वतीने करून देण्यात आली.

Web Title: Ambulance to dagdusheth from ganesha devotees in thailand two cars entered into the service of the trust by papasorna mipa from phuket nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2023 | 07:29 PM

Topics:  

  • maharashtra
  • maharashtra news
  • Pune
  • pune news

संबंधित बातम्या

Maratha Reservation: “…असं मला वाटत नाही”; मंत्री उदय सामंत यांची जरांगे पाटलांवर प्रतिक्रिया
1

Maratha Reservation: “…असं मला वाटत नाही”; मंत्री उदय सामंत यांची जरांगे पाटलांवर प्रतिक्रिया

जल्लोषपूर्ण वातावरणात भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा
2

जल्लोषपूर्ण वातावरणात भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा

सह्याद्री हॉस्पिटलचा यकृत प्रत्यारोपण परवाना स्थगित; रुग्णांचा मृत्यू झाल्याने घेण्यात आला निर्णय
3

सह्याद्री हॉस्पिटलचा यकृत प्रत्यारोपण परवाना स्थगित; रुग्णांचा मृत्यू झाल्याने घेण्यात आला निर्णय

Pune News : खडकवासला बोगद्याला पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी, आठवडाभरात खोदकामाला होणार सुरुवात
4

Pune News : खडकवासला बोगद्याला पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी, आठवडाभरात खोदकामाला होणार सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.