Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amit Shah UCC Statement : अमित शाहांचा मोठा दावा! लवकरच लागू करणार समान नागरी कायदा

Amit Shah UCC Statement : केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभर ‘सेवा संकल्प अभियान’ राबवण्याची घोषणा केली. याचवेळी समान नागरी कायदा 2029 पर्यंत लागू करण्याबाबत मोठा दावा केला.

  • By विवेक
Updated On: Sep 13, 2026 | 08:47 PM
Amit Shah

Amit Shah

Follow Us
Follow Us:
  • 2029 पर्यंत समान नागरी कायदा लागू करण्याचा अमित शाहांचा दावा
  • मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभर एक महिना ‘सेवा संकल्प अभियान’
  • रक्तदान, सेवा ज्योती कलश यात्रा आणि सरकारी योजना पोहोचवण्यासह 12 कलमी कार्यक्रम
 

Amit Shah UCC Statement : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत देशभरात आता ‘सेवा संकल्प अभियान’ राबवण्यात येणार आहे. तब्बल एक महिना चालणाऱ्या या अभियानाच्या माध्यमातून विविध विकासकामं हाती घेतली जाणार असून, केंद्रातील एनडीए सरकारने आतापर्यंत केलेल्या कामांची माहितीही जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत या अभियानाची घोषणा केली.

यावेळी अमित शाह यांनी समान नागरी कायद्याबाबतही मोठं वक्तव्य केलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, एनडीएच्या सत्तेत असलेल्या 21 राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याच्या दिशेने पावलं उचलली जातील. तसेच 2029 पर्यंत UCC बाबत निर्णय घेतला जाईल, असं शाह यांनी सांगितलं.

देशभरात सेवा संकल्प अभियानाचा धडाका

‘सेवा संकल्प अभियानाअंतर्गत तब्बल 12 कलमी कार्यक्रम राबवला जाणार आहे. यामध्ये रक्तदान, ‘आभार’, ‘नमो सेवा’, संगीत-नाट्यमय सादरीकरण, अंगणवाडी सेवा यांसारख्या उपक्रमांचा समावेश आहे. याशिवाय ‘सेवा ज्योती कलश यात्रा’, वाडनगर ते वाराणसी यात्रा आणि वाराणसी ते वाडनगर यात्रेचंही आयोजन केलं जाणार आहे.

Amit Shah : ‘2014 आधी देश भ्रष्टाचार-जातीवाद-परिवारवादाने ग्रासला होता’; शाहांचा मोदींच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीवर मोठा दावा

सरकारी योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘सेवा सेतू अभियान’ राबवलं जाणार आहे. ब्लॉक आणि तालुका स्तरावर सरकारी योजना पोहोचवण्यावरही विशेष भर दिला जाणार असल्याचं शाह यांनी सांगितलं.

मोदी सरकारच्या कामांचा शाहांकडून पाढा

दरम्यान, अमित शाह यांनी मोदी सरकारच्या काळातील विविध निर्णय आणि कामांचा उल्लेख केला. कलम 370 रद्द करणं, अयोध्येतील राम मंदिराची उभारणी आणि चांद्रयान-3 यांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. त्याचबरोबर देशातील रेल्वे व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर आधुनिकीकरण करण्यात आल्याचंही शाह म्हणाले.

याशिवाय देशातील घुसखोरांचा मुद्दाही शाह यांनी उपस्थित केला. देशातील एकएक घुसखोराला बाहेर काढू, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.

एकूणच, मोदींच्या वाढदिवसानिमित्त जाहीर करण्यात आलेलं सेवा संकल्प अभियान आणि UCC बाबत अमित शाहांनी केलेलं वक्तव्य यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण येण्याची शक्यता आहे.

Amit Shah Maharashtra Visit : अमित शहांचा महाराष्ट्र दौरा की ‘मेवा संकल्प अभियान’? हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

Web Title: Amit shah ugc statement ucc implementation by 2029

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 08:47 PM

Topics:  

  • Amit Shah
  • PM Narendra Modi
  • uniform civil code

संबंधित बातम्या

BRICS Summit : मोदींच्या गाला डिनरला जिनपिंग गैरहजर; ‘डिनर’ टाळल्याने चर्चांना उधाण!
1

BRICS Summit : मोदींच्या गाला डिनरला जिनपिंग गैरहजर; ‘डिनर’ टाळल्याने चर्चांना उधाण!

Amit Shah : ‘2014 आधी देश भ्रष्टाचार-जातीवाद-परिवारवादाने ग्रासला होता’; शाहांचा मोदींच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीवर मोठा दावा
2

Amit Shah : ‘2014 आधी देश भ्रष्टाचार-जातीवाद-परिवारवादाने ग्रासला होता’; शाहांचा मोदींच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीवर मोठा दावा

Amit Shah Maharashtra Visit : अमित शहांचा महाराष्ट्र दौरा की ‘मेवा संकल्प अभियान’? हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात
3

Amit Shah Maharashtra Visit : अमित शहांचा महाराष्ट्र दौरा की ‘मेवा संकल्प अभियान’? हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

BRICS Summit 2026 : पंतप्रधान मोदी आणि इजिप्त राष्ट्राध्यक्ष अल सिसी यांची द्विपक्षीय चर्चा; नवी दिल्ली जाहीरनामा मंजूर
4

BRICS Summit 2026 : पंतप्रधान मोदी आणि इजिप्त राष्ट्राध्यक्ष अल सिसी यांची द्विपक्षीय चर्चा; नवी दिल्ली जाहीरनामा मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.