Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सभेला तुफान गर्दी; अन् एकही सीट नाही, मनसेला महाराष्ट्राने नाकारले; अमित ठाकरेंनी दिली पहिली प्रतिक्रिया

आज विधानसभा निवडणुकीत माझ्या जनतेने जो कौल दिला, तो मी विनम्रपणे स्वीकारतो, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी ट्विट करीत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Nov 23, 2024 | 08:48 PM
Amit Thackeray's first reaction on Maharashtra Assembly Result 2024

Amit Thackeray's first reaction on Maharashtra Assembly Result 2024

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra Assembly Result 2024 : महाराष्ट्राच्या हायव्होल्टेज विधानसभा निवडणुकीचे आज निकालसुद्धा विरोधकांना अनाकलनीय असेच होते. भाजप महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. तर आघाडीची यावेळी चांगलीच गोची झाली. तर यासर्वांमध्ये सर्वांचे लक्ष्य वेधून घेणारा आणखी एक मोठा पक्ष होता तो म्हणजे राज ठाकरेंचा मनसे. परंतु, मनसेला स्पष्टपणे महाराष्ट्राच्या जनतेने नाकारल्याचे पाहायला मिळाले.

जनतेचा कौल मान्य

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज लागले आहेत. आतापर्यंत समोर आलेल्या निकालानुसार राज्यात महायुतीचा झंझावात पाहायला मिळला. महायुतीला तब्बल 231 जागा मिळाल्या आहेत. तर मविआला 45 जागा मिळाल्या. 133 जागांवर आघाडी मिळवत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून, भाजपचे हे यश आजपर्यंतचे सर्वात मोठे यश ठरले आहे. यामध्ये मनसेला महाराष्ट्रात आपले खातेसुद्धा उघडता आले नाही. मनसेचा एकही उमेदवार या निवडणुकीत निवडून आला नाही. यावर राज ठाकरे यांनी अविश्वसनीय एवढीच प्रतिक्रिया दिली, तर अमित ठाकरे यांनी ट्विट करीत माझ्या जनतेने दिलेला कौल, मी नम्रपणे स्वीकारतो, असे म्हटले.

माहिमच्या पराभवानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया

माहिम, दादर आणि प्रभादेवीतील जनतेचा कौल मला मान्य आहे… आज विधानसभा निवडणुकीत माझ्या जनतेने जो कौल दिला, तो मी विनम्रपणे आणि अत्यंत आदराने स्वीकारतो. pic.twitter.com/0zLkpi7ZNQ — Amit Thackeray (@amitrthackeray) November 23, 2024

हेही वााचा : वाई मतदारसंघात मकरंद आबांचा बोलबाला; मकरंद पाटील यांचा विजयी चौकार; ६१ हजारहून अधिक मताधिक्य

राज ठाकरे ठरले अपयशी

एरवी राज ठाकरेंच्या सभेला नेहमीप्रमाणेच तुफान गर्दी पाहायला मिळाली. परंतु, त्याचे मतात रूपांतर करण्यात ते कमी पडले असेच म्हणावे लागेल. त्यांचा एकही उमेदवार यावेळी निवडून आला नाही. खुद्द राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेसुद्धा माहीममध्ये अपयशी ठरले. त्यांना 33062 मते पडली तर उद्धव ठाकरेंचे उमेदवार 50213 मते घेऊन विजयी झाले. तर शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकरसुद्धा पराभूत झाले. त्यांना 48897 मते पडली. आपला पराभव मान्य करीत अमित ठाकरेंनी ट्विट यावर ट्विट करीत प्रतिक्रिया दिली.

वरळीत आदित्य ठाकरेंनी गड राखला

पण, आदित्य ठाकरेंच्या या विजयात काका राज ठाकरे यांचा मोठा वाटा असल्याचे म्हटलं जात आहे. राज ठाकरे नसते तर आदित्य ठाकरे यावेळी विधानसभेत पोहोचू शकले नसते. आदित्य ठाकरे यांच्या वरळीच्या जागेवर तिरंगी लढत होती. या जागेवरून शिवसेनेच्या शिंदे गटाने मिलिंद मुरली देवरा यांना उमेदवारी दिली होती. आदित्य ठाकरे यांना ६०,६०६ तर मिलिंद देवरा यांना ५२,१९८ मते मिळाली. आदित्य केवळ 8408 मतांनी विजयी झाले.

निवडणुकीचे निकाल धक्कादायक

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक आहेत. महायुतीच्या एकतर्फी विजयात अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीला केवळ 58 जागा मिळत आहेत. त्यातही काँग्रेस 15, शिवसेना 27 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद गट 11 जागांवर विजयी होताना दिसत आहे. त्याचबरोबर मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे ही मोठी नावे आहेत. आदित्य ठाकरे वरळीतून, तर अमित ठाकरे मुंबईत माहीममधून निवडणूक लढवत होते. वरळीतून आदित्य ठाकरे विजयी झाले आहेत तर माहीममधून अमित पराभूत झाले आहेत.

संदीप देशापांडे मनसेकडून वरळीतले उमेदवार

आता यात राज ठाकरेंची भूमिका काय असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. राज ठाकरे यांनी आपल्या पक्षातून संदीप देशपांडे यांना येथून उमेदवारी दिली होती. देशपांड यांना 18858 मते मिळाली आहेत. देशपांड यांनी कुठेतरी महाविकास आघाडीविरोधी मतांमध्ये फूट पाडण्याचे काम केले. एमव्हीए विरोधी मतांचे विभाजन झाले नसते तर आदित्य ठाकरेंना अवघड गेले असते. म्हणजे शेवटी काकांनी आदित्यला विधानसभेत जाण्याचा मार्ग मोकळा केला.

हेही वाचा : मुलाचा पराभव लागला जिव्हारी, जनतेला उद्देशून राज ठाकरेंनी केले ट्विट, म्हणाले….अविश्वसनीय!

 

Web Title: Amit thackerays first reaction on maharashtra assembly result 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2024 | 08:45 PM

Topics:  

  • amit thackeray
  • raj thackeray

संबंधित बातम्या

‘गनिमी कावा’, अनेक महिने गुंडाळून ठेवलेल्या शिवस्मारकाचे अमित ठाकरे यांच्या हस्ते अनावरण
1

‘गनिमी कावा’, अनेक महिने गुंडाळून ठेवलेल्या शिवस्मारकाचे अमित ठाकरे यांच्या हस्ते अनावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.