Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तुमच्या पक्षात असतील तर वाघ, दुसरीकडे गेले की वेश्या?’; राज ठाकरेंच्या टीकेला संजय शिरसाट यांचा पलटवार

राज ठाकरे यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर केलेल्या 'देहविक्री'च्या टीकेनंतर शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. पक्ष सोडून जाणाऱ्यांना दोष देण्यापेक्षा कार्यकर्ते टिकवण्यात अपयश का आले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

  • By विवेक
Updated On: Jul 02, 2026 | 03:24 PM
दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

Follow Us
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षांतर, आमदार-खासदारांच्या फुटी आणि सध्याच्या राजकारणावर केलेल्या परखड टीकेनंतर शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत, पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांबाबत अशी भाषा वापरणे योग्य नसल्याचे म्हटले.

राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, “प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाही, विकले जाणाऱ्यांचा आहे. देहविक्रीला तयार असतील तर गिऱ्हाईक मिळणारच. सध्या जे राजकारण सुरू आहे ते अत्यंत घाणेरडं आहे,” अशी टीका केली होती. त्यांच्या या विधानावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

संजय शिरसाटांचा पलटवार

यावर प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट म्हणाले, “राज ठाकरे यांनी कोणत्या आधारावर हे वक्तव्य केलं, तेच समजत नाही. तुमच्या पक्षात असतील तर ते वाघ आणि दुसऱ्या पक्षात गेले की त्यांना वेश्या म्हणणं हे चुकीचं आहे.”

Sanjay Raut vs BJP: ‘ED आणि CBI आमच्या ताब्यात द्या, १० मिनिटांत भाजपचे १० तुकडे करू” संजय राऊतांचे थेट आव्हान

ते पुढे म्हणाले, “प्रत्येक पक्षात मतभेद असतात. पक्षश्रेष्ठी वेळ देत नसतील, कार्यकर्त्यांच्या भावना ऐकल्या जात नसतील, तर त्यांनी कायम दबूनच राहावं का? गद्दार, खोके घेतले अशा आरोपांपेक्षा स्वतःच्या पक्षातील कार्यकर्ते आणि नेते टिकवण्यात अपयश का आलं, याचाही विचार झाला पाहिजे.”

काय म्हणाले होते राज ठाकरे ?

राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजप महायुतीवर जोरदार टीका केली होती. खासदार आणि आमदारांच्या बंडखोर गटांवर टीका करताना ते म्हणाले, “सध्या प्रश्न ‘खरेदी कोण करतंय’ हा नाही, तर ‘विकले जाण्यास कोण तयार आहे’ हा आहे. जर ते देहविक्रीला तयार असतील, तर खरेदीदार नेहमीच मिळतील. राजकारण्यांना आपण कशा प्रकारचा पायंडा पाडत आहोत, याची जाणीव नाही. आपण देशाला कोणत्या दिशेने नेत आहोत?”

रोहित पवारांपेक्षा अमोल कोल्हेंच्या मताला अधिक महत्त्व

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार यांच्या अलीकडील विधानांवरही संजय शिरसाट यांनी भाष्य केले.

ते म्हणाले, “अमोल कोल्हे हे पक्षाचे नेते आणि प्रवक्ते आहेत. त्यांनी केलेल्या विधानामागे पक्ष नेतृत्वाची भूमिका असण्याची शक्यता आहे. रोहित पवार जे बोलतात, तेच शरद पवार यांचं अंतिम मत असतं असं नाही. अनेकदा वेगळी भूमिका घेतली जाते.”

Raj Thackeray on BJP: ‘भाजपचा हा राजकीय जुगार अंगलट येणार, सत्तेचा बंगला कोसळणार’; फोडाफोडीच्या राजकारणावर राज ठाकरेंचा हल्लबोल

शिरसाट यांनी पुढे दावा केला की, “बदलाचे वारे वाहू लागले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली जातात. त्यामुळे रोहित पवारांपेक्षा अमोल कोल्हे यांच्या मताला अधिक महत्त्व आहे.”

उद्धव ठाकरेंनाही लगावला टोला

उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधताना संजय शिरसाट म्हणाले, “आम्ही कधीही उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारा, असं म्हटलं नाही.” त्यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना आणि उद्धव ठाकरे गटातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Web Title: Sanjay shirsat replies to raj thackeray over defection remarks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 03:24 PM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Politcs
  • MNS
  • raj thackeray
  • Sanjay Shirsat
  • shivsena

संबंधित बातम्या

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
1

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा
2

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक
3

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा
4

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.