Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati News: दुष्काळ निवारणासाठी प्रयत्न! जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची पत्रपरिषदेत माहिती

Amravati News: यंदाच्या वर्षी राज्यात कमी पाऊस पडल्यामुळे सगळीकडे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या मोठ्या तुटीमुळे शेतीचे नुकसान आणि भूजल पातळीत घट झाल्याने प्रशासनाने दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी उपाययोजनांना वेग दिला आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 24, 2026 | 02:20 PM
दुष्काळ निवारणासाठी प्रयत्न! जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची पत्रपरिषदेत माहिती

दुष्काळ निवारणासाठी प्रयत्न! जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची पत्रपरिषदेत माहिती

Follow Us
Follow Us:

Amravati News: यंदा सरासरीच्या तुलनेत ४४ टक्के पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. पावसाच्या मोठ्या तुटीमुळे शेतीचे नुकसान आणि भूजल पातळीत घट झाल्याने प्रशासनाने दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी उपाययोजनांना वेग दिला आहे.जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांत ट्रिगर-१ अंतर्गत दुष्काळसदृश स्थिती जाहीर करण्यात आली असून पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी राज्य शासनाकडे ७३४ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तसेच १ हजार २८ गावांत पाणीटंचाई निवारणासाठी ३२ कोटी रुपये खर्चुन १ हजार ८०० उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.(फोटो सौजन्य – AI)

अमरावती-पुणे विमानसेवेचा मार्ग मोकळा; आता इंदूर सेवेसाठी तीन कंपन्यांशी पत्रव्यवहार

चारा, रोजगार आणि प्रशासनावर भरः

जिल्ह्यातील ८ लाख ४७ हजार १३९ पशुधनासाठी सध्या १०० दिवस पुरेल एवढाच चारा उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीवर बंदी घालण्यात आली असून वैरण विकासासाठी अडीच कोटी रुपयांचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी १ हजार ७०० हून अधिक शाफ्ट तयार करण्याचे नियोजन आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून २३ हजार १४४ कामांचे नियोजनही करण्यात आले आहे.

‘डिस्ट्रिक्ट कनेक्ट अॅप’ तयार

शेतीसाठी १२ तास अखंडित वीजपुरवठा आणि बिघडलेले फिडर ४८ तासांत दुरुस्त करण्याचे निर्देश महावितरणला देण्यात आले आहेत. गावपातळीवरील उपाययोजनांवर देखरेख ठेवण्यासाठी ‘डिस्ट्रिक्ट कनेक्ट अॅप’ तयार करण्यात आले असून, अधिकारी प्रत्यक्ष भेटींचे फोटो आणि अहवाल त्यावर अपलोड करीत आहेत. दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे जिल्हाधिकारी येरेकर यांनी स्पष्ट केले.

भूजल पातळी खालावली; पाणी कपातीचे आदेश

जिल्ह्यातील १३६ निरीक्षण विहिरींपैकी १६ विहिरींची पाणीपातळी सप्टेंबरमध्ये ३ मीटरपेक्षा खाली गेली. भूजल दुष्काळ निर्देशांकानुसार ८ तालुके दुष्काळबाधित आहेत. चांदूर रेल्वे तालुक्यात तीव्र, चिखलदरा व धारणी तालुक्यांत मध्यम, तर अमरावती, धामणगाव रेल्वे, मोर्शी, नांदगाव खंडेश्वर आणि वरुड तालुक्यात सौम्य दुष्काळाची स्थिती आहे. अपर वर्धा धरणात ४८.११ टक्के, ७ मध्यम प्रकल्पांत ५६.७९ टक्के आणि ४९ लघु प्रकल्पांत ६७.१२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील सरासरी साठा ५५.०२ टक्के असून, पिण्याच्या पाण्यासाठी जलाशयांतील १० टक्के साठा राखीव ठेवण्यात आला आहे. पाणी वापरात १० टक्के कपात आणि सार्वजनिक पाणीस्त्रोतांपासून १ किमी परिसरात बोअरवेल घेण्यावर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

Amravati News: श्वानांचे निर्बिजीकरण कागदावरच! शहरात ३० हजारांवर मोकाट श्वान; दररोज सरासरी १० जणांना चावा

सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट

जिल्ह्यात जूनमध्ये चांगला पाऊस झाला; मात्र ऑगस्टमध्ये केवळ १४ टक्के पर्जन्यमान नोंदविण्यात आले. खरीप हंगामात सरासरीच्या केवळ ५६ टक्के पाऊस झाल्याने ९५ टक्के क्षेत्रावर पेरणी होऊनही पिकांना मोठा फटका बसला आहे. सोयाबीनचे उत्पादन गतवर्षीच्या एकरी ११ क्विंटलवरून घटून ५.७ क्विंटलपर्यंत आले आहे. एकूण ५ लाख १६ हजार २५६ शेतकऱ्यांचे ७ लाख ११ हजार ९४० हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. अचलपूर तालुक्यात सर्वांत कमी, म्हणजे ४७ टक्के पर्जन्यमान झाले.जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची पत्रपरिषदेत माहिती दिली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Amravati news efforts towards drought mitigation district collector ashish yerekar shares details at a press conference sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • Amaravati
  • Drinking Water
  • drought news

संबंधित बातम्या

चारा-पाणी नियोजनावर लक्ष द्यावे, देऊळगाव राजात पाणीटंचाईचे सावट; आमदार मनोज कायंदेंनी दिले निर्देश
1

चारा-पाणी नियोजनावर लक्ष द्यावे, देऊळगाव राजात पाणीटंचाईचे सावट; आमदार मनोज कायंदेंनी दिले निर्देश

Buldhana: बुलढाण्यात पुढील ५ दिवस कोरडे हवामान; रब्बी पिकांसाठी कृषी हवामान केंद्राचा महत्त्वाचा सल्ला
2

Buldhana: बुलढाण्यात पुढील ५ दिवस कोरडे हवामान; रब्बी पिकांसाठी कृषी हवामान केंद्राचा महत्त्वाचा सल्ला

Buldhana: पशुधनाच्या चारापाण्याचे योग्य नियोजन तत्काळ करा; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रशासनाला दिले निर्देश
3

Buldhana: पशुधनाच्या चारापाण्याचे योग्य नियोजन तत्काळ करा; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रशासनाला दिले निर्देश

Latur News: सणासुदीवर महागाईचे सावट गडद! घरखर्चाचे गणित बिघडले; कडधान्ये आणि भाजीपाल्याच्या दरवाढीने आर्थिक कोंडी
4

Latur News: सणासुदीवर महागाईचे सावट गडद! घरखर्चाचे गणित बिघडले; कडधान्ये आणि भाजीपाल्याच्या दरवाढीने आर्थिक कोंडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.