Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana: बुलढाण्यात पुढील ५ दिवस कोरडे हवामान; रब्बी पिकांसाठी कृषी हवामान केंद्राचा महत्त्वाचा सल्ला

Buldhana weather forecast farmer agriculture advisory: बुलढाणा जिल्ह्यात पुढील पाच दिवस कोरडे हवामान राहण्याचा अंदाज असून, शेतकऱ्यांनी उपलब्ध सिंचन स्रोतांची खात्री करून रब्बी पिकांचे नियोजन करावे, असा सल्ला जिल्हा कृषी हवामान केंद्राने दिला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 21, 2026 | 09:29 PM
photo- Ai generated

photo- Ai generated

Follow Us
Follow Us:
  • पुढील ५ दिवस हवामान कोरडे राहणार?
  • बुलढाणा कृषी हवामान केंद्राचा शेतकऱ्यांना सल्ला
  • पेरणी आणि सिंचनाबाबत महत्त्वाच्या सूचना
बुलढाणा: भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या पाच दिवसीय हवामान अंदाजानुसार बुलढाणा ( Buldhana) जिल्ह्यात पुढील ५ दिवस कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत आकाश मुख्यतः निरभ्र ते अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. एल निनो सदृश परिस्थिती आणि कमाल तापमानातील बदल लक्षात घेता, शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन उपलब्ध सिंचन स्रोतांची खात्री करूनच करावे, असा कृषी सल्ला जिल्हा कृषी हवामान केंद्राने दिला.

Satara Politics: राजकारण हाय राव! संघर्ष तर होणारच; साताऱ्यात 7 बिनविरोध तर 14 ठिकाणी…

ओलिताखालील करडीची पेरणी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत करता येऊ शकते. पेरणीपूर्वी करडीचे बियाणे रात्रभर पाण्यात भिजवून पेरणी केल्यास बियाण्याची उगवण लवकर व चांगली होण्यास मदत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्यवेळी आणि उपलब्ध ओलाव्याचा न विचार करून पेरणी करावी. याशिवाय, पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेता शेतकऱ्यांनी फळझाडांच्या सुकलेल्या, रोगट आणि अतिरिक्त फांद्या काढून टाकाव्यात. यामुळे फळझाडांची पाण्याची गरज कमी होण्यास मदत होऊन उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करता येईल, असा सल्ला देण्यात आला. फक्त वाळलेला किवा सुकलेला चारा दिल्याने जनावरांच्या सर्व पोषणविषयक गरजा पूर्ण होत नाहीत.

त्यामुळे जनावरांचे वय, वजन, दूध उत्पादन आणि शारीरिक अवस्था लक्षात घेऊन त्यांच्या आहाराचे नियोजन करावे. आवश्यकतेनुसार संतुलित पशुखाद्य, खनिज मिश्रण आणि मीठ यांचा आहारात समावेश करावा, असेही कृषी हवामान केंद्राने स्पष्ट केले. हा महत्वाचा कृषी सल्ला ग्रामीण कृषी मौसम सेवा अंतर्गत जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला) यांच्याकडून देण्यात आलेला आहे.

अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता कमी

अल निनो सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चालू महिन्यात मान्सूनोत्तर अथवा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता कमी असल्याने शेतकऱ्यांनी पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन पेरणीचे नियोजन करावे.तसेच, रब्बी पिकांची पेरणी करताना पाण्याचा ताण सहन करू शकणाऱ्या आणि लवकर परिपक्व होणाऱ्या वाणांची निवड करावी, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

Washim: महिला बचत गटाच्या वसुली त्वरित थांबवा, दुष्काळी परिस्थितीत कर्ज हप्त्यासाठी दबाव टाकू नये; तहसीलदारांना निवेदन

Web Title: Buldhana weather forecast rabi crop irrigation advisory pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 09:00 PM

Topics:  

  • Buldhan News
  • drought news
  • Maharashtra Weather Forecast

संबंधित बातम्या

Buldhana: पशुधनाच्या चारापाण्याचे योग्य नियोजन तत्काळ करा; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रशासनाला दिले निर्देश
1

Buldhana: पशुधनाच्या चारापाण्याचे योग्य नियोजन तत्काळ करा; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रशासनाला दिले निर्देश

Latur News: सणासुदीवर महागाईचे सावट गडद! घरखर्चाचे गणित बिघडले; कडधान्ये आणि भाजीपाल्याच्या दरवाढीने आर्थिक कोंडी
2

Latur News: सणासुदीवर महागाईचे सावट गडद! घरखर्चाचे गणित बिघडले; कडधान्ये आणि भाजीपाल्याच्या दरवाढीने आर्थिक कोंडी

Yavatmal News: मुख्यमंत्र्यांना ५ हजारांची मनीऑर्डर! यवतमाळातून निरज वाघमारेंचा सरकारला उपरोधिक टोला; शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात
3

Yavatmal News: मुख्यमंत्र्यांना ५ हजारांची मनीऑर्डर! यवतमाळातून निरज वाघमारेंचा सरकारला उपरोधिक टोला; शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात

Yavatmal News: कापसाने गाठला ९,६०० रुपयांचा भाव! कापसाचे दर वधारले, मात्र शेतकऱ्यांचे उत्पादन घटले
4

Yavatmal News: कापसाने गाठला ९,६०० रुपयांचा भाव! कापसाचे दर वधारले, मात्र शेतकऱ्यांचे उत्पादन घटले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.