Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Drought: साताऱ्यावर पाणीटंचाईचे सावट! १० टक्के पाणीकपातीचा आदेश; पालिकेने उचलली महत्त्वाची पावले

Maharashtra Drought: घरगुती वापरात पाण्याचा अपव्यय टाळणे, नळ सुरू ठेवून पाणी वाया जाऊ न देणे आणि पाणीगळती निदर्शनास आल्यास पालिकेला कळविणे, अशा उपायांतून पाणी बचतीच्या प्रयत्नांना हातभार लागू शकतो.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 13, 2026 | 08:11 PM
Maharashtra Drought 2026

Maharashtra Drought 2026

Follow Us
Follow Us:
  • दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेचे पाणी बचतीचे नियोजन
  • दहा टक्के पाणीकपातीच्या आदेशामुळे पालिका प्रशासन सतर्क
  • पाणीपुरवठ्याचे नियोजन, गळती रोखण्यावर भर
सातारा/Drought: जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि जिल्हा प्रशासनाने पाणी बचतीसाठी दिलेल्या दहा टक्के पाणीकपातीच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर सातारा नगरपालिकेने पाणीपुरवठ्याच्या नियोजनासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर, पाणीपुरवठा यंत्रणेतील गळती रोखणे आणि आगामी उन्हाळ्यातील संभाव्य (maharashtra drought) पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सातारा नगरपालिकेत नियोजन बैठक घेण्यात आली.

नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि उपनगराध्यक्ष ॲड. दत्ताजी बनकर मुख्याधिकारी विनोद जळक पाणी पुरवठा अभियंता शहाजी वाठारे यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी घंटेवारी करणारे कर्मचारी उपस्थित होते. शहरातील पाणीटंचाईची सद्यस्थिती, उपलब्ध पाणीस्रोतांचा योग्य वापर, पाणीपुरवठा योजनांची कार्यक्षमता आणि दुरुस्तीची कामे यावर बैठकीत चर्चा करण्यात आली.

जिल्ह्यात दुष्काळाचे सावट गडद होत असताना पाण्याच्या उपलब्धतेचे नियोजन करणे हे पालिका प्रशासनासमोरील महत्त्वाचे आव्हान ठरत आहे. जिल्हा प्रशासनाच्या दहा टक्के पाणीकपातीच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देताना पाण्याचा अपव्यय टाळण्याची गरज अधोरेखित झाली आहे. त्यासाठी पाणीपुरवठा यंत्रणेतील गळती शोधून ती तातडीने दुरुस्त करणे, वितरण व्यवस्थेवर लक्ष ठेवणे आणि उपलब्ध पाणीसाठ्याचा काटेकोर वापर करणे या उपाययोजनांवर भर देण्याची भूमिका बैठकीत मांडण्यात आली.

Water Shortage: पाणीटंचाईने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळणार? गुलाबराव पाटलांनी अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ निर्देश

दरम्यान, नागरिकांनीही पाणी बचतीची जबाबदारी स्वीकारण्याची आवश्यकता आहे. घरगुती वापरात पाण्याचा अपव्यय टाळणे, नळ सुरू ठेवून पाणी वाया जाऊ न देणे आणि पाणीगळती निदर्शनास आल्यास पालिकेला कळविणे, अशा उपायांतून पाणी बचतीच्या प्रयत्नांना हातभार लागू शकतो. दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता केवळ बैठका घेण्यापुरते नियोजन मर्यादित न राहता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते, यावर शहराचा पाणीपुरवठा अवलंबून राहणार आहे. त्यामुळे पाणीकपातीच्या आदेशाची अंमलबजावणी, गळती रोखण्यासाठीची कार्यवाही आणि भविष्यातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठीचे नियोजन याबाबत पालिका प्रशासनाला सातत्याने आढावा घ्यावा लागणार आहे.

१ . हेल्पलाईन संपर्क तातडीने गळती निघणार

२ विद्युत मोटरींचा वापर केल्यास कारवाई अनधिकृत कनेक्शनचा घेतला जाणार आढावा

३ .वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे एम एस सी बी ला सूचना स्वतंत्र वीज यंत्रणा उभारण्याच्या तयारीचा आढावा .

4 . पाणी वाया गेल्यास घंटेवारी योग्य न झाल्यास होणार कारवाई

5. शनिवार पेठ सोमवार पेठ करंजे तसेच कमी दाबाने पाणीपुरवठा होणाऱ्या भागांवर राहणार विशेष लक्ष

6. गाडी अथवा रस्ते धुणे इमारतीवर पाणी मारणे आढळल्यास होणार कारवाई.

Mumbai Water Cut 2026: मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! BMCचा इशारा; गैरवापर केल्यास थेट कारवाई

Web Title: Satara nagarpalika planning 10 percent water cut to fight maharashtra drought 2026 tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 08:11 PM

Topics:  

  • drought news
  • Maharashtra Drought 2026
  • Satara

संबंधित बातम्या

Sugarcane Rate : दर निश्चित होईपर्यंत ऊस देऊ नका, वसीम इनामदारांचे शेतकऱ्यांना आवाहन
1

Sugarcane Rate : दर निश्चित होईपर्यंत ऊस देऊ नका, वसीम इनामदारांचे शेतकऱ्यांना आवाहन

Water Shortage:  पाणीटंचाईने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळणार? गुलाबराव पाटलांनी अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ निर्देश
2

Water Shortage: पाणीटंचाईने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळणार? गुलाबराव पाटलांनी अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ निर्देश

Students Exam Fee: दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षा शुल्क घेतल्यास थेट महाविद्यालयावर कारवाई होणार
3

Students Exam Fee: दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षा शुल्क घेतल्यास थेट महाविद्यालयावर कारवाई होणार

Maharashtra Drought 2026: भाजपाचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्तांसाठी नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन अन् दिपेश म्हात्रेंची लाखाची मदत
4

Maharashtra Drought 2026: भाजपाचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्तांसाठी नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन अन् दिपेश म्हात्रेंची लाखाची मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.