Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: प्रॅक्टिकल लिहून दिले नाही म्हणून जीवघेणा हल्ला; कॉलेजमध्ये तरुणीच्या गळ्यावर चाकूचे वार

प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याच्या रागातून अमरावतीतील बडनेरा येथील महाविद्यालयात १९ वर्षीय वर्गमैत्रिणीवर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. महाविद्यालयाच्या पायऱ्यांवरच तिच्या गळ्यावर दोन वार करण्यात आले असून, चौकीदार व विद्यार्थ्यांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 30, 2026 | 02:20 PM
Crime News: प्रॅक्टिकल लिहून दिले नाही म्हणून जीवघेणा हल्ला; कॉलेजमध्ये तरुणीच्या गळ्यावर चाकूचे वार

Crime News: प्रॅक्टिकल लिहून दिले नाही म्हणून जीवघेणा हल्ला; कॉलेजमध्ये तरुणीच्या गळ्यावर चाकूचे वार

Follow Us
Follow Us:
  • प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने वर्गमैत्रिणीवर चाकूहल्ला
  • महाविद्यालयाच्या पायऱ्यांवर तरुणीच्या गळ्यावर दोन वार
  • चौकीदार व विद्यार्थ्यांनी आरोपीला पकडले; नवीन वानवाणी अटकेत
 

अमरावती : प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याच्या रागातून १९ वर्षीय वर्गमैत्रिणीच्या गळ्यावर चाकूने दोन वार करून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बडनेरा येथील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्चमध्ये घडली. मंगळवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास महाविद्यालयाच्या पायऱ्यांवरच हा प्रकार घडला. या हल्ल्यात प्राप्ती नावाची तरुणी गंभीर जखमी झाली असून, सध्या तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या प्रकरणी बडनेरा पोलिसांनी नवीन मेघराज वानवाणी (१९, रा. सिंधी कॅम्प, बडनेरा) याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. प्राप्तीच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी ही कारवाई केली.

हेही वाचा: दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या १७४ प्रवाशांचे विमान हायजॅक झाल्याची भीती; वैमानिकांच्या वादाने उडाला गोंधळ

प्रॅक्टिकल लिहून मागितले, नकार मिळताच हल्ला

प्राप्ती आणि नवीन हे एकाच महाविद्यालयात शिक्षण घेतात. मंगळवारी दुपारी सुमारे १२ वाजता प्रॅक्टिकल संपल्यानंतर प्राप्ती वर्गाबाहेर आली. त्यावेळी नवीनने तिचा पाठलाग करत महाविद्यालयाच्या पायऱ्यांवर तिला गाठले. त्याने प्राप्तीकडे प्रॅक्टिकल लिहून देण्याची मागणी केली. मात्र, तिने नकार दिल्याने नवीन संतापला आणि त्याने बॅगमध्ये आणलेल्या चाकूने तिच्या मानेवर दोन वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

आरडाओरड ऐकून चौकीदार, विद्यार्थ्यांनी पकडले

चाकूने हल्ला झाल्यानंतर प्राप्तीने जीवाच्या आकांताने आरडाओरड केली. तिचा आवाज ऐकून महाविद्यालयातील चौकीदार आणि विद्यार्थ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्ल्यानंतर पसार होण्याचा प्रयत्न करणाऱ्या नवीनला त्यांनी पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

हेही वाचा: Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

रुग्णालयात उपचार; प्रकृती धोक्याबाहेर

हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्राप्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू असून, सध्या तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे महाविद्यालय परिसरात काही काळ खळबळ उडाली. बडनेरा पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Amravati badnera college girl knife attack practical refusal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • Amravati crime
  • Amravati Crime News
  • Amravati News
  • College
  • Knife attack

संबंधित बातम्या

वडनगर ते वाराणसी ‘सेवा संकल्प यात्रा’ अमरावतीत; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यभूमीत यात्रेचे स्वागत
1

वडनगर ते वाराणसी ‘सेवा संकल्प यात्रा’ अमरावतीत; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यभूमीत यात्रेचे स्वागत

Amravati Crime: नगर परिषदेसमोर संशयास्पद हालचाल अन् पोलिसांची झडती; पुढे जे सापडलं ते धक्कादायक
2

Amravati Crime: नगर परिषदेसमोर संशयास्पद हालचाल अन् पोलिसांची झडती; पुढे जे सापडलं ते धक्कादायक

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद
3

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.