
अमरावतीत भीषण घटना, आगीत होरपळून ३ नवजात मुलांचा मृत्यू (फोटो सौजन्य - IANS X.com)
Amravati, Maharashtra: Three newborns died after a fire broke out in the Neonatal Intensive Care Unit (NICU) of Amravati District Women’s Hospital at around 3:30 AM. The fire reportedly started following an explosion in a ventilator on the hospital’s third floor, where 39… pic.twitter.com/Yde1uEk3W6 — IANS (@ians_india) August 24, 2026
मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली. महिला जिल्हा रुग्णालयात, जिथे ३९ नवजात बालकांवर उपचार सुरू होते, तिथे एका मोठ्या स्फोटामुळे व्हेंटिलेटरला आग लागली. डॉक्टर आणि परिचारिकांनी तात्काळ सर्व बाळांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
यानंतर झालेल्या संघर्षात, डॉक्टर आणि परिचारिकांनी अनेक मुलांना वाचवण्यात यश मिळवले, परंतु दुर्दैवाने तिघांचा मृत्यू झाला. डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढले, तर सहा नवजात बालकांना पुढील उपचारांसाठी सुपर-स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, नवजात शिशु विभागात लागलेल्या आगीत वैद्यकीय उपकरणे आणि इतर साहित्य जळून खाक झाले. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सुदैवाने, आग रुग्णालयाच्या खोल्यांपर्यंत पसरली नाही.
या घटनेनंतर मुलांच्या उपचारांवर देखरेख करणारे जिल्हा सिव्हिल सर्जन डॉ. विनोद पवार यांनी सांगितले की, काही मुलांना पीडीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सखोल तपासानंतरच आगीचे पूर्ण स्वरूप आणि तिचे कारण स्पष्ट होईल. या घटनेमुळे रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नवनीत राणा यांनी रुग्णालयाची या दरम्यान पाहणी केली असून रुग्णालयातील अग्निशामक यंत्रणेवर सवाल निर्माण केले आहेत. याशिवाय दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे. फायर ऑडिट झालं होतं की नाही याची माहितीदेखील द्यावी असंही यावेळी नवनीत राणा यांनी सांगितलं. तसंच आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी संवाद साधत या प्रकरणाबाबत सखोल चौकशी करावी असंही मत त्यांनी यावेळी मांडलं
एनआयसीयू विभागात ही दुर्घटना घडली. त्या वेळी तिथे एकूण ३९ बालके दाखल होती. आगीत आणि धुरामुळे ३ बालकांचा मृत्यू झाला, तर उर्वरित ३६ बालकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. सुरक्षित काढलेल्या बालकांवर तातडीने उपचार सुरू असून त्यांना शहरातील विविध रुग्णालयांत हलवण्यात आले आहे अशी माहिती अमरावती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली आहे.
उपकरणांचा पुरवठा करणाऱ्या ‘शिलर’ (Schiller) कंपनीच्या नागपूर येथील पुरवठादारांना उपकरणांच्या तांत्रिक तपासणीसाठी बोलावण्यात आले आहे. स्प्रिंकलर/फॉगर यंत्रणा का कार्यान्वित झाली नाही, तसेच फायर ऑडिटची सद्यस्थिती काय आहे, याची सखोल चौकशी केली जाईल. आरोग्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना घटनेची माहिती देण्यात आली असून, आरोग्यमंत्री आज दुपारी रुग्णालयाला भेट देणार आहेत.