Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवनीत राणा भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवणार? नांदेड पोटनिवडणुकीतून राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न?

भाजपकडून नांदेडसाठी राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली जाऊ शकते अशी चर्चा होती. मात्र अशोक चव्हाण यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 20, 2024 | 02:54 PM
नवनीत राणा भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवणार? नांदेड पोटनिवडणुकीतून राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न?

नवनीत राणा भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवणार? नांदेड पोटनिवडणुकीतून राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न?

Follow Us
Follow Us:

अमरावती: काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. तसेच नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. विद्यामन खासदारांचे निधन झाल्याने या ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. कॉँग्रेसने दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महायुतीकडून अशोक चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र आता त्यांनी नकार दिल्याने भाजपकडून माजी खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. नवनीत राणा या नांदेड पोटनिवडणूक लढण्याची शक्यता आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना भाजपने अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. कॉँग्रेस खासदार बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणा यांचा पराभव केला होता. त्याआधी नवनीत राणा या अपक्ष खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र २०२४ मध्ये भाजपकडून अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली होती. दरम्यान त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान नांदेड पोटनिवडणुकीतून माजी खासदार नवनीत राणा यांचे पुनर्वसन केले जाण्याची शक्यता आहे.

नवनीत राणा यांना नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतून उमेदवारी देण्याची मागणी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता यावर भाजप पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार हे महत्वाचे असणार आहे. दरम्यान नांदेडमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे. कॉँग्रेसकडून दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. तर एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी देखील नांदेडची लोकसभा पोटनिवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. तसेच नवनीत राणा यांना  भाजपकडून उमेदवारी दिल्यास नांदेडमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळू शकते.

भाजपकडून नांदेडसाठी राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली जाऊ शकते अशी चर्चा होती. मात्र अशोक चव्हाण यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे कदाचित नवनीत राणा यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी भाजपकडून त्यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे.

Web Title: Bjp chance to give ticket nanded loksabha by election to former mp navneet rana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2024 | 02:52 PM

Topics:  

  • BJP
  • Navneet Rana

संबंधित बातम्या

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’
1

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल
2

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल

भोर नगरपरिषदेची सभा वादळी, नगरसेविकांच्या आरोपानंतर नगराध्यक्षांचा लेखी माफीनामा; नेमकं काय घडलं?
3

भोर नगरपरिषदेची सभा वादळी, नगरसेविकांच्या आरोपानंतर नगराध्यक्षांचा लेखी माफीनामा; नेमकं काय घडलं?

‘तुमच्या पक्षात असतील तर वाघ, दुसरीकडे गेले की वेश्या?’; राज ठाकरेंच्या टीकेला संजय शिरसाट यांचा पलटवार
4

‘तुमच्या पक्षात असतील तर वाघ, दुसरीकडे गेले की वेश्या?’; राज ठाकरेंच्या टीकेला संजय शिरसाट यांचा पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.