Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भोर नगरपरिषदेची सभा वादळी, नगरसेविकांच्या आरोपानंतर नगराध्यक्षांचा लेखी माफीनामा; नेमकं काय घडलं?

आरोप-प्रत्यारोपांमुळे आणि गोंधळामुळे भोर नगरपरिषदेच्या सभेचे कामकाज दिवसभर ठप्प झाले होते. अखेर, महिला नगरसेविकांच्या तीव्र विरोधानंतर नगराध्यक्षांना लेखी माफीनामा सादर करावा लागला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 02, 2026 | 04:45 PM
भोर नगरपरिषदेची सभा वादळी, नगरसेविकांच्या आरोपानंतर नगराध्यक्षांचा लेखी माफीनामा; नेमकं काय घडलं?

भोर नगरपरिषदेची सभा वादळी, नगरसेविकांच्या आरोपानंतर नगराध्यक्षांचा लेखी माफीनामा; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:

भोर : भोर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत महिला नगरसेविकांशी संवाद साधताना असभ्य आणि असंसदीय भाषेचा वापर केल्याचा ठपका ठेवत, भाजपच्या महिला नगरसेविकांनी नगराध्यक्ष रामचंद्र आवारे यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. या आरोप-प्रत्यारोपांमुळे आणि गोंधळामुळे सभेचे कामकाज दिवसभर ठप्प झाले होते. अखेर, महिला नगरसेविकांच्या तीव्र विरोधानंतर नगराध्यक्षांना लेखी माफीनामा सादर करावा लागला.

 

नगरपरिषदेच्या सभागृहात नगराध्यक्ष रामचंद्र आवारे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा पार पडत होती. या सभेदरम्यान भाजपच्या महिला नगरसेविका आपल्या प्रभागातील विकासकामांचे प्रश्न उपस्थित करत होत्या. यावेळी नगराध्यक्षांनी काही नगरसेविकांचा एकेरी उल्लेख करत अत्यंत अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप नगरसेविका मनीषा पवार, स्नेहल घोडेकर आणि अन्य सदस्यांनी केला.

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या महिला नगरसेविकांनी सभागृहातच तीव्र निषेध व्यक्त करत नगराध्यक्षांच्या माफीची मागणी लावून धरली. प्रारंभी नगराध्यक्षांनी हात जोडून दिलगिरी व्यक्त केली, परंतु महिला सदस्य आपल्या मागणीवर ठाम राहिल्या.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, सभेच्या दुसऱ्या सत्रात नगराध्यक्ष आवारे यांनी लेखी माफीनामा सादर केला.

हे सुद्धा वाचा : शेताच्या बांधाच्या वादातून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला, दगड अन् लाकडी काठीने बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?

सभेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी

केवळ भाषेचा वादच नव्हे, तर अन्य मुद्द्यांवरूनही या सभेत खडाजंगी झाली. उपनगराध्यक्ष जयश्री शिंदे यांनी नगराध्यक्ष भाजपच्या नगरसेवकांवर विकासकामांना विरोध करत असल्याचा गंभीर आरोप करुन नागरिकांची दिशाभूल करत असल्याचे सांगीतले. तसेच सर्वसाधारण सभेचे रेकॉर्डिंग न करण्याचा निर्णय झालेला असतानाही अध्यक्षांकडून नियमबाह्य रेकॉर्डिंग केले जात असल्याचा ठपका ठेवत, नगरपरीषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हा सभागृहाचा अवमान असल्याचे नगरसेवकांनी म्हटले.

यावेळी मुख्याधिकारी गजानन शिंदे, गटनेते अमित सागळे, केदार देशपांडे, सुमंत शेटे, सचिन तारू, तृप्ती सुपेकर, जगदीश किरवे, कुणाल पलंगे, मनीषा पवार, तोसीफ आत्तर, गणेश मोहिते, मनीषा भेलके, स्नेहा पवार, रेणुका बदक, सुरेखा मळेकर, कुणाल धुमाळ, अनिल भेलके, जयवंत शेटे, प्रशांत जाधव, पल्लवी सागळे, मयुरी गायकवाड यांच्यासह अनेक नगरसेवक उपस्थित होते. या वादळी सभेमुळे भोरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मुख्यालयाचा मार्ग मोकळा; 50 एकर जागा मंजूर; परेड ग्राऊंडसह प्रशासकीय संकुल उभारणार

Web Title: Chaos ensued at the bhor nagarparishad meeting due to a war of words

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • Bhor Taluka
  • BJP
  • NCP News

संबंधित बातम्या

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा
1

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक
2

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
3

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीबाहेरील रस्त्यांसाठी २ कोटींचा निधी; आमदार सुनील शेळके यांची मोठी घोषणा
4

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीबाहेरील रस्त्यांसाठी २ कोटींचा निधी; आमदार सुनील शेळके यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.