Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’

शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटात दाखल झाल्यानंतर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील, अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या बहुमताचा दाखला देत या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

  • By विवेक
Updated On: Jul 02, 2026 | 08:56 PM
'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?' चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; 'रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती'

'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?' चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; 'रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती'

Follow Us
Follow Us:

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या घडामोडीनंतर महायुतीमध्ये शिंदे गटाचे खासदार सर्वाधिक झाल्याने एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. या चर्चांवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांना फारसे महत्त्व नसल्याचे सांगितले.

‘१३७ आमदार असलेल्या पक्षाचाच मुख्यमंत्री राहील’

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ज्या राज्यात बहुमतासाठी १४७ जागा लागतात आणि ज्या पक्षाकडे स्वतःचे १३७ निवडून आलेले आमदार आहेत, त्या राज्याचा मुख्यमंत्री त्याच पक्षाचा राहणार की दुसऱ्या पक्षाचा? अर्थात त्याच पक्षाचा राहणार. त्यामुळे कितीही कहाण्या तयार झाल्या तरी वास्तव मला माहिती आहे आणि शिंदे साहेबांनाही माहिती आहे. अशा बातम्यांमुळे ना मी विचलित होतो, ना शिंदे साहेब.”

RTI नियमांवरील वादानंतर सरकारचा यू-टर्न; अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला मोठे यश, बदलांना स्थगिती

ते पुढे म्हणाले, “प्रत्येकाला आपली स्वप्ने पूर्ण व्हावीत असे वाटते. त्यात काही गैर नाही.” या वक्तव्यानंतर मुख्यमंत्रीपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

ठाकरे गटातील पक्षांतरावरही प्रतिक्रिया

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही बंडखोर नेत्यांनी ‘विकासकामांसाठी निधी मिळत नसल्यामुळे आम्ही सत्ताधारी पक्षात प्रवेश केला’ असे कारण दिले होते. त्यावरही फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “निधी हे अनेक कारणांपैकी एक कारण असू शकते. मात्र पक्षांतर केवळ निधीपुरते मर्यादित नसते. विकास प्रकल्प, सामाजिक प्रश्न आणि सत्ताधारी किंवा विरोधी पक्षात असण्याचाही त्यावर परिणाम होतो.”

Devendra Fadnavis News: ‘त्या’ खासदारांना भाजपमध्ये यायचे होते, पण आम्ही दारे बंद ठेवली; देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

‘नेतृत्वावर विश्वास कमी झाला तरी पक्षांतर होते’

पक्षांतरामागील इतर कारणांवर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, “जेव्हा नेतृत्व कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यात कमी पडते किंवा भविष्यात आपले राजकीय भविष्य सुरक्षित राहणार नाही, अशी भावना निर्माण होते, तेव्हाही नेते आणि कार्यकर्ते पक्ष बदलण्याचा निर्णय घेतात.”

शिवसेना ठाकरे गटातील अलीकडील घडामोडींमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलत असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याने मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांवर भाजपची भूमिका स्पष्ट झाल्याचे मानले जात आहे.

Web Title: Devendra fadnavis on eknath shinde chief minister speculation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 08:56 PM

Topics:  

  • BJP
  • devendra fadnavis
  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • shivsena

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: धारावी पुनर्विकास कसा असेल? घरांपासून उद्योगांच्या जागेपर्यंत सर्व काही एकाच छताखाली; ‘एक्सपिरियन्स सेंटर’ सुरू
1

Devendra Fadnavis: धारावी पुनर्विकास कसा असेल? घरांपासून उद्योगांच्या जागेपर्यंत सर्व काही एकाच छताखाली; ‘एक्सपिरियन्स सेंटर’ सुरू

BJP Mumbai : देशात अराजकता पसरवणाऱ्या कचऱ्याला बाहेर काढा – मंत्री मंगलप्रभात लोढा
2

BJP Mumbai : देशात अराजकता पसरवणाऱ्या कचऱ्याला बाहेर काढा – मंत्री मंगलप्रभात लोढा

Pune BJP :भारतीय जनता युवा मोर्चाचा उद्या जेजुरीत  ‘युवा निर्धार मेळावा’
3

Pune BJP :भारतीय जनता युवा मोर्चाचा उद्या जेजुरीत ‘युवा निर्धार मेळावा’

Maharashtra Legislative Council Election : महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजपला 3 तर मित्रपक्षांना…
4

Maharashtra Legislative Council Election : महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजपला 3 तर मित्रपक्षांना…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.