Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पत्रकार हे एकप्रकारे गुलाम आहेत! अमरावतीमधील सभेत राहुल गांधींचे वक्तव्य ; पत्रकारांमध्ये संताप

अमरावतीमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या सभेत राहुल गांधी यांनी पत्रकार हे एकप्रकारे गुलाम आहेत असे वक्तव्य केले त्यामुळे पत्रकारांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

  • By नारायण परब
Updated On: Nov 16, 2024 | 08:42 PM
राहुल गांधींच्या दिल्ली विद्यापीठ भेटीवरून वाद, विद्यापीठ प्रशासनाकडून कारवाईचा इशारा

राहुल गांधींच्या दिल्ली विद्यापीठ भेटीवरून वाद, विद्यापीठ प्रशासनाकडून कारवाईचा इशारा

Follow Us
Follow Us:

‘पत्रकारांना पगार घेऊन मुलांचे शिक्षण करायचे आहे. पोटाची भूक भागवायची आहे. हे करण्यासाठी त्यांना पगार हवा असल्याने मालकाचे ऐकावेच लागते. हे एक प्रकारे गुलाम आहेत’, असे वक्तव्य  विरोधी पक्षनेते राहुल गांधी  यांनी अमरावतीच्या सभेत पत्रकारांबाबत केल्याने पत्रकारांमध्ये संताप निर्माण झाला आहे.

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची शनिवारी जाहीर सभा झाली. या सभेत मोदी यांच्यावर टीका करताना राहुल यांनी माध्यमांवरही लक्ष्य केले. ते म्हणाले, मागच्या वर्षभरापासून संविधान, जातनिहाय जनगणना आणि ५० टक्के आरक्षण मर्यादेची भिंती तोडणार, लोकसभेत हे करून दाखविणार असे सांगत आहे. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल गांधी आरक्षणाच्या विरोधात असल्याचे सांगत आहेत. त्यांची मेमरी लॉस झाली आहे. त्यांच्यासमोरच हे सर्व मुद्दे मांडत असतानाही त्यांना याचा विसर पडला आहे. हे सर्व माध्यमे दाखवित नाही. हे सर्व त्यांचेच आहेत. हे मी जेव्हा म्हणतो तेव्हा हे सर्व माझ्याकडे पाहून हसतात. आम्ही त्यांचेच असल्याचे सांगत हसतात. तुमचे नाहीच असेही सांगतात.

मी म्हणालेले काहीही दाखविणार नाही

त्यांची चूक नाही. हे पत्रकार मला आवडतात. पण, त्यांना पगार घ्यायचा आहे. मुलांचे शिक्षण करायचे आहे. त्यांच्या पोटाची भूक शमवायची आहे. हे करण्यासाठी त्यांना मालकांचे ऐकावेच लागते. एक तऱ्हेने हे गुलाम आहेत. त्यामुळे यांच्याशी माझी लढाई नाही. हे आमचे काहीही दाखविणार नाही. २४ तास मोदी दाखविणार. मी म्हणालेले काहीही दाखविणार नाही.उलट सायंकाळी मोदी यांची मेमरी खूप मस्त आहे. एखादी गोष्ट ऐकल्यानंतर ७० वर्षे विसरत नाहीत. त्यात पुन्हा जोडतील. लहान असताना मोदी तलावात मगरीशी लढले होते. मगरीला त्यांनी बुडविले. पण, जेव्हा हेच मोदी गंगा नदीवर जातात तेव्हा त्यांना पोहता येत असल्याचे जाणवत नाही, अशी टीकाही त्यांनी केली, अशी टीकाही केली.

 

राहुल गांधी यांनी पत्रकारांवर केलेल्या वक्तव्यावर महाराष्ट्र संपादक परिषद मुंबईचे कार्याध्यक्ष प्रकाश कुलथे यांनी टिका केली आहे राहुल गांधीजी  आपण लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहात.आपण सत्ताधाऱ्याविरुद्ध आवाज उठवण्याचे काम करणे अपेक्षित आहे.मात्र आपण पत्रकारांविरुद्धचा आवाज उठवत आहात, त्यांना गुलाम म्हणत आहात. वर्षानुवर्षे निष्ठेने आपली लेखणी जिझवणाऱ्या तमाम पत्रकारांचा हा जाहीर अपमान आहे. आपल्या विधानाचा आम्ही जाहीर निषेध करतो.समाजाच्या समस्या चव्हाट्यावर आणणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यापेक्षा आपण प्रत्येक सभेत पत्रकारांना गुलाम म्हणता. ग्रामीण व शहरी भागातील सर्वच पत्रकार आपल्या या विधानाने कमालीचे दुखावलेले आहेत. राजकारणात तुम्ही कोणत्या पक्षावर टीका करायची कसे बोलायचे हा तुमचा अधिकार आहे पण तुमच्या व कोणत्याही पक्षाच्या राजकारणाशी घेणेदेणे नसणाऱ्या पत्रकारांचा असा जाहीरपणे पाणउतारा करणे योग्य नाही.

Web Title: Rahul gandhis statement in amravati angered journalists

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2024 | 08:42 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • narendra modi
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

‘ओबीसी विचार महाराष्ट्राचा, तो देशभर पोहोचवण्याची गरज’; हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन
1

‘ओबीसी विचार महाराष्ट्राचा, तो देशभर पोहोचवण्याची गरज’; हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

PM Modi Seychelles Visit : PM मोदींचा ऐतिहासिक सेशेल्स दौरा; 1,250 कोटींच्या मदतीसह अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या
2

PM Modi Seychelles Visit : PM मोदींचा ऐतिहासिक सेशेल्स दौरा; 1,250 कोटींच्या मदतीसह अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या

Sunil Shetty : अभिनेत्याच्या नातीला मोदीनामाची गोडी! ‘मोदीजींमध्ये मॅजिक’ सुनील शेट्टीची धारणा, घरी होते पूजा
3

Sunil Shetty : अभिनेत्याच्या नातीला मोदीनामाची गोडी! ‘मोदीजींमध्ये मॅजिक’ सुनील शेट्टीची धारणा, घरी होते पूजा

PM मोदींची नेदरलँड्सच्या राणी मॅक्सिमा यांच्याशी महत्त्वपूर्ण बैठक; भारताच्या DPI मॉलेडवर सविस्तर चर्चा
4

PM मोदींची नेदरलँड्सच्या राणी मॅक्सिमा यांच्याशी महत्त्वपूर्ण बैठक; भारताच्या DPI मॉलेडवर सविस्तर चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.