Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi Independence Day 2026: स्वातंत्र्य ही केवळ भेट नसून मोठी जबाबदारी; स्वातंत्र्यदिनानिमित्त राहुल गांधींचा खास संदेश

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. यापूर्वी मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांच्या 10 राजाजी मार्ग येथील निवासस्थानी तिरंगा फडकावून देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 15, 2026 | 01:41 PM
Rahul Gandhi, Protect Indian Constitution, Truth and Non-Violence Rahul Gandhi, Rahul Gandhi, Independence Day 2026,

Rahul Gandhi, Protect Indian Constitution, Truth and Non-Violence Rahul Gandhi, Rahul Gandhi, Independence Day 2026,

Follow Us
Follow Us:
  • राहुल गांधी यांनी आपल्या संदेशात केवळ शुभेच्छा न देता स्वातंत्र्य टिकवण्यासाठी संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणाची गरज अधोरेखित केली.
  • देशाचे भविष्य असलेल्या तरुणाईने संविधानाची मूल्ये जपण्यासाठी दाखवलेल्या एकजुटीचे त्यांनी मनापासून कौतुक केले.
  • सत्य आणि अहिंसेच्या मार्गानेच देश पुढे जाऊ शकतो हा विश्वास व्यक्त करत त्यांनी आपल्या संदेशाचा समारोप ‘जय हिंद!’ या राष्ट्रप्रेमी घोषणेने केला.
Rahul Gandhi Independence Day 2026 : देशभरात आज 80वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जात आहे. राजधानी नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयातही स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा खासदार राहुल गांधी यांनी, स्वातंत्र्य ही केवळ भेट नसून मोठी जबाबदार आहे, असं म्हणत देशवासियांना एक खास संदेश दिला आहे.

काँग्रेस मुख्यालयाच्या ध्वजारोहण समारंभात बोलताना राहुल गांधी म्हणाले की, “राहुल गांधी यांनीही देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्य हे स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेले केवळ एक उपहार नसून ती एक मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालण्याची, संविधान आणि तिरंग्याची मूल्ये मनात जपण्याची आणि कोणत्याही परिस्थितीत लोकशाहीचे रक्षण करण्याची आहे.

Independence Day 2026 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण; अनेक मान्यवरांची उपस्थिती

देशातील नागरिक, विशेषतः तरुण, या मूल्यांच्या रक्षणासाठी एकजुटीने उभे आहेत, याचा आपल्याला अभिमान असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यानंतर ‘जय हिंद!’ म्हणत त्यांनी आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या संदेशाचा समारोप केला.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. यापूर्वी मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांच्या 10 राजाजी मार्ग येथील निवासस्थानी तिरंगा फडकावून देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

‘इतिहास सर्व काही नोंदवत असतो’ – खर्गे

काँग्रेस मुख्यालयातील स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाला संबोधित करताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. काँग्रेसच्या सरकारांनी देशात अन्नाचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार आणि रोजगाराचा अधिकार यांसारखे महत्त्वाचे अधिकार दिले. मात्र, सध्याच्या सरकारने असे कोणतेही महत्त्वाचे काम केले नाही. खर्गे म्हणाले, “आम्ही अन्नाचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार आणि कामाचा अधिकार दिला. मात्र, सध्याच्या सरकारने असे कोणतेही काम केलेले नाही. तरीही काही लोकांची सवय अशी आहे की, त्यांनी न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जातो. इतिहास सर्व काही नोंदवतो.”

दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेते लाल किल्ल्यावरील सोहळ्याला उपस्थित राहिले. पण काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित राहिले नाहीत, त्यामुळे भाजपने त्यांच्यावर टीका केली.

Independence Day 2026 : तुटलेल्या खिडक्या, अस्वच्छ शौचालये अन्.. ; गावची शाळा पाहून अभिजीत दिपकेंची नाराजी

शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी निशाणा साधला आहे. “राहुल गांधी आणि खर्गे यांनी स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाला पक्षीय राजकारणाच्या पलीकडे ठेवले पाहिजे. जेव्हा पंतप्रधान भाषण देतात, तेव्हा ते देशाचे पंतप्रधान असतात. ते अनेक वर्षांपासून यावर बहिष्कार टाकत आहेत. हे राहुल गांधींच्या अपरिपक्वतेमुळे आहे. हे राहुलच्या अहंकारामुळे आहे. हे खोट्या गांधी घराण्याच्या अहंकारामुळे आहे. विरोधी पक्षांनी यात हस्तक्षेप केला पाहिजे; ते एक चुकीची प्रथा पुढे चालवत आहेत.”

 

Web Title: Rahul gandhi independence day 2026 message protect constitution and democracy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 01:41 PM

Topics:  

  • Independence Day
  • Indian Constitution
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी
1

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी

Nana Patole : ‘ज्ञानेशकुमार भाजपाच्या दावणीला, फडणवीसांचा मेंदू चोरीला’ नाना पटोलेंचा हल्लाबोल; निवडणूक आयोगावरून राजकारण तापलं
2

Nana Patole : ‘ज्ञानेशकुमार भाजपाच्या दावणीला, फडणवीसांचा मेंदू चोरीला’ नाना पटोलेंचा हल्लाबोल; निवडणूक आयोगावरून राजकारण तापलं

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
3

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

‘पराभवाचे खापर आयोगावर फोडण्याऐवजी आत्मपरीक्षण करा’; शिवेंद्रराजे भोसले यांचा राहुल गांधींवर निशाणा
4

‘पराभवाचे खापर आयोगावर फोडण्याऐवजी आत्मपरीक्षण करा’; शिवेंद्रराजे भोसले यांचा राहुल गांधींवर निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.