Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Supreme Court News: बेहिशेबी मालमत्ता’ प्रकरणात राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

राहुल गांधींनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मे महिन्यातील आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते, ज्या आदेशानुसार सीबीआय आणि ईडीला त्यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्याचे आणि कायद्यानुसार योग्य कारवाई करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले होते.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 17, 2026 | 01:16 PM
Supreme Court News: बेहिशेबी मालमत्ता’ प्रकरणात राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Follow Us
Follow Us:

Supreme Court News: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात तात्पुरता दिलासा मिळाला आहे.सर्वोच्च  न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाला २० ऑगस्ट  पर्यंत होणारी सुनावणी पुढे ढकलण्याच्या सुचना दिल्या आहेत. उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने या प्रकरणात सीबीआय आणि ईडी चौकशीचे आदेश दिले होते.

राहुल गांधींनी आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. भाजप कार्यकर्ते विग्नेश शिशिर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने हा आदेश दिला आहे. याचिकेत म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी आतापर्यंत त्यांच्या परदेश दौऱ्यांवर ६० कोटी रुपये खर्च केले आहेत, जे त्यांच्या घोषित उत्पन्नापेक्षा खूप जास्त आहे.

Manoj Jarange: ‘कुणाच्याही दबावाला बळी पडू नका…,’ मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाच्या तयारीत; २९ ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा

उच्च न्यायालयाचा आदेश काय होता?

खरं तर, राहुल गांधींनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मे महिन्यातील आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते, ज्या आदेशानुसार सीबीआय आणि ईडीला त्यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्याचे आणि कायद्यानुसार योग्य कारवाई करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले होते. उच्च न्यायालयाने असेही म्हटले होते की, जर गंभीर आरोप केले गेले असतील, तर त्यांची सत्यता पडताळली पाहिजे आणि तपासाच्या प्रगतीबद्दल न्यायालयाला माहिती दिली पाहिजे.

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

आपल्या अंतरिम आदेशात, सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही तपास यंत्रणा आणि इतर अधिकाऱ्यांना या प्रकरणात सध्या तरी अलाहाबाद उच्च न्यायालयात कोणताही अहवाल दाखल न करण्याचे निर्देश दिले. इतकेच नाही, तर सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाची पुढील सुनावणी घेईपर्यंत २० ऑगस्ट रोजी होणारी सुनावणी पुढे ढकलण्यासही उच्च न्यायालयाला सांगण्यात आले. ही एक तात्पुरती व्यवस्था असून, या प्रकरणावर अंतिम निर्णय नंतर घेतला जाईल.

Navnath Waghmare News: ओबीसींची मुले अन् पैसा पाहून मराठा तरुणी त्यांच्या घरात घुसतात; नवनाथ वाघमारेंचे वादग्रस्त विधान

प्रकरण काय आहे?

हे प्रकरण कर्नाटक भाजप कार्यकर्ते एस. विग्नेश शिशिर यांनी केलेल्या बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपांशी संबंधित आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने यापूर्वी सीबीआय, ईडी आणि इतर तपास यंत्रणांना या आरोपांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.

राहुल गांधी यांनी या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानंतर, तपास यंत्रणा सध्या उच्च न्यायालयात कोणताही अहवाल दाखल करणार नाहीत आणि सर्वोच्च न्यायालय या प्रकरणावर पुढील सुनावणी घेईपर्यंत उच्च न्यायालयातील पुढील सुनावणी पुढे ढकलण्यात येईल.

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) ने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह लोकसभा खासदारांच्या मालमत्तेचा तपशील देणारा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. एडीआर अहवालात २०१४ ते २०२४ पर्यंतच्या डेटाचा समावेश होता. अहवालात म्हटले आहे की, असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि नॅशनल इलेक्शन वॉच यांनी २०१४ ते २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या १०२ खासदारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केले.

Web Title: Supreme court relief to rahul gandhi in disproportionate assets case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 12:55 PM

Topics:  

  • CBI
  • ED
  • Rahul Gandhi
  • Supreme Court

संबंधित बातम्या

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी
1

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी

Nana Patole : ‘ज्ञानेशकुमार भाजपाच्या दावणीला, फडणवीसांचा मेंदू चोरीला’ नाना पटोलेंचा हल्लाबोल; निवडणूक आयोगावरून राजकारण तापलं
2

Nana Patole : ‘ज्ञानेशकुमार भाजपाच्या दावणीला, फडणवीसांचा मेंदू चोरीला’ नाना पटोलेंचा हल्लाबोल; निवडणूक आयोगावरून राजकारण तापलं

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका; सुप्रीम कोर्ट पुढील आठवड्यात सुनावणी करणार
3

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका; सुप्रीम कोर्ट पुढील आठवड्यात सुनावणी करणार

100 पैकी 15 विद्यार्थी त्रस्त, 9 जणांना आत्महत्येचे विचार..; सुप्रीम कोर्ट समितीच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर
4

100 पैकी 15 विद्यार्थी त्रस्त, 9 जणांना आत्महत्येचे विचार..; सुप्रीम कोर्ट समितीच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.