
काही स्थानकांदरम्यान दुहेरीकरणाचे काम सुरू
विशेष ट्रैफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार
तब्बल 5 गाड्यांचे मार्ग बदलले जाणार
अकोला: मध्य रेल्वेच्या पुणे विभागांतर्गत येणाऱ्या दौंड-मनमाड रेल्वे मार्गावरील दौंड आणि काष्टी स्थानकांदरम्यान दुहेरीकरणाचे काम हाती घेण्यात आले. या कामासाठी प्री-नॉन इंटरलॉकिंग (प्री-एनआय) आणि नॉन-इंटरलॉकिंग (एनआय) अंतर्गत विशेष ट्रैफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगा ट्रॅफिक ब्लॉकमुळे प्रवाशांचे मोठे हाल होणार असून, १६ महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
तसेच ५ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. यामध्ये अमरावती, नागपूर, पुणे, नांदेड आणि जळगाव मार्गावरील प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे. रेल्वे मार्गाच्या नियमित देखभालीसह पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी २४ जानेवारीपासून हा ब्लॉक कार्यान्वित होईल. रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये प्रामुख्याने ११०२५ पुणे-अमरावती एक्सप्रेस (२४, २५ जानेवारी), ११०२६ अमरावती-पुणे एक्सप्रेस (२३, २४ जाने.), १२१२० अमरावती पुणे एक्सप्रेस (२५ जाने.), १२११३ पुणे-नागपूर गरीब रथ (२४ जाने.), १२११४ नागपूर पुणे गरीब रथ (२३ जाने.), २२१३९ पुणे-अजनी हमसफर (२४ जाने.) आणि २२१४० अजनी पुणे हमसफर (२५ जाने.) या गाड्यांचा समावेश आहे. तसेच पुणे-नदिड, पनवेल-नांदेड, दीड-निजामाबाद आणि दादर-साईनगर शिर्डी या गाड्यांच्या फेऱ्याही रद्द करण्यात आल्या आहेत.
तोच घारणेडा वास अन् तोच अस्वच्छ प्रवास..! भारतीय रेल्वेच्या तिकीटात वाढ मात्र सोयी सारख्याच
यशवंतपूर-चंदीगड एक्सप्रेस (२४ जानेवारी) मनमाड-मानें इगतपुरी-कल्याण-लोणावळा वळवण्यात आली. तसेच हुबळी हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (२४ जानेवारी) लातूर-परळी मार्गे धावेल. जम्मूताची-पुणे एक्सप्रेस (२३ जानेकरी), हजरत निजामुद्दीन-वास्को-द-गामा एक्सप्रेस (२३. २४ जानेवारी) आणि पुणे-गोरखपूर एक्सप्रेस (२४ जानेवारी) या गाड्या लोणावळा-कर्जत-पनवेल-कल्याण-इगतपुरी मार्गे आपल्या स्थळी पोहोचतील.
Railways Fare Hike: भारतीय रेल्वेने वाढवले तिकीट भाडे, ट्रेनचा प्रवास महागणार; कधीपासून होणार लागू
या गाड्या उशिराने धावणार
ब्लॉकच्या कालावधीत काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. ट्रेन क्रमांक १२१०३ पुणे-लखनऊ एक्सप्रेस ११, १३ आणि २० जानेवारी रोजी दीड ते दोन तास उशिराने सुटेल. ट्रेन क्रमांक २२८४५ पुणे-हाटिया एक्सप्रेस १२, १८ आणि २१ जानेवारी रोजी २ तास १० मिनिटे उशिराने धावेल, तर गाडी क्रमांक ०२१३१ पुणे-जबलपूर एक्सप्रेस १९ जानेवारी रोजी १ तास ३० मिनिटे उशिराने रवाना होईल.
भारतीय रेल्वेने वाढवले तिकीट भाडे
आता रेल्वेने प्रवास करणे आता महाग होणार आहे. रेल्वेने प्रवासी भाडे वाढवले आहे. हे भाडे २६ डिसेंबरपासून लागू होईल. तथापि, लोकल गाड्या आणि कमी अंतराच्या प्रवाशांच्या भाड्यात कोणतीही वाढ होणार नाही. या बदलामुळे चालू आर्थिक वर्षात अंदाजे ₹६०० कोटींचा अतिरिक्त महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. रेल्वेने या भाडेवाढीची कारणेदेखील स्पष्ट केली आहेत.