Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim News : शाश्वत शेतीसाठी समन्वयाची नितांत गरज! जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन; जिल्हास्तरीय समन्वय समिती सभा

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी महत्त्वाचा असून, समन्वयातून प्रभावी अंमलबजावणी करावी, असे जिल्हाधिकारी Yogesh Kumbhekar यांनी सांगितले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 20, 2026 | 06:24 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० हा शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा असून, सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयातून काम करत प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी Yogesh Kumbhekar यांनी केले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २.० अंतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा त्यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडली. या बैठकीत प्रकल्पाच्या विविध घटकांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

PM Kisan Scheme: रत्नागिरीतील दीड लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ‘पीएम किसान’चा २२ वा हप्ता जमा

सभेला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शाहा, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके, कृषी उपसंचालक हिना शेख, कृषी विकास अधिकारी अभिजित देवगीरकर, मुख्यमंत्री फेलो संकेत नरुटे तसेच नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक शंकर कोकडवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा घेताना विविध विभागांमधील समन्वय वाढविण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.

जिल्ह्यात कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २.० अंतर्गत एकूण १८९ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व गावांचे आराखडे बैठकीत मंजूर करण्यात आले असून, मृद व जलसंधारणासाठी सुमारे ६८ हजार हेक्टर क्षेत्रावर ८९० कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. या कामांमुळे शेतीची उत्पादकता वाढविणे, पाणी साठवण क्षमता वाढविणे तसेच शाश्वत शेतीला चालना देणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रकल्पासंदर्भातील सादरीकरण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शाहा यांनी केले.

बैठकीदरम्यान कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर माहिती मांडली. तसेच, उपस्थितांनी प्रकल्प अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी विविध सूचना मांडल्या व शंकांचे निरसन करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की, प्रकल्पातील प्रत्येक घटकाचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करून ठरलेल्या वेळेत उद्दिष्टे पूर्ण करावीत. तसेच, प्रकल्पाच्या अंमलबजावणीत पारदर्शकता राखणे आणि गुणवत्तेची खात्री करणे ही सर्व संबंधितांची जबाबदारी आहे, असे त्यांनी नमूद केले.

महाडच्या चवदार तळ्यातील पाणी घेऊन जा अन्…; हर्षवर्धन सपकाळांचे कार्यकर्त्यांना आवाहन

यावेळी पर्यावरण व शेतीसंबंधित विविध बाबींवर विशेष भर देण्यात आला. जलसंधारण, मृदसंवर्धन, पीक विविधीकरण तसेच हवामान बदलाला अनुकूल शेती पद्धती या विषयांवर सखोल चर्चा झाली. प्रकल्पाच्या विविध उपक्रमांची सद्यस्थिती, उद्दिष्टपूर्ती आणि अंमलबजावणीतील अडचणींचा आढावा घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. एकूणच, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० हा जिल्ह्यातील शेती विकासासाठी महत्त्वाचा ठरणार असून, सर्व यंत्रणांनी समन्वयातून काम केल्यास शेतकऱ्यांच्या जीवनमानात निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणता येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Web Title: An absolute need for coordination for sustainable agriculture

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 06:23 PM

Topics:  

  • buldhana news
  • Washim news

संबंधित बातम्या

Buldhana News : गॅस दरवाढ, तुटवड्याविरोधात महिला आक्रमक! शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
1

Buldhana News : गॅस दरवाढ, तुटवड्याविरोधात महिला आक्रमक! शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Buldhana : LPG गॅस सिलेंडर साठी सकाळी चार वाजेपासूनच लागतात रांगा
2

Buldhana : LPG गॅस सिलेंडर साठी सकाळी चार वाजेपासूनच लागतात रांगा

Buldhana News: गारपीट आणि वादळ! चिखली तालुक्यात पिकांचे भारी नुकसान; जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी
3

Buldhana News: गारपीट आणि वादळ! चिखली तालुक्यात पिकांचे भारी नुकसान; जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

अकोल्यात राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक संपावर! ‘या’ तारखेपासून दिला आंदोलनाचा इशारा
4

अकोल्यात राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक संपावर! ‘या’ तारखेपासून दिला आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.