
Binvirodh Candidate List – Municipal Corporation Election 2026
दरम्यान, कुलाब्यातील तीन प्रभागांमध्ये काँग्रेस, जनता दल (एस) आणि आपचे उमेदवार दबावाखाली नामनिर्देशन स्वीकारले गेले नसल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. यासंदर्भात आयोगाने मुंबई महापालिका आयुक्त तसेच वॉर्ड ‘ए’ कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे निर्देश दिले आहेत.
नियमभंग सिद्ध झाल्यास संबंधित निवडणूक अधिकाऱ्यावर कारवाई होऊ शकते. मात्र उमेदवारांना पुन्हा नामनिर्देशन दाखल करण्याची कोणतीही तरतूद नाही. २ जानेवारी (नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम तारीख)नंतर संबंधित परतावा अधिकारी, महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडून अहवाल मागवले जाणार आहेत.
निवडणुका बिनविरोध करण्यात भाजपाने आघाडी घेतली असून आतापर्यंत भाजपाचे तब्बल ४५ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यापाठोपाठ शिंदे गटाच्या शिवसेनेने दुसरा क्रमांक पटकावला असून त्यांच्या १९ नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे.कल्याण–डोंबिवली महापालिकेत भाजपचे सर्वाधिक १५ तर शिवसेनेचे ६ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. याशिवाय अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे २ उमेदवार, तर मालेगावमधून इस्लाम पार्टीचा १ उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे.दरम्यान, राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. कोणत्या महापालिकेत कोणत्या पक्षाचे कोणते उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत, याची संपूर्ण यादी समोर आली आहे.
(Municipal Corporation Election 2026)
भाजप : ४५
शिवसेना (शिंदे गट) : १९
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : २
इतर : १
(Binvirodh Candidate List – Municipal Corporation Election 2026)
कल्याण–डोंबिवली महापालिका
वॉर्ड १८ – रेखा चौधरी (भाजप)
वॉर्ड २६ क – आसावरी नवरे (भाजप)
वॉर्ड २६ ब – रंजना पेणकर (भाजप)
प्रभाग २४ ब – ज्योती पाटील (भाजप)
प्रभाग २७ अ – मंदा पाटील (भाजप)
प्रभाग २४ अ – रमेश म्हात्रे (शिवसेना, शिंदे गट)
प्रभाग २४ ब – विश्वनाथ राणे (शिवसेना, शिंदे गट)
प्रभाग २४ क – वृषाली जोशी (शिवसेना, शिंदे गट)
प्रभाग २८ अ – हर्षल राजेश मोरे (शिवसेना, शिंदे गट)
प्रभाग २६ अ – मुकुंद पेडणेकर (भाजप)
प्रभाग २७ ड – महेश पाटील (भाजप)
प्रभाग १९ क – साई शेलार (भाजप)
प्रभाग ११ अ – रेश्मा निचळ (शिवसेना, शिंदे गट)
प्रभाग २८ ब – ज्योती मराठे (शिवसेना, शिंदे गट)
प्रभाग २३ क – हर्षदा भोईर (भाजप)
प्रभाग २३ अ – दीपेश म्हात्रे (भाजप)
प्रभाग २३ ड – जयेश म्हात्रे (भाजप)
प्रभाग ३० अ – रविना माळी (भाजप)
प्रभाग २५ ड – मंदार हळबे (भाजप)
प्रभाग १९ ब – डॉ. सुनिता पाटील (भाजप)
प्रभाग १९ अ – पूजा म्हात्रे (भाजप)
पनवेल महापालिका
22. प्रभाग १८ ब – नितीन पाटील (भाजप)
23. प्रभाग १९ ब – रुचिरा लोंढे (भाजप)
24. प्रभाग २० अ – अजय बहिरा (भाजप)
25. प्रभाग १९ अ – दर्शना भोईर (भाजप)
26. प्रभाग २० ब – प्रियांका कांडपिळे (भाजप)
27. प्रभाग १८ अ – ममता म्हात्रे (भाजप)
28. प्रभाग १८ क – स्नेहल ढमाले (भाजप)
ठाणे महापालिका
29. प्रभाग १८ ब – जयश्री फाटक (शिवसेना, शिंदे गट)
30. प्रभाग १८ क – सुखदा मोरे (शिवसेना, शिंदे गट)
31. प्रभाग १७ अ – एकता भोईर (शिवसेना, शिंदे गट)
32. प्रभाग १८ ड – राम रेपाळे (शिवसेना, शिंदे गट)
33. प्रभाग १४ अ – शीतल ढमाले (शिवसेना, शिंदे गट)
34. प्रभाग ५ अ – सुलेखा चव्हाण (शिवसेना, शिंदे गट)
35. जयश्री डेव्हिड (शिवसेना, शिंदे गट)
भिवंडी महापालिका
36. प्रभाग १७ अ – सुमित पाटील (भाजप)
37. प्रभाग १६ अ – परेश चौगुले (भाजप)
38. प्रभाग १८ ब – दीपा मढवी (भाजप)
39. प्रभाग १८ अ – अश्विनी फुटाणकर (भाजप)
40. प्रभाग १८ क – अबू साद लल्लन (भाजप)
41. प्रभाग २३ ब – भारती चौधरी (भाजप)
धुळे महापालिका
42. वॉर्ड १ – उज्ज्वला भोसले (भाजप)
43. प्रभाग ६ ब – ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील (भाजप)
44. प्रभाग १७ – सुरेखा उगले (भाजप)
अहिल्यानगर महापालिका
45. प्रभाग ८ ड – कुमार वाकळे (राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट)
46. प्रभाग १४ अ – प्रकाश भागानगरे (राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट)
47. प्रभाग ७ ब – अनिल बोरूडे (भाजप)
48. प्रभाग २ ड – करण कराळे (भाजप)
49. प्रभाग २ ब – सोनाबाई शिंदे (भाजप)
जळगाव महापालिका
50. प्रभाग ९ ब – प्रतिभा देशमुख (शिवसेना, शिंदे गट)
51. प्रभाग ७ अ – विशाल भोळे (भाजप)
52. प्रभाग ७ अ – दीपमाला काळे (भाजप)
53. प्रभाग १६ अ – डॉ. वीरेन खडके (भाजप)
54. वैशाली पाटील (भाजप)
55. अंकिता पाटील (भाजप)
56. रेखा पाटील (शिवसेना, शिंदे गट)
57. विक्रम सोनवणे (शिवसेना, शिंदे गट)
58. मनोज चौधरी (शिवसेना, शिंदे गट)
59. सागर सोनवणे (शिवसेना, शिंदे गट)
60. प्रभाग १२ ब – उज्ज्वला बेंडाळे (भाजप)
61. प्रभाग १८ अ – गौरव सोनवणे (शिवसेना, शिंदे गट)
पुणे महापालिका
62. प्रभाग ३५ – मंजुषा नागपुरे (भाजप)
63. प्रभाग ३५ ड – श्रीकांत जगताप (भाजप)
पिंपरी–चिंचवड महापालिका
64. प्रभाग ६ ब – रवी लांडगे (भाजप)
65. प्रभाग १० ब – सुप्रिया चांदगुडे (भाजप)
मालेगाव महापालिका
66. वॉर्ड ६ क – मुनीरा शेख फकीर मोहम्मद (इस्लाम पार्टी)