Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘देवेंद्र फडणवीसांच्या कृपेने मला कधीही अटक होऊ शकते’; बड्या नेत्यांचा खळबळजनक दावा

राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजणार आहे. त्यापूर्वी राज्यांमध्ये जोरदार राजकीय वाकयुद्ध दिसून येत आहे. सध्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेत्यांनी गंभीर दावा केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी रोष व्यक्त केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 10, 2024 | 11:31 AM
anil dekhmukh target devendra fadnavis

anil dekhmukh target devendra fadnavis

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण रंगले आहे. नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्याने गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेमुळे मला कधीही अटक होऊ शकते असा मोठा दावा शरद पवार गटाचे नेते व आमदार अनिल देशमुख यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना एकच उधाण आले आहे. अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी असे वक्तव्य केले आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ दिवसेंदिवस वाढ होत आहे. राजकीय नेत्यांची अडवणूक केल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली होती. भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस अधिक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आला आहे. यावरुनच सीबीआयकडून देशमुख यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर पोस्ट करुन अनिल देशमुख यांनी त्यांच्या मनातील भीती व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.

काय लिहिले आहे ?

अनिल देशमुख यांनी त्यांच्या ऑफिशियल अकाऊंटवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, देवेंद्र फडणवीस यांनी 4 वर्षा पुर्वीची घटना उकरुण काढीत माझ्या विरुध्द दिल्लीच्या मदतीने CBI FIR दाखल केली आहे. 4 वर्षापुर्वी मी गृहमंत्री असतांना जळगावच्या एका घटनेमध्ये भाजपाचे नेते गिरीष महाराज यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी जळगावच्या पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकला होता, हा माझ्यावर आरोप आहे, असा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी 4 वर्षा पुर्वीची घटना उकरुण काढीत माझ्या विरुध्द दिल्लीच्या मदतीने CBI FIR दाखल केली आहे.
4 वर्षापुर्वी मी गृहमंत्री असतांना जळगावच्या एका घटनेमध्ये भाजपाचे नेते गिरीष महाराज यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी जळगावच्या पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकला होता, हा…
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) September 10, 2024

पुढे त्यांनी लिहिले आहे की, माझ्या माहितीनुसार माझ्यावर रेड टाकुन मला अट‍क करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करीत आहेत. ज्या देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीच्या मदतीने ED-CBI ला हाताशी धरुण महाराष्ट्राचे राजकारण अतिशय खालच्या स्तरावर आणले त्यांना सांगु ईच्छीतो की, देवेंद्र फडणवीस मी माझ्या अटकेची वाट पाहत आहे, असे विधान अनिल देशमुख यांनी केले आहे.

Web Title: Anil deshmukh says that he is ready for the arrest on any time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2024 | 11:22 AM

Topics:  

  • anil deshmukh
  • BJP
  • devendra fadnavis
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Amit Shah : “जर भाजप जिंकला, तर पश्चिम बंगालचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल?” अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं…
1

Amit Shah : “जर भाजप जिंकला, तर पश्चिम बंगालचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल?” अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं…

Asha Bhosle : सुरांची सुंदर बाग आज उजाड…! CM देवेंद्र फडणवीसांनी आशाताईंच्या निधनावर व्यक्त केला शोक
2

Asha Bhosle : सुरांची सुंदर बाग आज उजाड…! CM देवेंद्र फडणवीसांनी आशाताईंच्या निधनावर व्यक्त केला शोक

खानवडीत ‘ज्योती-सावित्री’ शाळेचे उद्घाटन; महिलांच्या ३३% आरक्षण निर्णयाला फुले विचारांची जोड
3

खानवडीत ‘ज्योती-सावित्री’ शाळेचे उद्घाटन; महिलांच्या ३३% आरक्षण निर्णयाला फुले विचारांची जोड

बोगस उपसूचना प्रकरण: विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर आक्रमक; आयुक्तांकडे केली मोठी मागणी
4

बोगस उपसूचना प्रकरण: विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर आक्रमक; आयुक्तांकडे केली मोठी मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.