Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asha Bhosle : सुरांची सुंदर बाग आज उजाड…! CM देवेंद्र फडणवीसांनी आशाताईंच्या निधनावर व्यक्त केला शोक

सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनामुळे सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. मराठमोळ्या आशा भोसले यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 12, 2026 | 02:26 PM
CM Devendra Fadnavis expressed condolences following passing of Asha Bhosle Bollywood news

CM Devendra Fadnavis expressed condolences following passing of Asha Bhosle Bollywood news

Follow Us
Follow Us:

जेष्ठ गायिका आशा ताई भोसले यांचे निधन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला शोक
लतादिदींनंतर आणखी एक तारा निखळला – सीएम फडणवीस

CM Fadnavis condoles on Asha Bhosle : मुंबई : ज्येष्ठ बॉलिवूड पार्श्वगायिका आशा भोसले यांचे निधन झाले आहे. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनामुळे बॉलीवुडवर शोककळा पसरली आहे. शनिवारी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना हृदयविकाराच्या झटका आल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज (दि.12) त्यांची प्राणज्योत मालावली. आशा भोसले यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 

पद्मविभूषण गायिका आशा भोसले यांच्यावर उद्या (दि.13) अंत्यसंस्कार होणार आहेत. आशा भोसले यांना शासकीय इतमामात निरोप दिला जाईल. शिवाजी पार्कवर सायंकाळी 4 वाजता आशा ताई भोसले यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनानंतर बॉलीवुडवर शोककळा पसरली असून सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करुन भावना व्यक्त केल्या आहेत.

हे देखील वाचा : संगीत विश्वातील सूर हरवला…! सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन

काय आहे देवेंद्र फडणवीसांची पोस्ट? 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले आहे की, “तीन वर्षांपूर्वी धडाक्यात नव्वदी साजरी करणार्‍या ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने मंगेशकर घराण्यातील लतादिदींनंतर आणखी एक तारा निखळला आहे. सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली.

आशाताईंचा आवाज म्हणजे संगीताचा आत्मा होता. गायनातील बारमाही हिरवा ऋतू आणि भावभावनांचा सुरेल असा महासागर म्हणजे आशाताई. ‘तोरा मन दर्पण कहलाए’ अशा भावपूर्ण गाण्यापासून ‘खल्लास’पर्यंत अनेक मूडची गाणी लीलया गाणार्‍या आशाताई भोसले यांनी भक्तिगीत, भावगीत, नाट्यसंगीत, गझल, शास्त्रीय संगीत, रवींद्र संगीत, लोकगीते, पॉप असे अनेक संगीत प्रकारांसंगीत विश्वातील सूर हरवला…! सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधनचे गायन करताना त्यावर आपला वेगळा ठसा उमटवला. मराठी, हिंदी, बांगलासह 20 भारतीय भाषा आणि विदेशी भाषांमध्ये 12,000 वर गाणी त्यांनी गायली.”

तीन वर्षांपूर्वी धडाक्यात नव्वदी साजरी करणार्‍या ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने मंगेशकर घराण्यातील लतादिदींनंतर आणखी एक तारा निखळला आहे. सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली.
आशाताईंचा आवाज म्हणजे… pic.twitter.com/pAcDLxeXqo
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 12, 2026

‘महाराष्ट्र भूषण’सारखा ‘बांगला विभूषण’ पुरस्कारही त्यांना बहाल केला गेला. बदलांना सहजरित्या आत्मसात करणार्‍या अशा अष्टपैलू गायिका पुन्हा होणे नाही. अलिकडेच जागतिक रेडिओ दिनाच्या कार्यक्रमात आम्ही सोबत होतो, त्यांनी आग्रह करुन ‘अभी ना जाओ छोडकर…’ हे गाणे माझ्याकडून गाऊन घेतले होते आणि ‘पहा मी मुख्यमंत्र्यांना गाणं गायला लावले’, असे म्हणाल्याही होत्या. त्या आशाताईंचा सहवास आता आपल्याला लाभणार नाही, ही कल्पनाच करवत नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि देशभरातील असंख्य चाहत्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.

हे देखील वाचा :  Asha Bhosle फक्त गायिका नाही तर बिझनेसवुमन; दुबई अन् लंडनमध्ये व्यवसाय, तर कोट्यवधींची संपत्ती

Web Title: Cm devendra fadnavis expressed condolences following passing of asha bhosle bollywood news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 02:26 PM

Topics:  

  • asha bhosle
  • Bollywood singer
  • devendra fadnavis

संबंधित बातम्या

काय आहे Thumpn स्टार्टअप? Arijit Singh पासून Badshah पर्यंत मोठ्या सिंगर्सनी लावलेत पैसे; काय होणार फायदा?
1

काय आहे Thumpn स्टार्टअप? Arijit Singh पासून Badshah पर्यंत मोठ्या सिंगर्सनी लावलेत पैसे; काय होणार फायदा?

‘कामगार अजूनही ढिगाऱ्याखाली अन् मुख्यमंत्री पंचतारांकित हॉटेल मध्ये…’मोशी दुर्घटनेवरून हर्षवर्धन सपकाळ यांचा फडणवीसांवर निशाणा
2

‘कामगार अजूनही ढिगाऱ्याखाली अन् मुख्यमंत्री पंचतारांकित हॉटेल मध्ये…’मोशी दुर्घटनेवरून हर्षवर्धन सपकाळ यांचा फडणवीसांवर निशाणा

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफी का लांबली? केंद्र सरकारच्या ‘त्या’ डेटामुळे प्रक्रिया रखडली
3

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफी का लांबली? केंद्र सरकारच्या ‘त्या’ डेटामुळे प्रक्रिया रखडली

Maharashtra politics : 2029 पूर्वी देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होणार? मुख्यमंत्र्यांबाबत बड्या नेत्याचं विधान, राजकीय चर्चांना उधाण
4

Maharashtra politics : 2029 पूर्वी देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होणार? मुख्यमंत्र्यांबाबत बड्या नेत्याचं विधान, राजकीय चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.