
Anjali Damania Reaction on Pankaja Munde PA Anant Garje Wife Dr. Gauri Palve Suicide Case
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या डॉ. गौरी पालवे यांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी पुढे आल्या आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहे. अंजली दमानिया यांनी गौरी पालवे यांनी लग्नाच्या अवघ्या 10 महिन्यांमध्ये आत्महत्या केल्याने न्यायव्यवस्थेवर आक्षेप घेतला. अंजली दमानिया म्हणाल्या की, न्याय कशाला म्हणायचे हे कळत नाही. डॉक्टर मुलीची आत्महत्या आहे. गौरी आत्महत्या करेल अशी बिल्कुल मुलगी नव्हती. लग्नात आई वडील असताना त्यांना ही घटना कळाली. एका स्टेटमेंट मध्ये आत्महत्या केली असे म्हटले होते. याप्रकरणी पोलिसांच्या तपासानंतर आणि डॉक्टर रिपोर्टनंतर ही हत्या आहे की आत्महत्या हे स्पष्ट होईल,” असे अंजली दमानिया यांनी सांगितले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे अंजली दमानिया यांनी गौरीची बाजू मांडत गर्जे कुटुंबावर आरोप केले. त्या म्हणाल्या की, “डॉ. गौरी साधी होती, पण स्ट्राँग होती. आत्महत्या करेल अशी ती मुलगी नव्हती. गौरीच्या आईवडिलांना रात्री पावणे सातच्या आसपास कळालं. ते बीडला लग्नात होते. तिथून ते वरळी पोलीस ठाण्यात आले. त्याच्या आधी त्यांना मुलीला अशा अवस्थेत नायर हॉस्पिटलमध्ये पाहावं लागलं. पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर व्हायला वेळ लागला. आधी स्टेटमेंटमध्ये आत्महत्या केली असं म्हटलं होतं. पण वडिलांनी सांगितलं आम्हाला माहीत नाही तिने आत्महत्या केली की तिचा घात केला. तर आताचे एसीपी चांगले आहेत. त्यांनी ताबडतोब करेक्शन केलं. आम्ही त्यांना सांगितलं. आता एफआयआर केला आहे,” अशी माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे अंजली दमानिया म्हणाल्या की, “आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं असा एफआयआर आहे. पोस्टमार्टेममध्ये घात झाल्याचं निष्पन्न झाल्यावर सप्लिमेंटरी जोडून ३०२चा गुन्हा दाखल करू असं पोलिसांनी सांगितलं. ते फॅक्ट आहे. मी दोन सरकारचे पीपी आहेत. त्याबाबत कन्फर्म केलं. डोकं सुन्न करणाऱ्या गोष्टी महाराष्ट्रात होत आहे. अशा लोकांना काय म्हणायचं. शिक्षा झाली पाहिजे हे आपण तेच तेच बोलतो. आधी वैष्णवी झाली. नंतर संपदा झाली. संपदाही बीडचीच होती. आता गौरी. आईवडिलांनी काबाडकष्ट करून मुलींना उच्चशिक्षित केलं. त्यानंतर हे होत असेल तर लोकांची मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे,” असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला.
Ans: राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे (pankaja munde) यांचे स्वीय सहाय्यक (PA) अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे.
Ans: अनंत गर्जे हे पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक असून त्यांच्या पत्नीने आत्महत्या केली.