Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Antilia Case : परमबीर सिंह यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न; सेवानिवृत्त ACP बी. आर. घाडगेंची कोर्टात याचिका, सोमवारी सुनावणी

Antilia Case : अँटिलिया प्रकरणातील तपासावर प्रश्न उपस्थित करत सेवानिवृत्त ACP बी. आर. घाडगे यांनी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली असून याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 29, 2026 | 08:05 PM
Antilia Case : परमबीर सिंह यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न; सेवानिवृत्त ACP बी. आर. घाडगेंची हायकोर्टात याचिका

Antilia Case : परमबीर सिंह यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न; सेवानिवृत्त ACP बी. आर. घाडगेंची हायकोर्टात याचिका

Follow Us
Follow Us:
  • सेवानिवृत्त ACP बी. आर. घाडगेंची कोर्टात याचिका
  • परमबीर सिंह यांच्या भूमिकेवर उपस्थित केले गंभीर सवाल
  • सायबर तज्ज्ञाला 5 लाख रुपये देण्यासह अहवालातील कथित बदलांवर प्रश्न
 

Antilia Case : अँटिलिया प्रकरणातील तपास यंत्रणेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सेवानिवृत्त एसीपी बी. आर. घाडगे यांनी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेच्या माध्यमातून तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे.

कल्याण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत घाडगे आणि त्यांचे वकील अॅड. भूषण बेंद्रे यांनी यासंदर्भातील माहिती दिली.

‘जैश उल हिंद’च्या संदेशाचा मुद्दा काय?

अँटिलिया प्रकरणात ‘ टेलीग्राम’ या माध्यमातून एक संदेश प्राप्त झाला होता. या संदेशामध्ये ‘जैस उल हिंद’ या संघटनेने जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करण्यात आला होता. २१ मार्च २०२१ रोजी सायबर तज्ज्ञ ईशांत सिन्हा यांनी या संदेशासंदर्भातील माहिती तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना दिल्याचे सांगण्यात येते.जैस उल हिंद या संघटनेचा जो मेसेज होता तो तिहार जेलमधून ऑपरेट केला गेला असल्याचे सायबर एक्स्पोर्ट यांनी सांगितले.

‘तुम्ही स्वतःला देव समजता का?’ हायकोर्टाचा FDA ला सवाल; मुंबई क्रिकेट असोसिएशनला मोठा दिलासा

पाच लाख रुपये का दिले? घाडगेंचे सवाल

परमबीर सिंह यांनी ईशांत सिन्हा यांना संबंधित माहिती मुंबई पोलीस आयुक्तांच्या अधिकृत ई-मेलवर पाठवण्यास सांगितले. त्यासाठी सिन्हा यांना पाच लाख रुपये देण्यात आहे. ही सर्व बाब सायबर एक्सपोर्ट ईशांत सिन्हा यांनी तपास यंत्रणेला दिलेल्या आपल्या जबाब समोर आली आहे. त्यानंतर सिन्हा यांनी तयार केलेल्या अहवालामध्ये काही बाबी वाढवून तो पुढे पाठवण्यात आल्याचे तपास यंत्रणेला दिलेल्या त्यांच्या जबाबातून समोर आल्याचा दावा घाडगे आणि अॅड. बेंद्रे यांनी केला आहे. ईशांत सिन्हा यांनी २५ ऑगस्ट २०२१ रोजी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांसमोर हा जबाब नोंदवला असल्याचे त्यांनी सांगितले.

ईशांत सिन्हा हे तपासातील साक्षीदार क्रमांक १५२ असल्याचेही घाडगे यांनी सांगितले. त्यांच्या जबाबाची प्रत घाडगे आणि अॅड. भूषण बेंद्रे यांनी पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांसमोर सादर केली.

पुणेकरांना दिलासा! बांधकाम परवानगीसोबतच होणार जमीन ‘एनए’; जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फेऱ्या वाचणार

याचिकेवर होणार सोमवारी सुनावणी

या पार्श्वभूमीवर, परमबीर सिंह यांनी सायबर तज्ज्ञाला पाच लाख रुपये का दिले? हे पैसे कुठून देण्यात आले? अहवालात कथितरीत्या वाढीव माहिती का समाविष्ट करण्यात आली? आणि या प्रकरणात परमबीर सिंह यांना आरोपी का करण्यात आले नाही? असे प्रश्न घाडगे यांनी उपस्थित केले आहेत.या सर्व बाबींची चौकशी करून तपास यंत्रणेच्या भूमिकेची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याचे घाडगे आणि त्यांच्या वकिलांनी सांगितले. या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे.

Web Title: Antilia case param bir singh role br ghadge mumbai session court petition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 07:01 PM

Topics:  

  • antilia case
  • Maharashtra Police
  • Mumbai Police
  • Parambir Singh

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.