Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुस्तकांचे गाव संकल्पेनुसार आता महाराष्ट्रात होणार ‘कवितांचे गाव’; मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिले निर्देश

महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पिंपरी चिंचवड येथे झालेल्या बैठकीमध्ये पुस्तकांचे गाव संकल्पेनुसार कवितांचे गाव तयार करण्याच्या संकल्पनेवर काम करण्यासंबंधी महत्वाचे निर्देश दिले आहेत.

  • By नारायण परब
Updated On: Dec 25, 2024 | 04:41 PM
पुस्तकांचे गाव संकल्पेनुसार आता महाराष्ट्रात होणार ‘कवितांचे गाव’; मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिले निर्देश
Follow Us
Close
Follow Us:

पुस्तकांचे गाव या संकल्पनेच्या अनुषंगाने त्या त्या जिल्ह्यातील नामांकित लेखकांची नावांची यादी करावी तसेच कवितांचे गाव या संकल्पनेवरही काम करावे. तसेच मराठी भाषा विभागाने मराठी भाषेचा गौरव वाढेल अशा पद्धतीने काम करतानाच हा विभाग प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने काम करावे, असे निर्देश मराठी भाषा मंत्री उदय सामंत व्यक्त केली.पिंपरी चिंचवड येथे मराठी भाषा विभाग आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागाचे सहसचिव नामदेव भोसले, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, मराठी भाषा विभागाचे अवर सचिव नितीन डंगारे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक तथा विश्वकोश निर्मिती मंडळाचे प्रभारी सचिव डॉ. शामकांत देवडे, भाषा संचालक विजया डोणीकर, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील, विभागाच्या कक्ष अधिकारी ऐश्वर्या गोवेकर आदी उपस्थित होते.

मंत्री उदय सामंत म्हणाले, राज्यभाषेला अभिजात भाषेचा दर्जा असलेल्या तामिळनाडू किंवा अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रानेही आपल्या भाषेच्या विकासासाठी केंद्र शासनाकडून अधिकाधिक निधी मिळावा यासाठी प्रस्ताव पाठवून गतीने पाठपुरावा करावा.

Maharashtra Weather: राज्यात ‘या’ दिवशी गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

दुसरे विश्व मराठी संमेलन पुण्यामध्ये

ते पुढे म्हणाले, दुसरे विश्व मराठी संमेलन 27, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च असे तीन दिवस पुणे येथे घेण्यात येईल. त्यासाठी विभागाने तयारी करावी. तसेच दिल्ली येथे होणाऱ्या विश्व साहित्य संमेल्लनात मराठी भाषेसाठी एक तास राखून त्या माध्यमातून जागतिक स्तरावर मराठी भाषा जाईल यासाठी प्रयत्न करावेत.

महिला साहित्य समेंलने आणि युवा साहित्य समेंलने

राज्यस्तरावर महिला साहित्य संमेलन तसेच विभागनिहाय युवा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचे नियोजन करावे, असे निर्देशही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिले. देशातील सर्व बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळांना आमंत्रित करुन मराठी भाषेसाठी काय योगदान देता येईल यासाठी त्यांच्या सूचना जाणून घ्याव्यात. सर्व महाविद्यालयात मराठी भाषा विभागाची प्रकाशने ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.

कवितांचे गाव या संकल्पनेवरही काम करावे

सर्व विद्यापीठातील मराठी भाषा विभागात मराठी भाषा संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी प्रस्ताव करावेत. पुस्तकांचे गाव या संकल्पनेच्या अनुषंगाने त्या त्या जिल्ह्यातील नामांकित लेखकांची नावांची यादी करावी, त्याचप्रमाणे कवितांचे गाव या संकल्पनेवरही काम करावे. शासनाच्या सर्व विभागांच्या प्रदर्शनात मराठी भाषा विभागाचे दालन असले पाहिजे, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

मराठी भाषेला अभिजात मिळाल्याचे महत्त्व तसेच त्यामुळे होणारे लाभांची माहिती युवकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत. मराठी भाषा विभागांतर्गत असलेल्या सर्व संस्था, मंडळ, संचालनालयांना चांगली जागा मिळण्यासाठी प्रस्ताव करावेत, त्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

Nashik News: अजित पवारांचं टेन्शन वाढणार..; राष्ट्रवादीच्या आमदाराने दिला राजीनाम्याचा इशारा

Web Title: As per the instructions of marathi language minister uday samant a poetry village will be created in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2024 | 04:39 PM

Topics:  

  • maharashtra
  • Uday Samant

संबंधित बातम्या

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकॉनमीच्या मार्गावर;  पॉवर-पॅक MH 1st Conclave 2025 साठी मंच सज्ज
1

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकॉनमीच्या मार्गावर; पॉवर-पॅक MH 1st Conclave 2025 साठी मंच सज्ज

महाराष्ट्राची १.५ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल,  MH 1st Conclave 2025 बनणार संवादाचे व्यासपीठ
2

महाराष्ट्राची १.५ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल, MH 1st Conclave 2025 बनणार संवादाचे व्यासपीठ

Pratap Sarnaik : प्रवाशांची आर्थिक लुट करणाऱ्या ॲप आधारित टॅक्सी संस्थांवर होणार कडक कारवाई
3

Pratap Sarnaik : प्रवाशांची आर्थिक लुट करणाऱ्या ॲप आधारित टॅक्सी संस्थांवर होणार कडक कारवाई

Devendra Fadnavis : कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम व मागास जिल्ह्यांमध्ये काम करावे, देवेंद्र फडणवीसांचे आवाहन
4

Devendra Fadnavis : कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम व मागास जिल्ह्यांमध्ये काम करावे, देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.