आधी शिंदे आता पवार, बनावट सही प्रकरण उघड; सरकारी अधिकारी असल्याची बतावणी करून फसवणूक
Nashik News:राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून महायुतीच्या अडचणी थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे काही नेत्यामंध्ये नाराजी आहे, तर खातेवाटपात आवडीचे खाते न मिळाल्यामुळेही काही नेते नाराज आहेत. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघेही नाराज आहेत. अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांची नाराजी कायम असतानाच आता राष्ट्रवादीचे आणखी एक बड्या नेत्यांनी आपली नाराजी जाहीर केली आहे. त्यामुळे अजितपवारांमागच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
काँग्रेसमधून बंडखोरी करून अजित पवांराच्या राष्ट्रवादी गेलेले राष्ट्रवादीचे आमदार आमदार हिरामण खोसकरांनी त्यांच्या मतदारसंघातील मतदारांच्या अडचणीं मांडत आक्रमक झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील त्यांच्या इगतपुरी मतदारसंघातील धरणांची पाणी इतर जिल्ह्यांना दिले जाते, मात्र आपल्याच मतदारसंघातील आदिवासी आणि शेतकऱ्यांना मिळत नाही, शासनाच्या उदासीनतेमुळे आपल्या मतदारसंघातील शेतकरी आणि आदिवासी उपेक्षितच राहतात, अशी नाराजी हिरामण खोसकर यांनी व्यक्त केली आहे.
यावरूनच नाराजी व्यक्त करत हिरामण खोसकरांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. मु्ख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याना आपल्या मतदारसंघातील भावली धरणाच्या पाण्यासाठी मागणी केली आहे. इगतपुरीतील भावली धरणाचे पाणी शहापूर तालुक्याला मिळावे, यासाठी त्यांनी राज्य सरकारला साकडे घातले आहे.
आपल्या मतदारसंघातील धरणाचे पाण इतर जिल्ह्यांना मिळते, पण आपल्याच मतदारसंघातील शेतकरी आणि आदिवासांना पाण्यापासून अनेक वर्षे वंचित ठेवल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. जलसंपदा विभागाकडूनही त्यांची उपेक्षा केली जात असल्याचे खोसकरांनी म्हटले आहे. इतकेच नव्हे तर इगतपुरी तालुक्यातील भावली धरणाचे पाणी शहापूरला न मिळाल्यास आमदारकीचा राजीनामाच देऊ, असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर अद्याप काही आमदारांनी आपला कार्यभार स्वीकारल्यावर अशी वेळ आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. या संदर्भात त्यांनी हिवाळी अधिवेशनात विधिमंडळात आवाज उठवला होता. विधानसभेत इगतपुरीतीली भावली धरणाचे पाणी अन्य जिल्ह्यांना देण्यास तीव्र विरोध करत हे पाणी आपल्या मतदारसंघातील शेतकरी आणि आदिवासींच्या वाटेच्या असल्याचे म्हटले आहे.
पाण्याच्या बाटलीचं झाकण निळ्या रंगाचं का असतं? वेगवेगळ्या रंगामध्ये दडलाय अनोखा अर्थ
दरम्यान हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर ते मतदारंसघात गेल्यानंतर त्यांनी आपल्या या मागण्यांसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आहे. राज्य सरकारने भावली धरणाचे पाणी अन्य जिल्ह्यांना दिल्यास आपण राजीनामा देऊ, असा इशाराच त्यांनी दिला आहे. त्यामुळे आता अजित पवार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
2019च्या निवडणुकात हिरामण खोसककर काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून निवडून आले होते. जुलै महिन्यात झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत त्यांच्यावर क्रॉस वोटिंग चा आरोप करण्यात आला. काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेदातून त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यावर त्यांनी नाशिकच्या इगतपुरी मतदारसंघातून निवडणूक लढवली. ते दुसऱ्यांदा विजयी झाले. निवडणुकीचा निकाल लागून महिना होत नाही, तोच त्यांनी आता राज्य सरकारला राजीनाम्याचा इशारा दिला आहे.