Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashadhi Ekadashi 2026: विठ्ठल भक्तांसाठी मोठी आनंदवार्ता! १६ जुलैपासून विठुरायाचे २४ तास अखंड दर्शन सुरू होणार

Ashadi Ekadashi 2026: पंढरपूर आषाढी यात्रेनिमित्त १६ जुलै २०२६ पासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात २४ तास अखंड दर्शन व्यवस्था सुरू होणार आहे. २५ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडेल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 26, 2026 | 09:18 PM
विठ्ठल भक्तांसाठी मोठी आनंदवार्ता! (Photo Credit- X)

विठ्ठल भक्तांसाठी मोठी आनंदवार्ता! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • विठ्ठल भक्तांसाठी मोठी आनंदवार्ता!
  • १६ जुलैपासून विठुरायाचे २४ तास अखंड दर्शन सुरू होणार
  • २५ जुलैला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा
शिवाजी हळणवर,पंढरपूर: आषाढी यात्रेत यंदा विठ्ठल भक्तांसाठी मोठी आनंदवार्ता समोर आली असून दि.16 जुलैपासून श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात 24 तास अखंड दर्शन व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे. श्रींचा पलंग काढून भाविकांना रात्रंदिवस दर्शन घेता येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

सन 2026 मधील आषाढी एकादशी शनिवार, दि.25 जुलै रोजी होत असून पहाटे 2.20 वाजता मुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा पार पडणार आहे. यंदाची आषाढी यात्रा दि.15 ते 29 जुलैदरम्यान होणार असून त्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीची महत्त्वपूर्ण बैठक भक्तनिवास येथे पार पडली.

सभेत आषाढी यात्रेच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. दर्शनरांग नियोजन, लाईव्ह दर्शन, सुरक्षा, स्वच्छता, पिण्याचे पाणी, निवास व्यवस्था, अन्नछत्र यांसह भाविकांच्या सोयी-सुविधांवर विशेष चर्चा झाली.

दरम्यान, जतन-संवर्धन कामांतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर आणि श्री व्यंकटेश मंदिर येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा करून जुलै महिन्यात ही मंदिरे भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आषाढीपूर्वी भक्तांना आणखी दोन मंदिरांचे दर्शन लाभणार आहे.

Ashadhi Wari 2026: आषाढी वारीपूर्वी मंदिर परिसरातील कामे पूर्ण करा; जिल्हाधिकाऱ्यांचे संबंधित यंत्रणांना आदेश

याशिवाय मंदिराचे मूळ स्वरूप अबाधित राखण्यासाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. “श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार” यंदाही देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

सभेत सन 2026-27 च्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. तसेच “जगद्गुरू अभंग गाथावन” आणि “श्री ज्ञानेश्वरी तपोवन” या पर्यावरण संवर्धन अभियानांत मंदिर समितीचा सहभाग निश्चित करण्यात आला.

भक्तनिवासातील 5 व 8 बेडच्या खोल्या वातानुकूलित करणे, 24 तास गरम पाण्यासाठी हिट पंप यंत्रणेचे अद्यावतीकरण, तसेच अधिकृत मठांमध्ये शौचालय उभारणीचे निर्णयही बैठकीत घेण्यात आले.

मंदिर समितीची ही बैठक सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कार्यकारी अधिकारी लेखा अधिकारी मुकेश आणि च्या पुरातत्व विभागाचे विलास वाहने सार्वजनिक बांधकाम विभाग भागाचे श्रीनिवास गुजरे वास्तुविशारद तेजस्विनी आफळे तसेच जतन संवर्धन कामाचे ठेकेदार प्रतिनिधी आणि समितीचे खाते प्रमुख विविध विभागांचे अधिकारी आणि मंदिर समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Pandharpur: पंढरपुरात भाविकांचा महापूर! व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद, दर्शन रांगेत घुसखोरी करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल

Web Title: Ashadhi ekadashi 2026 continuous 24 hour darshan of lord vitthuraya to begin on july 16

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 09:17 PM

Topics:  

  • aashadhi ekadashi
  • pandharpur
  • Temple Darshan

संबंधित बातम्या

साबुदाणा खाऊन ॲसिडिटी होते? मग आषाढी एकादशीच्या उपवासाला खा ‘हे’ पौष्टिक पदार्थ, पचायला हलके
1

साबुदाणा खाऊन ॲसिडिटी होते? मग आषाढी एकादशीच्या उपवासाला खा ‘हे’ पौष्टिक पदार्थ, पचायला हलके

Ashadhi Wari 2026: रुक्मिणी मातेची मानाची पालखी का आहे विशेष? जाणून घ्या ४०० वर्षांची गौरवशाली परंपरा
2

Ashadhi Wari 2026: रुक्मिणी मातेची मानाची पालखी का आहे विशेष? जाणून घ्या ४०० वर्षांची गौरवशाली परंपरा

आषाढी एकादशीच्या उपवासासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा उपवास स्पेशल गूळ-शेंगदाणा लाडू! नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी
3

आषाढी एकादशीच्या उपवासासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा उपवास स्पेशल गूळ-शेंगदाणा लाडू! नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी

‘ज्ञानोबा माऊली’च्या गजरात चांदोबाच्या लिंबावर माऊलींचा अश्व धावला! आषाढी वारीतील पहिले उभे रिंगण उत्साहात संपन्न
4

‘ज्ञानोबा माऊली’च्या गजरात चांदोबाच्या लिंबावर माऊलींचा अश्व धावला! आषाढी वारीतील पहिले उभे रिंगण उत्साहात संपन्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.