Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पेंग्विन सेनाप्रमुखांना मराठी माणसाला थापेबाजी, आणि गुजराती माणसाबद्दल शत्रुत्‍व निर्माण करायचंय – आशिष शेलार

ज्‍या जलदगतीने आघाडी  सरकारने विदेशी दारूला कर सवलती दिल्‍यात त्‍याच जलदगतीने फॉक्सकोन आणि वेदांता प्रकल्प महाराष्‍ट्रात यावा म्‍हणून कर सवलती दिल्‍याचा कागदोपत्री एखादा पुरवा दाखवा, असे आव्‍हान देत मुंबई भाजपा अध्‍यक्ष व आमदार आशिष शेलार यांनी आज पुन्‍हा एकदा जोरादार हल्‍लाबोल केला. (Ashish shelar press conference)

  • By Amrut Sutar
Updated On: Sep 15, 2022 | 04:32 PM
पेंग्विन सेनाप्रमुखांना मराठी माणसाला थापेबाजी, आणि गुजराती माणसाबद्दल शत्रुत्‍व निर्माण करायचंय – आशिष शेलार
Follow Us
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्रातील वेदांता-फॉक्सकॉनचा (Vedanta Foxconn) दोन लाख कोटी रुपये गुंतवणूक असलेला प्रकल्प गुजरात (Gujrat) राज्यात गेल्यामुळं सध्या राज्यात बरेच आरोप प्रत्यारोपांचे राजकारण सुरु आहे. दरम्यान, यावर आता विरोधक आक्रमक होत शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde fadnvis government) टिका करत आहेत. सरकारच्या निषेधार्थ मोर्चे व आंदोलन काढत असताना, आता सत्ताधारी सुद्धा आक्रमक होत पलटवार करत आहेत. भाजपा नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद (Ashish shelar pc) घेत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) व शिवसेनेवर (Shivsena) टिकास्त्र सोडले आहे. ज्‍या जलदगतीने आघाडी  सरकारने विदेशी दारूला कर सवलती दिल्‍यात त्‍याच जलदगतीने फॉक्सकोन आणि वेदांता प्रकल्प महाराष्‍ट्रात यावा म्‍हणून कर सवलती दिल्‍याचा कागदोपत्री एखादा पुरवा दाखवा, असे आव्‍हान देत मुंबई भाजपा अध्‍यक्ष व आमदार आशिष शेलार यांनी आज पुन्‍हा एकदा जोरादार हल्‍लाबोल केला. (Ashish shelar press conference)

[read_also content=”…तर पंतप्रधान मोदी माझी माफी मागतील का? मनीष सिसोदिया यांचा मोदींना सवाल https://www.navarashtra.com/india/pm-narendra-modi-sorry-say-to-me-manish-sisodia-326264.html”]

दरम्यान, याप्रकरणी उध्‍दव ठाकरे यांची शिवसेना आणि आदित्‍य ठाकरे यांची पेग्विनसेना भ्रम निर्माण करून मराठी माणसाला थापेबाजी आणि गुजराती माणसाबद्दल शत्रुत्‍व निर्माण करायचे काम करीत आहे, असा आरोपही आमदार आशिष शेलार यांनी केला. आज वांद्रे येथे भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन फॉक्सकोन आणि वेदांता प्रकल्‍पावरुन शिवसेनेवर प्रश्‍नांची सरबत्‍ती केली.  यावेळी आमदार अॅड आशिष शेलार पुढे म्‍हणाले की,  पेंग्विन सेनेकडून या घटनेबाबत भ्रम निर्माण केला जातो आहे. पेंग्विन सेना जनतेमध्ये भ्रम निर्माण करण्याचं काम करत आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात होता तर, या प्रकल्पाची पायाभरणी, भूमिपूजन झालं होतं का? असा प्रश्नही शेलार यांनी उपस्थित केला आहे.

फॉक्सकोन आणि वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात होता तर तो गुजरातला नेला गेला तर राज्यात तो होता कधी? त्याच्या जागेचा प्रश्न सोडवला कधी? करारनामा झाला कधी? या प्रश्नांची उत्तर आम्हाला पेंग्विन सेनेकडून हवी आहेत. केवळ तुमच्या मनातला मुख्यमंत्री झाला नाही. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्‍व. आनंद दिघे यांच्या विचारांचा शिवसैनिक मुख्यमंत्री झाला म्हणून त्यांना हिणवणार असाल आणि घालून पाडून बोलणार असाल तर माझी मुख्यमंत्र्याना विनंती आहे की, मी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तर पेंग्विनसेना देत नसेल तर निवृत्त न्यायधिशांमार्फत चौकशी करा.

Web Title: Ashish shelar press conference about vedanta target to aditya thackeray and shivsena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2022 | 04:31 PM

Topics:  

  • Ashish Shelar
  • Gujrat
  • Shinde fadnvis government
  • shivsena
  • Vedanta Foxconn

संबंधित बातम्या

Gujrat : गिरनंतर बरडा जंगल बनले आशियाई सिंहांचे नवे आश्रयस्थान; १७ सिंहांचा अधिवास
1

Gujrat : गिरनंतर बरडा जंगल बनले आशियाई सिंहांचे नवे आश्रयस्थान; १७ सिंहांचा अधिवास

Gajanan Kirtikar : गजानन कीर्तिकर शिंदेंची साथ सोडणार अन ठाकरे गटात जाणार? कीर्तिकारांनी अखेर मौन सोडलं
2

Gajanan Kirtikar : गजानन कीर्तिकर शिंदेंची साथ सोडणार अन ठाकरे गटात जाणार? कीर्तिकारांनी अखेर मौन सोडलं

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?
3

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?

Shiv Sena Symbol Case : शिवसेनेच्या पक्षघटनेवर गंभीर सवाल; शिंदे गटाच्या वकिलांनी कोर्टात काय सांगितलं?
4

Shiv Sena Symbol Case : शिवसेनेच्या पक्षघटनेवर गंभीर सवाल; शिंदे गटाच्या वकिलांनी कोर्टात काय सांगितलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.