Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अडीच कोटींच्या सोन्यावर डल्ला? कलकत्त्यात दागिने बनविण्याच्या बहाण्याने 3.98 किलो सोने घेऊन सहा जण फरार

आटपाडीतील सराफाचे तब्बल अडीच कोटी रुपये किमतीचे 3.985 किलो सोने दागिने तयार करण्यासाठी कलकत्त्यात नेल्यानंतर सहा जण फरार झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 27, 2026 | 09:43 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

पंढरपूर / शिवाजी हळणवर : आटपाडी तालुक्यातील कौठुळी येथील एका सराफाचे तब्बल अडीच कोटी रुपये किमतीचे ३ किलो ९८५ ग्रॅम वजनाचे २२ कॅरेटचे सोने दागिने तयार करण्यासाठी कलकत्ता येथे घेऊन गेलेले दोन कामगार आणि त्यांचे चार साथीदार सोन्यासह फरार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सहाजणांविरुद्ध आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत विकास विलास कदम (वय ४३, रा. कौठुळी, ता. आटपाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोमनाथ अंबादास फाटे, बालाजी रामदास फाटे (रा. गार्डी, ता. पंढरपूर), प्रकाश भारत चव्हाण (रा. गार्डी), बाळासाहेब नामदेव पुजारी (रा. सोनके), शरद भीमराव पवार (रा. तिसंगी, ता. पंढरपूर) आणि अतुल गुलाबराव शिंदे (रा. पाटकुळ, ता. मोहोळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विकास कदम आणि त्यांचे भागीदार धोंडिराम मोरे (रा .दिंघची)यांचे आटपाडी येथे ‘साहिल ज्वेलर्स अँड बुलियन’ नावाचे सराफीचे दुकान आहे. संशयित सोमनाथ व बालाजी फाटे हे कदम यांच्या ओळखीतील असल्याने त्यांना महिनाभरापूर्वी कामगार म्हणून ठेवण्यात आले होते.

Sangli Crime: पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, पोलिसांनी उघड केला बनाव

कलकत्ता येथील कारागीराकडे दागिने तयार करण्यासाठी २९ मे २०२६ रोजी सोमनाथ व बालाजी यांच्या ताब्यात ३ किलो ९८५ ग्रॅम सोने देऊन त्यांना पाठविण्यात आले. काही दिवसांनी दोघांनी दागिने घेऊन येण्यासाठी आणखी तीन-चार विश्वासू कामगारांची गरज असल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांच्या सांगण्यावरून आणखी चार जण कलकत्त्याकडे रवाना झाले.

९ जून रोजी कारागिराने सोने पाठविण्यास सांगितल्यानंतर सराफ कदम यांनी संशयितांना फोन करून सोने कारागिराकडे सुपूर्द करण्यास सांगितले. त्यांनी होकार दिला; मात्र काही वेळातच सर्वांचे मोबाईल बंद लागले. कारागिराकडे चौकशी केली असता संशयित तेथे आलेच नसल्याचे समोर आले. त्यानंतर सर्वांचा शोध घेण्यात आला; मात्र दहा-बारा दिवस उलटूनही कोणाचाही ठावठिकाणा लागला नाही.

Nashik Crime : नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर, टवाळखोर अन् मद्यपींवर दंडूका; सहा महिन्यात तब्बल…

अखेर सराफ विकास कदम यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर सहाही संशयितांविरुद्ध अडीच कोटी रुपयांचे सोने घेऊन अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Atpadi jeweller gold worth 2 5 crore misappropriation six workers booked

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 09:43 PM

Topics:  

  • Atpadi
  • crime news
  • gold jewellry

संबंधित बातम्या

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
1

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
2

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
3

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
4

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.